डॉ. मंगला नारळीकर (पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे) (१७ मे, १९४३ - १७ जुलै, २०२३) या एक भारतीय मराठी गणितज्ज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.
*** शिक्षण
* मंगला राजवाडे यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. पदवी घेतली.
* १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले.
*** अध्यापकीय कारकीर्द
* इ.स. १९६४ ते १९६६ : इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केले.
* इ.स. १९६७ ते १९६९ : केंब्रिज विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत गणिताचे अध्यापन केले.
* मुंबई विद्यापीठात व नंतर पुणे विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापिका म्हणून कार्य केले.
* इ.स. १९७४ ते १९८० : या कालावधीत परत टाटा इन्स्टिट्यूटल येथे संशोधन करून त्यांनी १९८१ साली त्यांनी प्राध्यापक के. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली गणित विषयातली पीएच.डी. मिळवली.
* संश्लेषणात्मक अंक सिद्धान्त हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता.
* इ.स. १९८२ ते १९८५ या काळात टाटा इन्स्टिट्यूटमध्ये गणित विद्यालयात पूल ऑफिसर म्हणून काम केले.याच काळात त्यांनी मुंबई विद्यापीठांतील एम.फिल. करणाऱ्या गणिताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
* इ.स. १९८९ ते २००२ दरम्यान पुणे विद्यापीठांतील एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना गणिताचे अध्यापन दिले.
* इ.स. २००२ ते २००६ या कालावधीत भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवले.
* सद् आणि सदसत् विश्लेषण (Real and Complex Analysis), संश्लेषणात्मक भूमिती, अंकसिद्धान्त, प्रगत बीजगणित आणि संस्थितिशास्त्र (Topology) हे मंगला नारळीकर यांचे संशोधनाचे विषय आहेत.
* त्यांनी बालभारतीच्या गणित विषयाच्या समितीच्या अध्यक्षा म्हणून काम केले.
*** डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
* A Cosmic Adventure (अनुवादित, मूळ मराठी - आकाशाशी जडले नाते, लेखक प्रा. जयंत नारळीकर
* An easy Access to basic Mathematics (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)
* गणितगप्पा (भाग १, २)
* गणिताच्या सोप्या वाटा (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)
* नभात हसरे तारे (सहलेखक - डॉ. अजित केंभावी व डॉ. जयंत नारळीकर) : (खगोलविज्ञानविषक)
* पहिलेले देश, भेटलेली माणसं (प्रवासवर्णन)
* Fun and fundamentals of mathematics, Universities press
*** पुरस्कार
* बी.ए. (गणित) मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम १९६२
* एम.ए. (गणित) पदवीसाठी कुलगुरूंचे सुवर्णपदक, मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम १९६४