Home / Authors / Dr.Chitralekha Purandare | डॉ. चित्रलेखा पुरंदरे
Dr.Chitralekha Purandare | डॉ. चित्रलेखा पुरंदरे
Dr.Chitralekha Purandare | डॉ. चित्रलेखा पुरंदरे

प्रा. डॉ. चित्रलेखा पुरंदरे
एम. ए., बी. एड., पीएच.डी.

• शिक्षणक्षेत्रात तीस वर्षे सेवाकार्य : ज्ञानप्रबोधिनी, मुलींचे आगरकर कनिष्ठ महाविद्यालय, स्वाध्याय महाविद्यालय.

• प्रकाशित साहित्य : चरित्रलेखनाची २८ पुस्तके (यांपैकी काही चरित्रांचे इंग्रजी, हिंदी भाषेत अनुवाद). प्रकाशित.
डॉ. किरण बेदी, डॉ. विकास आपटे, डॉ. जयंत नारळीकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (या चरित्राचे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या हस्ते प्रकाशन), प्रगतिशील शेतकरी श्री. ज्ञानेश्वर बोडके (या चरित्राचे केंद्रीय मंत्री मा. स्मृतीजी इराणी यांचे हस्ते प्रकाशन) ही काही उल्लेखनीय चरित्रे.

केवड्याचे अत्तर (कथासंग्रह), शिवशाहिरांचे वाड्मयीन ऐश्वर्य (संदर्भग्रंथ),
देव दानवा नरे निर्मिले (वैचारिक), एका आजीची गोष्ट (एकांकिका),
तेजस्विनी (नाटक).
विविध विषयांवरील सुमारे ३०० लेख, वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांतून प्रसिद्ध.

• ‘मी येसूवहिनी’ : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या मातृतुल्य येसूवहिनी यांच्यातील पवित्र नात्याचे बंध उलगडून
दाखविणाऱ्या संगीतिकेचे लेखन – सादरीकरण.

• आध्यात्मिक, धार्मिक, ललित विषयांवरील ग्रंथसंपदेचे संपादन.

• सूत्रसंचालन, व्याख्याने, शास्त्रीय संगीत, सतारवादनाच्या कार्यक्रमांचे सादरीकरण

• महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर व डॉ. मंगलाताई नारळीकर यांची दीर्घ मुलाखत.

• आकाशवाणी पुणे व मुंबई केंद्र : विविध मुलाखती आणि सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांचे सादरीकरण

• लेखनासाठी पुणे मराठी ग्रंथालय, बडोदा वाङ्मय परिषद असे अनेक पुरस्कार प्राप्त.

Dr.Chitralekha Purandare | डॉ. चित्रलेखा पुरंदरे ह्यांची पुस्तके