जन्म : १९७७ साली पुण्यामध्ये.
* दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून १९९७ मध्ये जपानी भाषेत बी.ए. पदवी संपादन.
* जपानच्या शिक्षण मंत्रालयाच्या मोम्बुशो शिष्यवृत्तीवर टोकियोतील वासेदा विद्यापीठात एक वर्षाचा जपानी भाषेचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण (१९९७-९८).
* परत आल्यावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून २००० मध्ये जपानी भाषेत एम.ए. पूर्ण. २००२ ते २००४
* ही दोन वर्षे पुन्हा मोम्बुशो शिष्यवृत्तीवर टोकियो परकीय भाषा विद्यापीठात जपानी भाषेचे अध्ययन आणि संशोधन. २००५ पासून २००९ पर्यंत पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जपानी भाषेचे अध्यापन आणि सॉफ्टवेअर कंपनीत पेटंटचे भाषांतर.
* नोव्हेंबर २००९ पासून हैदराबाद येथील इंग्रजी आणि विदेशी भाषा विद्यापीठातील चिनी, जपानी व कोरियन भाषा विभागात जपानी भाषेचे अध्यापक.
* २००८ मध्ये ‘बोक्कोचान आणि इतर जपानी कथा’ हा अनुवादित जपानी कथांचा संग्रह प्रकाशित.
* २०१२ मध्ये ‘राशोमोन आणि इतर जपानी कथा’ हा अनुवादित जपानी कथांचा संग्रह प्रकाशित.
* ‘केल्याने भाषांतर’, ‘उत्तम अनुवाद’, ‘साधना’ इत्यादी मासिके आणि ‘लोकसत्ता’ वृत्तपत्रात अनेक जपानी कथांचे मराठी अनुवाद प्रसिद्ध.