चित्रकार ज्योत्स्ना संभाजी कदम या ठाण्याच्या चित्रकला क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव. व्यावसायिक चित्रकार व लेखिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्योत्स्ना संभाजी कदम या गेली ३० वर्षे सातत्याने पेंटिंग करत आहेत.
* एक दर्जेदार, सर्जनशील मनस्वी चित्रकार म्हणून त्यांची कला क्षेत्रात ख्याती आहे.
* मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत तसेच आर्टिस्ट आर्ट सेंटर, नेहरू सेंटर अशा अनेक गॅलरी मध्ये त्यांची अनेक चित्रे प्रदर्शित झालेली आहेत.
* चित्रकलेबरोबर त्यांना लेखनातही रस आहे. अनेक वर्तमानपत्रांतून तसेच मौज, ऋतुरंग यांसारख्या दर्जेदार दिवाळी अंकांतून त्यांनी ललित लेखनही केले आहे.
* इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता १०वी च्या पाठ्यपुस्तकात "बदलापूरचे घट" हा धडा समाविष्ट केला आहे.
* "सर आणि मी" हे आत्मकथन प्रसिद्ध झाले आहे.
* अनेक ठिकाणे चित्रांची प्रात्याक्षिके तसेच कलेचा रसास्वाद या विषयावर व्याखानेही देतात.