शिक्षण -* औषधनिर्माण शास्त्रात पी.एच. डी., पुणे विद्यापीठ
* नालसार विधी विद्यापीठ, हैद्राबाद, येथून पेटंट कायदा या विषयात पदव्युत्तर पदविका
* एल.एल.बी., पुणे विद्यापीठ
* एल.एल.एम. (बौद्धिक संपदा कायदा), तुरीन विद्यापीठ, इटली आणि जागतिक बौद्धिक संपदा संघटना, जिनिव्हा, स्वित्झर्लंड
(या शिक्षणासाठी जागतिक बौद्धिक संपदा संघटनेकडून दरवर्षी साधारण ३०,००० युरो इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. सन २०१२-१३ मधे ही शिष्यवृत्ती मिळवणार्या मृदुला बेळे या एकमेव भारतीय होत्या.)
* जपानी बौद्धिक संपदा कायद्यातील विशेष प्रशिक्षण, टोक्यो
* सध्या म.वि.प्र. समाजाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, नाशिक येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत
*** प्रकाशित साहित्य
* औषधनिर्माणशास्त्र विषयक तीन क्रमिक पुस्तके
* अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा व जर्नल्समधे शोधनिबंध
* `कथा अकलेच्या कायद्याची' हे बौद्धिक संपदा कायद्याची सोप्या भाषेत ओळख करून देणारे त्यांचे पहिले पुस्तक २०१७ साली राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले.
*** या पुस्तकाला लाभलेले पुरस्कार :
* मिलिंद संगोराम स्मृतिपुरस्कार, २०१८
* मराठी साहित्यपरिषदेचा पुरस्कार, २०१८
* महाराष्ट्र राज्य शासनाचा सी. डी. देशमुख पुरस्कार (अर्थशास्त्रविषयक लिखाणासाठी), २०१८
* `कोरोनाच्या कृष्णछायेत...' हे कोव्हिडचा सर्वंकष आढावा घेणारे पुस्तक जुलै २०२०मध्ये राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
* पारंपरिक आणि नव्या औषधांच्या आणि सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रात सल्लागार म्हणून कार्यरत
* रसायने आणि औषधांच्या क्षेत्रातील पेटंट संदर्भात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सल्लागार म्हणून कार्यरत