गिरीश कुबेर हे मराठी पत्रकार, लेखक आणि संपादक आहेत. ते विशेषतः लोकसत्ताच्या अग्रलेखांसाठी लोकप्रिय आहेत.
आंतरराष्ट्रीय अर्थकारण, राजकारण हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत.
* सन २०१०पासून ते लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
* लोकसत्तात येण्यापूर्वी ते इकॉनॉमिक टाईम्समध्ये राजकारण शाखेचे संपादक होते.
कुबेर हे लोकसत्ताचे संपादक असून इंडियन एक्सप्रेसमध्ये नेहमी लिहितात. ते The Tatas: How a Family Built a Business and a Nation चे लेखक आहेत, ज्याने 2019 मध्ये गजा कॅपिटल बिझनेस बुक प्राइज जिंकला आहे. त्यांनी मराठीत सहा पुस्तकेही लिहिली आहेत.
*** राजहंस तर्फे प्रकाशित साहित्य
* अधर्मयुद्ध
* एका तेलियाने - डिसेंबर, इ.स. २००८
* टाटायन - जानेवारी इस २०१५
* युद्ध जिवांचे - ऑगस्ट, इ.स. २०१०
* हा तेल नावाचा इतिहास आहे जून, इ.स. २००६
* पुतिन: महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान
*** पुरस्कार
* मारवाडी फाऊंडेशनचा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार (२५-११-२०१७)