मुरली खैरनार यांचा संक्षिप्त परिचय
* १९७७ पासून आजवर पत्रकारिता, डॉक्यूमेंटरीज, नाट्यनिर्मिती, सामाजिक चळवळी, कन्सल्टन्सी व विद्यार्थी-प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रात वेगवेगळ्या वेळी काम.
* नाशिकमधील हौशी रंगभूमीवर १९७५ ते ८५ या काळात पन्नासहून अधिक एकांकिका व नाटकांचे दिग्दर्शन व त्यातून अभिनय. नाशिकमधून चार व्यावसायिक नाटकांची निर्मिती व त्यांचे चारशेहून अधिक प्रयोग.
* नाट्यपरिषदेच्या विविध पदांवर काम काही वर्षे काम. आणीबाणीत तुरुंगवास.
* पत्रकार म्हणून नाशिकला पुण्यात व मुंबईतल्या दैनिकांमधून नोकरी. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या साप्ताहिकाचे संपादन. दृकश्राव्य क्षेत्रात दहा वर्षे काम. या काळात १८ डॉक्यूमेंटरीजची निर्मिती
* वि. वा. शिरवाडकरांच्या वैष्णव कादंबरीवर हिंदी सिरीयलच्या चार भागांची निर्मिती
* याच काळात मास कम्युनिकेशनशी संबंधित अनेक उपक्रमांसाठी कन्सल्टन्सी.
* गेली बारा वर्षे अभ्यासशास्त्र या विषयात काम. ‘सो सिंपल' व ‘मुळीच अवघड नाही' या नावाने गेल्या दहा वर्षात दोन हजाराहून अधिक कार्यक्रम. या विषयावर व्याख्याने व वर्कशॉप्ससाठी महाराष्ट्रभर प्रवास.
* गडचिरोलीपासून गडहिंग्लज तर नांदेडपासून नंदुरबारपर्यंत महाराष्ट्रातल्या पंचवीस जिल्ह्यातल्या दोनशेहून अधिक ठिकाणी कार्यक्रम व सातशेहून अधिक वर्कशॉप्स. शेकडो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण. या विषयावरची वर्षात दोन पुस्तके प्रसिद्ध.
* ७४ ते ८० या काळात कविता, कथा, एकांकिका व नाट्यलेखन. त्यातले काही प्रकाशित.
* मात्र १९८० ते २०१० पर्यंत जाणीवपूर्वक लेखनसंन्यास.
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने या कादंबरीच्या संशोधनासाठी व लिहिण्यासाठी एक लाख रुपयांची अभ्यासवृत्ती.