Meena deval | मीना देवल
मीना देवल
जन्म : ३ मे १९४४
शिक्षण : बी.एस्सी., एल.एल.बी.
* १९६७ ते १९७० ‘भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर’ येथे सायंटिफिक असिस्टंट.
* १९७० ते १९९८ फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या वंध्यत्व निवारण केंद्रात समुपदेशक.
* १९८८ पासून सहा वर्षे ‘मैत्रेयी’ या संस्थेच्या ‘जागरूकता निर्मिती प्रकल्पा’वर समन्वय-साधक.
* १९९६ मध्ये डेव्हलपमेंट लॉ ह्यूमन राइट्स या कार्यक्रमात हेग (नेदरलँड) येथे सक्रिय सहभाग.
* ‘मुलगी झाली हो’ या पथनाट्याच्या २०० प्रयोगांत सूत्रधाराची भूमिका.
* १९९६ ते १९९८ ‘सकाळ’ या वृत्तपत्रात वाचकांच्या समस्या पत्राद्वारे सोडवणारे सदर दोन वर्षे चालवले.
* ‘लोकसत्ता’, ‘म. टाइम्स’, ‘मिळून सार्याजणी’, ‘स्त्री-उवाच’, ‘ललकारी’ इत्यादी नियतकालिकांमध्ये स्त्री-प्रश्नावर विपुल लेखन.