जन्म : १५ मे १९५९
जन्मगाव : खरसोली (ता. नरखेड, जि. नागपूर)
प्रकाशित साहित्य :
*** कादंबर्या :
* प्रवाह * रक्तध्रुव * कोंडी * चिरेबंद * सव्वीस दिवस
* उत्तरायण * पडघम * पांढर * अश्वमेध * पांढरे हत्ती. * त्रिमित्री.
*** कथासंग्रह :
* वर्तमान, * दाही दिशा * शहामृग * तद्भव * अदृष्टाच्या वाटा * चंद्रोत्सव * ओल्या पापाचे फूत्कार.
*** ललित लेखसंग्रह : ऐशा चौफेर टापूत.
*** समीक्षा : * कादंबरीकार श्री. ना. पेंडसे * सत्त्वशोधाच्या दिशा * संदर्भासह * महाभारत आणि मराठी
*** वैचारिक : महाभारतचा मूल्यवेध.
*** संपादने :
* कथांजली
* मराठी कविता : परंपरा आणि दर्शन
* जागतिकीकरण
* समाज आणि मराठी साहित्य.
*** अनुवाद :
* सव्वीस दिवस (हिंदी) छब्बीस दिन : डॉ. उषा भुसारी
* महाभारताचा मूल्यवेध (गुजराथी) महाभारतना मूल्योनी वेध : किशोर गौड
* कोंडी (हिंदी) घीर गया है समय का रथ : डॉ. सरजुप्रसाद मिश्र.
* अनंत जन्मांची गोष्ट : विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितेचा पुरस्कार :
* तल्हार स्मृती पुरस्कार (ललितलेखन)
* लोकमत पुरस्कार (रक्तध्रुव)
*** पुरस्कार
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग. ल. ठोकळ पुरस्कार (कोंडी)
* नाथमाधव साहित्य पुरस्कार (कोंडी)
* भि. ग. रोहमारे पुरस्कार (कोंडी) महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार (कोंडी)
* कामगार कल्याण केंद्राचा उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार (एक दीर्घ सावली)
* ग्रंथोत्तेजक पुरस्कार (चिरेबंद) रणजित देसाई पुरस्कार (चिरेबंद)
* विदर्भ साहित्य संघाचा वा. कृ. चोरघडे पुरस्कार (शहामृग)
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शंकर पाटील पुरस्कार (शहामृग)
* डॉ. अ. वा. वर्टी कथा पुरस्कार (कथालेखनातील योगदानासाठी)
* विदर्भ साहित्य संघाचा पु. य. देशपांडे पुरस्कार (उत्तरायण)
* घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार (उत्तरायण)
* महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (अमेरिका) (उत्तरायण)
* समाजप्रबोधन प्रतिष्ठानचा पुरस्कार (सत्त्वशोधाच्या दिशा)
* सहकारमहर्षी बापूसाहेब देशमुख कथा पुरस्कार (तद्भव)
* औरंगाबाद महानगरपालिकेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार (तद्भव)
* आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी : कादंबरी पुरस्कार (पडघम)
* डॉ. अनंत व लता लाभशेटवार प्रतिष्ठानचा एक लक्ष रुपयांचा साहित्य सन्मान पुरस्कार (अमेरिका) (साहित्यनिर्मितीच्या विशेष योगदानासाठी)
* महाराष्ट्र शासनाचा ह. ना. आपटे कादंबरी पुरस्कार (पडघम)
* शांताराम कथा पुरस्कार (भळभळून वाहणारी गोष्ट)
* सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार (पांढर)
* कादंबरीकार वि. स. खांडेकर पुरस्कार (कादंबरीलेखनातील योगदानासाठी)
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मृत्युंजय पुरस्कार (महाभारताचा मूल्यवेध)
* मराठवाडा साहित्य परिषदेचा नरेंद्र मोहरीर पुरस्कार (महाभारताचा मूल्यवेध)
* पुणे मराठी ग्रंथलयाचा राजेंद्र बनहट्टी कथा पुरस्कार (चंद्रोत्सव)
* शब्दवेल प्रतिष्ठान, लातूर : कथा पुरस्कार (चंद्रोत्सव)
* महाराष्ट्र शासनाचा दिवाकर कृष्ण कथा पुरस्कार (चंद्रोत्सव)
* पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार (अश्वमेघ)
* ना. सी. फडके पुरस्कार (अश्वमेघ)
* ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत स्मृती साहित्य पुरस्कार (साहित्यविषयक योगदानासाठी)
* मनोरमा फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार (उत्तरायण).
*** मानसन्मान :
* साहित्य अकादमीची (दिल्ली) प्रवासवृत्ती - १९९४
* नरखेड भूषण पुरस्कार-२००५
* सल्लागार सदस्य - साहित्य अकादमी
* दिल्ली (मराठी भाषा) २००८ ते २०१२
* सदस्य अ.भा. मराठी साहित्य
* महामंडळ-२०११-२०१२
* आमंत्रक - साहित्यसंमेलन समिती - विदर्भ अनुवाद.
* साहित्य संघ-२००७ ते २०१६
*** विदर्भ पातळीवर एकूण दहा साहित्यसंमेलनांचे आयोजन भूषविलेली अध्यक्षपदे :
* विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (पुसद) २००३
* पाचव्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (जळगाव) २००९
* बाराव्या समरसता साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद (अंबाजोगाई) २०१०
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बाविसाव्या मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्षपद (नागपूर) २००१
* अ.भा. सर्व संत साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद (अमरावती) २०१७
*** विशेष :
* वर्तमान, पडघम, पांढर, चिरेबंद आणि चंद्रोत्सव या पुस्तकांचे अंध वाचकांसाठी टॉकिंग बुकमध्ये नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड्ज (मुंबई) या संस्थेतर्फे रूपांतर
* भारतीय ज्ञानपीठातर्फे ‘सर्वोत्कृष्ट कहानियाँ’ या मालेत इस शहर में हर शख्स या कथेची निवड
* इस शहर में हर शख्स या कथेचे एक प्रेमकहाणी या मालिकेत दूरदर्शनवर राष्ट्रीय प्रसारण (दिग्दर्शक : बासू चटर्जी)
* सह्याद्री वाहिनीच्या (मुंबई) अमृतवेल या वाङ्मयीन कार्यक्रमाअंतर्गत मुलाखत प्रसारित- २१ जानेवारी २०१३ (मुलाखतकार : संजय भुस्कुटे)
* पांढर या कादंबरवरील मराठी चित्रपट निर्माणाधीन (दिग्दर्शक- श्री. राजेश लिमकर, पुणे).