* समीर भिडे यांच्या छोट्या मेंदूतील रक्तवाहिन्या फुटल्यानं त्यांना पक्षाघात झाला आणि नंतर त्यांच्यावर `लेफ्ट सब-ऑसिपिटल क्रॅनिएक्टॉमी' आणि `हिमाटोमा इव्हॅक्युएशन' या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या प्रकारचा पक्षाघात आनुवंशिक आणि अत्यंत दुर्मीळ प्रकारचा असतो.
* भिडे यांच्या मेंदूरोगतज्ज्ञांनी मार्क ग्रीनबर्ग यांच्या `हँडबुक ऑफ न्युरोसर्जरी'चा संदर्भ दिला होता, त्यानुसार अमेरिकेतील ३ हजार ३०० ते ५८ हजार ८०० जणांना हा विकार होतो. मात्र भिडे यांना झालेला पक्षाघात (रक्तवाहिन्या फुटणं) हा त्याहीपेक्षा दुर्मीळ असून हा विकार अमेरिकेत दर वर्षी ८६ ते १७३० लोकांना होतो. यांतील बहुतांश रुग्ण मृत्युमुखी पडतात. यातून वाचलेल्या रुग्णांमध्ये भिडे यांचा समावेश आहे आणि त्याबद्दल ते कृतज्ञ आहेत. मात्र अशा प्रकारचा विकार असणार्यांना पक्षाघात होईलच, असं नाही. अनेकांना हा विकार असतो, पण त्यांना पक्षाघात झालेला नाही.
* भिडे यांचे एमआरआय आणि कॅट स्कॅन यांत आता काही बिघाड आढळत नाही, तरी अद्याप त्यांना भोवळ येणं, डोकेदुखी आणि तोल जाण्याचा त्रास जाणवतो. ही लक्षणं पूर्णपणे जातील, याबद्दल त्यांचे डॉक्टर खात्रीशीररित्या काहीही सांगू शकत नाहीत.
* मात्र भिडे यांची दृष्टी, वाचा आणि शारीरिक ताकद यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. त्यासाठी अमेरिकेतील वैद्यकीय व्यायाम, दैनंदिन हालचालींसंबंधीचे व्यायाम, वाचा, व्हेस्टिब्युलर आणि दृष्टी उपचार यांसह भारतातील निसर्गोपचार आणि अॅक्युपंक्चर, ऊर्जा उपचार, संगीतोपचार, विविध आयुर्वेदिक उपचार आणि योगासनं, ध्यान, शाकाहार आणि मसाज अशा समग्र उपचार पद्धतींचा उपयोग झाला.
* आयुष्यात मोठी उलथापालथ होऊनही पक्षाघातानंतर मिळवलेल्या यशाबद्दल भिडे कृतज्ञ आहेत. पक्षाघाताचा झटका आल्यानंतर लगेचच ते `इमर्जन्सी रूम'कडे रवाना झाले आणि केवळ दोनच तासांत या पक्षाघातासंबंधीच्या विशेषज्ञ मेंदूरोगतज्ज्ञांनी त्यांना शस्त्रक्रियेसाठी टेबलवर घेतलं.
* पक्षाघातापूर्वी भिडे यांनी वेगवेगळ्या व्यवस्थापनविषयक, तंत्रज्ञान सल्लागार, ज्ञान व्यवस्थापन व विक्री विषयांत काम करणार्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे. त्यामध्ये `अर्नेस्ट अँड यंग', `काना', `इल्युसिअन', `विल्मरहेल', टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' (टीसीएस), `थ्री पिलर ग्लोबल' आणि `ग्रँट थॉर्टन' या कंपन्यांचा समावेश आहे.
* समीर भिडे यांचा जन्म पुण्यात झाला आणि त्यांनी मुंबई विद्यापीठातून १९८९मध्ये `बीकॉम'पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि १९९१मध्ये त्यांनी व्हर्जिनियातील `िंलचबर्ग विद्यापीठा'तून व्यवस्थापन या विषयात पदवी घेतली.
* १९९३मध्ये त्यांनी आयोवामधील डे-मॉइनेसमधील `ड्रेक विद्यापीठा'तून एमबीए ही पदवी घेतली. त्यांनी अमेरिकेत ३२ वर्षं वास्तव्य केलं असून चालू वर्षी (२०२२) ते पुण्यात वास्तव्यास येणार आहेत.
सुनीता लोहोकरे
शिक्षण : एम. ए. (इंग्लिश)
वृत्तपत्रविद्या पदविका,
अनुवादशास्त्र पदविका (सर्व पुणे विद्यापीठ)
*** अनुभव
* सुमारे २६ वर्षे वृत्तपत्रा क्षेत्रांत कार्यरत.
* केसरी व महाराष्ट्र टाईम्स मध्ये विविध पदांवर काम
* आकाशवाणीच्या वृत्तविभागात आठ वर्षे वृत्त निवेदक व भाषांतरकार
* ई.टी.व्ही.साठी लेखन. दूरदर्शनसाठी लेखन-निवेदन,
* वृत्तपत्र, मासिके, दिवाळी अंकांसाठी विपुल लेखन.
* राज्यात व राज्याबाहेर होणा-या वृत्तपत्रीय परिषदा आणि कार्यशाळामध्ये सहभाग.
*** अनुवादित पुस्तके
* डॉ. आई तेंदुलकर (राजहंस प्रकाशन)
* मी महमद खान, शपथेवर सांगतो की... (राजहंस प्रकाशन)
* एक दिवस अचानक (राजहंस प्रकाशन)