प्राजक्ता पाडगांवकर वय ३७
* फर्ग्युसन कॉलेजची राज्यशास्त्राची विद्यार्थिनी, पुणे विद्यापीठातून रशियन भाषेत एम फिल प्राप्त.
* सहा भाषा अवगत - मराठी, हिंदी, इंग्रजी, जर्मन, रशियन आणि उर्दू.
* पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागांत रशियन भाषेची प्राध्यापिका.
* वयाच्या २२व्या वर्षी स्वतःची भाषांतराची कंपनी स्थापन करून रशिया, युक्रेन ह्या देशांत अनेक दौरे केले, तसेच फर्ग्युसन कॉलेजमधून जर्मनीला भेट.
* २०११ साली भारतीय नौसेनेच्या आयएनएस विक्रमादित्यच्या हॅन्डओव्हर चमूसाठी रशियन भाषेच्या ट्रेनिंगसाठी अभ्यासक्रमाचे नियोजन आणि प्रत्यक्ष शिकवणी.
* २००८ रोजी इकॉनॉमिक टाइम्सच्या व्यावसायिक स्पर्धेत संपूर्ण भारतात - दोन पिढ्यांचे एकत्रित संगोपन/विरंगुळा केंद्र ही कल्पना अव्व्ल ठरली.
* २००९ - २०११ नाना नानी फाउंडेशन, मुंबई येथे डायरेक्टर एडमिनिस्ट्रेशन म्हणून कार्यरत. ही संस्था वृद्ध कल्याणासाठी उभारलेली सेवाभावी संस्था असून गेली अनेक वर्ष वृद्धांसाठी मुंबईत बागा चालवते. इथे २६००० वृद्धांची सेवा करण्याची संधी मिळाली.
* साल २०१२ पासून अनेक मासिकांतून आणि नियतकालिकातून नियमित लेखन.
* २०१४ साली किशोर मासिकासाठी लेखन
* २०१५ साली लोकसत्तेत लेख प्रसिद्ध “ शुभ्र काही जीवघेणे”
* २०१६ पासून आजपर्यंत अमेरिकेतील विविध मराठी संस्था, नियतकालिकांसाठी सातत्याने लेखन- बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या नियतकालिकांसाठी स्तंभ लेखन.
* २०१६ लोकप्रभाच्या दिवाळी अंकासाठी संशोधन आणि वृद्धांच्या संदर्भात लेखन
* २०१६ ऐसी अक्षरे ह्या आंतरजालावरील दिवाळी अंकात कथा लेखन
* २०१७ च्या संपूर्ण वर्षभरासाठी, लोकप्रभा मासिकातून “दुसरे शैशव” हे २६ भागांचे सदर लेखन.
* २०१८च्या संपूर्ण वर्षासाठी, लोकप्रभा मासिकातून “जगाची थाळी” हे ५२ भागांचे सदर लेखन. भारतीय खाद्यसंस्कृती, खाद्यपदार्थांचा इतिहास आणि मागोवा ह्या विषयावर लेखन.
* २०१८-१९-२०-२१ मध्ये लोकप्रभा मासिकासाठी अनेक निबंध, वैचारिक आणि राजकीय विषयांवरील लेखन.
* २०१९ साली कॅनडाहून प्रकाशित होणाऱ्या एकता मासिकासाठी लेखन
* ह्या वितिरिक्त अनेक दिवाळी अंक, आंतरजालावरील अनेक समूह ह्यांच्यासाठी ललित लेखन, वृद्ध संगोपनाच्या बाबतीत लेखन.
* २०२०साली पहिले पुस्तक, “सांजवात-भारतातील वृद्ध संगोपनाचे भवितव्य” राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित.
* २०१५साली पुण्यातले पहिले वृद्ध संगोपन आणि विरंगुळा केंद्राच्या स्थापनेसाठी मुख्य सल्लागार
* २०१९-२०साली कॅलिफोर्निया येतील मराठी आंतरजाल रेडिओसाठी कार्यक्रमाची निर्मिती, लेखन आणि सादरीकरण.
* २०२० साली लॉकडाऊनच्या काळात युट्यूबवर सिम्पल बात ह्या चॅनेलवरून प्रसारित करण्यासाठी ७ भागांच्या “विश्व कुटुंबाचि जाहले” मालिकेची निर्मिती, गीत लेखन आणि सहभाग.
* सध्या अटलांटा शहरात वास्तव्य आणि व्यवसाय. जॉर्जिया राज्यात स्थावर मालमत्तेची खरेदी विक्रीसाठी नोंदणी अधिकृत व्यावसायिक.