लेखक परिचय : राजीव तांबे.
ए/५०५ स्वागत रेसिडन्सी. कुंबरे टाऊनशीप. डीपी रोड. कोथरुड. पुणे. ४११०३८
Email : rajcopper@gmail.com / Website : www.rajivtambe.com
राजीव तांबे हे अनेक पुरस्कार व मानसन्मान प्राप्त लेखक, कवी, नाटककार असून सातत्याने मुलांमध्ये व
मुलांसाठीच काम करणारे सर्जनशील बालसाहित्यकार आहेत.
• अध्यक्ष, कालिदास साहित्य संमेलन. सिडनी (ऑस्ट्रेलिया) २०१३
• अध्यक्ष, आखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन. २०१३
• ‘‘बाल साहित्यातील विशेष योगदानाबद्दल’’ त्यांना ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ २०१६ मधे मिळाला आहे.
• राजीव तांबे यांनी मुलांसाठी कथा, कविता, कादंबरी, एकपात्रिका, द्विपात्रिका, एकांकिका, नाटक, संवादकथा, बोलक्या गोष्टी, विज्ञानकथा, विज्ञान प्रयोगकथा, विज्ञान भयकथा, फॅंटसीकथा, रुपककथा, प्राणीकथा, साहसकथा, रहस्यकथा, भाषेचे खेळ, गणिताचे खेळ, शून्य खर्चाचे विज्ञानाचे प्रयोग, शिक्षणविषयक लेखन अशा विविध २९ साहित्य प्रकारात लेखन केले आहे.
• देश आणि विदेशातील 41 भाषांतून त्यांची 127 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
• राजीव तांबे यांनी अनेक वृत्तपत्रांतून सातत्याने स्तंभलेखन आणि मासिकांचे संपादन केले आहे.
• विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, पालकांसाठी देशात आणि विदेशात त्यांनी अनेक कार्यशाळा घेतलेल्या असून अभिनव शिक्षणपद्धतींवरील भर हा त्यांचा विशेष आहे.
• ‘युनिसेफ’ साठी त्यांनी शिक्षण सल्लागार म्हणून काम केले आहे.
• राजीव तांबे यांचे अनेक मार्गदर्शक व्हिडिओ YouTube वर उपलब्ध आहेत.
---------------------------------------------