Home / Authors / Nirmala Purandare | निर्मला पुरंदरे
Nirmala Purandare | निर्मला पुरंदरे
Nirmala Purandare | निर्मला पुरंदरे

निर्मला बळवंत पुरंदरे, यांचा जन्म बडोद्यामध्ये झाला.[१] माहेरच्या माजगांवकर (जन्म : ५ जानेवारी १९३३ – २० जुलै २०१९) या 'वनस्थळी' संस्थेच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या होत्या.[२]

* पुण्याला शिकायला येणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यासाठी त्या 'विद्यार्थी सहायक समिती'चे वसतिगृह चालवायच्या.

* वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून त्यांनी खेड्यापाड्यातील स्त्रियांमधून बालवाडी शिक्षिका तयार केल्या.

* पुरंदरेंनी वीसहून अधिक वर्षे श्री. ग. माजगावकर यांच्या 'माणूस' या साप्ताहिकाच्या संपादकीय विभागात काम केले होते.

* 'असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ फ्रान्स' या संस्थेच्या अध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत होत्या.

*** व्यक्तिगत जीवन
निर्मलाताई या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी,'माणूस' साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर आणि 'राजहंस प्रकाशना'चे दिलीप माजगावकर यांच्या भगिनी होत. गायिका-लेखिका माधुरी पुरंदरे या निर्मलाबाईंच्या कन्या आहेत.

*** निर्मला पुरंदरे यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत, ती खालीलप्रमाणे
* बालवाडीताई प्रशिक्षण
* स्नेहयात्रा (प्रवासवर्णनपर)

*** निर्मला पुरंदरे यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके
* आत्मसिद्धा निर्मला पुरंदरे आणि मिशन 'वनस्थळी'ची चरितकथा (माणिक कोतवाल)

*** निर्मला बळवंत पुरंदरे यांना मिळालेले पुरस्कार
* दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आदिशक्ती पुरस्कार (१९९८)
* पुणे महापालिकेचा पुण्यभूषण पुरस्कार (२०१२)
* महर्षी कर्वे संस्थेचा बाया कर्वे पुरस्कार (२००३)
* महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार (२००१)

Nirmala Purandare | निर्मला पुरंदरे ह्यांची पुस्तके