* मारुती पाटील यांचा जन्म १९४५ साली कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे झाला. त्यांचे सगळे बालपण बेळगाव व आजुबाजुच्या खेडेगावातील निर्सगरम्य वातावरणात गेल्यामुळे, लहानपणापासूनच त्यांच्यात कलेची आवड जोपासली गेली.
* शालेय शिक्षणानंतर कै . कलामहर्षि के . बी. कु लकर्णी या गुरूूंच्या छत्र-छायेत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकलाशिक्षण
‘चित्रमंदिर’ बेळगाव येथे झाले.
* सन १९६४ नंतर चित्रकलेचे पुढील शिक्षण पुणे व मुंबई येथे झाले.
* सन १९६८-६९ साली सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट येथून त्यांना अॅपलाइड आर्टची पदविका मिळाली. नंतर काही काळ
त्यांनी जाहिरातक्षेत्रात काम के ले.
* सन १९६९-७० मधे ड्रॉइंग आणि पेंटििंगच्या ओढीमुळे ते पुण्यातील ‘अभिनव कला महाविद्यालयात’ अध्यापक म्हणून रुजू झाले. जवळ जवळ चार दशके त्यांनी कलेच्या शैक्षणिक क्षेत्रात अध्यापनाचे काम के ले.
* अध्यापनाबरोबरच एक चित्रकार म्हणून स्वतःच्या अशा चित्रअभ्यासातून सतत नव-नवीन चित्रनिर्मिती केल्या.
* त्यांच्या चित्रकलेच्या जीवन प्रवासात त्यांना आलेले विविध अनुभव, तसेच त्यांनी काढलेल्या असंख्य चित्रांमधली काही
मोजकी चित्रे त्यांच्या या रंग रेषांचे सोबती या पुस्तकात आहेत.
* १९९२ साली महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात त्यांच्या पेन्सिल मधील १०" X १५" आकाराच्या व्यक्तिचित्राला राज्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
* १९९४ साली ॲक्रलिक माध्यमातील कलाकृतीला राज्य पुरस्कार लाभला.
* १९९६ साली ऑईल माध्यमातील कलाकृतीला राज्य पुरस्कार लाभला.
* बॉम्बे आर्ट सर्कल व बॅरिस्टर ओक स्मृती प्रदर्शनात त्यांच्या व्यक्तिचित्रांना व निसर्गचित्रांना प्रत्येकी दोन वेळा तर आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनात तीन वेळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.