जन्म : १६ मे १९५६, पुणे
* शिक्षण : भावे स्कूल आणि बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स.
* बी. कॉम. झाल्यानंतर सी.ए. असून १९८२ सालापासून आजतागायत पुण्यात गेली ४२ वर्षे स्वत:चा व्यवसाय.
* मराठी आणि इंग्लिश साहित्यवाचनाची आवड.
* माझे पहिले पुस्तक `चित्रलेखा' (अनुवादित कादंबरी) हे होते. आणि ते राजहंस प्रकाशनाने सन २०२० ला प्रसिध्द केले होते. हे पुस्तक मूळ हिंदी असून प्रसिद्ध लेखक श्री. भगवतीचरण वर्मा यांनी लिहिलेले आहे परंतु हा अनुवाद शब्दशः नव्हता किंवा स्वैरही नव्हता. ते एक प्रकारचे पुनर्लेखन होते.
* चाल आणि मात हे माझे दुसरे पुस्तक असून हे देखील राजहंस प्रकाशनाने सन २०२३ ला प्रसिद्ध केले. हे पुस्तक माझे स्वतंत्र पुस्तक आहे., ज्यात ३ कथा आहेत, सर्व कथा आजच्या जमान्यातल्या क्राईम - थ्रीलर या प्रकारच्या आहेत. माझ्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मी या कथा लिहिल्या आहेत.