अध्यक्षपदी काम करत असताना खात्यातील चतुर्थ कर्मचारीपासून ते प्रथम वर्गाच्या कर्मचार्यांच्या तक्रारी, बदल्यांचे काम, प्रमोशन, बदली कामगारांच्या समस्या या सर्वांकडे लक्ष देऊ लागलो.
तसेच कर्मचारी व उच्च अधिकारी यांच्यामधील दुवा बनून काम करावे लागले. तसेच आमची संघटना ऑल इंडिया एस.सी./एस.टी. संघटनेसोबत संलग्न आहे. मला ऑल इंडिया एस.सी./एस.टी. फेडरेशनमध्ये ‘नॅशनल जॉईंट कनव्हेअर’ या पदावर नियुक्त केले आहे.
ऑल इंडिया एस.सी./एस.टी. फेडरेशनचे आम्ही सर्व जण कामानिमित्त विविध 'ठिकाणी मिटींग घेतो व तिथे ऑल इंडियाच्या आधारावर कर्मचार्यांचे प्रमोशन, बदल्यांचे प्रॉब्लेम व कोर्टकचेरी इत्यादी कामे करतो. आतापर्यंत ऑल इंडिया एस.सी./एस.टी. फेडरेशनच्या मिटींग दिल्ली, नागपूर, विजयवाडा, बंगलोर, हैद्राबाद इत्यादी 'ठिकाणी घेतल्या. ऑल इंडियामधून सर्व 'ठिकाणच्या संघटनेचे कमीत कमी शंभर पदाधिकारी दोन-तीन दिवस चर्चासत्र 'ठेवून प्रॉब्लेम सोडवतात.
मुंबई एस.सी./एस.टी./ओ.बी.सी. असोसिएशनचा अध्यक्ष झाल्यापासून आम्ही दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा एप्रिलच्या नंतर येणार्या शनिवारी किंवा रविवारी ‘गडकरी रंगायतन नाट्यगृह,’ 'ठाणे इथे सुट्टीच्या दिवशी साजरी करतो.
असोसिएशनच्या कर्मचार्यांच्या कुटुंबांसोबत कार्यक्रम साजरा करतो व एक प्रकारचे सर्वांचे गेट-टुगेदर होते. कार्यक्रमाचा खर्च सर्व सभासदांकडून वर्गणीद्वारे जमा करतो. चांगल्या नावाजलेल्या वक्त्यांना बोलावून लहान मुलांसाठी प्रोत्साहनपर भाषण देण्यास सांगतो. दुपारी सहकुटुंब सर्वांना गडकरी रंगायतन नाट्यगृह, 'ठाणे इथे सुग्रास जेवणाचा बेत असतो. तसेच कार्यक्रमात असोसिएशनच्या सभासदांच्या मुलांना ज्यांनी अभ्यासात चांगली प्रगती केली आहे, त्यांना प्रोत्साहनपर बक्षीसे देतो. तसेच खात्यातील सेवानिवृत्त होणार्या व प्रमोशन मिळणार्या व कार्यक्रमाला उपस्थित प्रतिष्ठित पाहुण्यांचा सत्कार करतो. अशा प्रकारे दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आठवणीत राहील, अशी साजरी करतो. या कामात विजय कांबळे व रामचंद्र ढोले यांचा मला पूर्ण पा'ठिंबा असतो.
तसेच दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिन सहा डिसेंबर रोजी असोसिएशनद्वारे ‘चैत्यभूमी’ दादर इथे साजरा करतो. कार्यक्रमासाठी सभासदांकडून वर्गणी जमा करतो व दादर गोखले रोडवर आमचे सेंट्रल एक्साईजचे ऑफिस आहे, त्याच्या पाठीमागे रस्त्यावर मंडप उभारतो. जागोजागी असोसिएशनचे मोठेमोठे भव्य बॅनर बाबासाहेबांच्या नावाने लावतो. सहा डिसेंबर रोजी त्या मंडपाच्या ठिकाणी आम्ही सर्व सभासद व पदाधिकारी सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत जमा होऊन, बाहेरगावाहून येणार्या व बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी चैत्यभूमीवर येणार्या भीमसैनिकांना आम्ही पाणी, बिस्किटे, वडापाव व फळे वाटप हा कार्यक्रम करतो. कार्यक्रम सुरू होण्याआधी आमच्या दादरच्या सेंट्रल एक्साइजचे जे कोणी कमिशनर पोस्टिंगला असतील, त्यांना आदल्या दिवशी कार्यक्रमाचे आमंत्रण देऊन सहा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता त्यांना मानाने मंडपात आणून त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पाणी, बिस्किटे, वडापाव व फळेवाटपाचा त्यांच्या हस्ते शुभारंभ करून घेतो आणि सर्व सभासद व पदाधिकारी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो. अशा प्रकारे आम्ही वर्षातून दोनदा बाबासाहेबांचे कार्यक्रम जोरात साजरे करतो. त्यामुळे सभासदांमध्ये उत्साह कायम राहतो.
असोसिएशनतर्फे आम्ही गरजू विद्यार्थ्यांना मदत करतो. तसेच नैसर्गिक संकट आले, तर आम्ही लोकांना त्यांच्या गरजेप्रमाणे मदत करतो. ऑफिसचे नवीन कमिशनर, चीफ कमिशनर आले, तर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतो. त्यामुळे आमचे संबंध चांगले राहतात. व आमचे काम लवकर होते. आमच्या सभासदांना त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसतो. मी पुण्याला असताना श्री. कृष्णनसर व मॅडम आरुषा वासुदेवन कमिशनर होत्या. ते मुंबईला चीफ कमिशनर म्हणून प्रमोशनवर आले. मी चार-पाच पदाधिकार्यां ना घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आधी माझे संबंध चांगले होते, आता मुंबईला चांगले संबंध झाले, म्हणून आमचे कुठलेच काम अडले नाही व आमच्या सभासदांना कु'ल्याही प्रकारे त्रास झाला नाही.
१४ ऑक्टोबर २०१८ रोजी मी व माझे मित्र भामरेदादा आम्ही दोघे जण नागपूरला गेलो व त्या दिवशी भदंत सुरेन ससाई यांच्या हस्ते आम्ही दोघांनी ‘धम्मदीक्षा’ घेतली व त्या दिवसापासून आम्ही ‘बौद्ध उपासक’ झालो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर इथे पासष्ट वर्षे सहा महिन्यांनी धम्मदीक्षा घेतली होती, तसेच मीसुद्धा पासष्ट वर्षे चार महिन्यांनी नागपूर इथे उपासक म्हणून धम्मदीक्षा घेतली. उपासक झाल्यापासून आपोआप आपल्यात बदल होतो. त्याप्रमाणे आम्ही धम्माच्या वाटेने चालायचा प्रयत्न करतो. गरजू लोकांना धम्मदान करतो व धम्मासाठी थोडासा सहभाग देतो.
अशा प्रकारे सदतीस वर्षे नोकरी करून आरामात रिटायर झालो. आता रिटायर झाल्यानंतर क्रियाशील राहून राजकारण व समाजकारण करण्याचा प्रयत्न करून दीर्घायुषी व्हायचे आहे. आता नवीन इनिंग जोरात सुरू केली आहे, ती न थांबता अविरत चालू 'ठेवायची आहे. आता समाजकार्य, समाजाचे भले करणे व धम्मकार्य करीत राहणे, ही माझी इच्छा आहे.
जयभीम! नमो बुद्धाय!! जयभारत!!!