डॉ. आरती रानडे - यांनी अमेरिकेतील युनिव्हरसिटी ऑफ पिटसबर्ग येथून औषधनिर्माण शास्त्रामध्ये पीच.डी. ( PhD) ही पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी याच विद्यापीठतून 'स्टेम सेल सेल' (मूलपेशी) विषयात आणि ॲरिझोना येथील ट्रान्सरेशनल जीनोमिक्स रीसर्च इन्स्टिट्यूट येथून कर्करोगावरील संशोधनासाठी पोस्ट डॉक्टरेट स्कॉलरशीप प्राप्त केली.
* नामांकित आंतरराष्ट्रीय जरनल्समध्ये त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत आहेत, तसेच कर्करोग आणि स्टेमसेल या विषयांवरील पुस्तकात त्यांनी लिहिलेले धडे समाविष्ट केले गेले आहेत.
* लेखिका गेली २० पेक्षा अधिक वर्षे अमेरीकेत वास्तव्य करत असून सातत्याने ब्लॉग लेखन लेिन, परदेशातील
मराठी मंडळांच्या नियतकालीकांसाठी लेखन करत आली आहे.
* मराठी भाषेला महाराष्ट्रापुरते किंवा भारतापुरतेच मर्यादीत न करता करता, तिला भारताबाहेरही विषय आशय, मांडणीतून पोचवण्यासाठी प्रवास, अनुभव, शास्त्र अशा विविधांगी विषयावरील विचार मायबोली मायबोली, ऐसी अक्षरे अक्षरे, मिसळपाव अशा आंतरजालावरील विविध स्थळांवर आणि दिवाळी अंकामध्ये गेली अनेक वर्षे मराठी ललित लेखातून
मांडत आल्या आहेत.
* २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या कथा लेखन स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त कथेचा संवादसेतू दिवाळी अंकात समावेश झाला आहे.
* मराठी भाषेमध्ये विश्वासार्ह विज्ञानविषयक माहिती उपलब्ध व्हावी, जगभरातील नवनवीन शोध लोकांपर्यंत पोचावेत या उद्देशाने सर्वसामान्य वाचकांना सहजपणे समजेल आणि सजगता वाढेल अशी आरोग्यविषयक १० लेखांची लेखमाला २०२३ या वर्षात 'महा अनुभव अनुभव' मध्ये दर महिन्याला प्रकाशित झाली. लेखमालेला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने २०२४ सालातही ही लेखमाला पुढे चालू ठेवण्यात आली आहे.
* २०२२ मध्ये पुण्यातील नामांकित वसंत व्याख्यानमालेत 'शास्त्र यत्र तत्र सर्वत्र सवगत्र' या दैनंदिन जीवनातील विज्ञान विषयावर भाषण देण्यासाठी वक्ता म्हणून निमंत्रित.
* लेखिका गिर्यारोहण , मॅरॅथॉन रनिंग, लांब पल्ल्याचे सायकलींग यात मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून, लेखिकेच्या डुडलिंग चित्रशैलीवर आधारीत चित्रांची २०१९ आणि २०२० साली अमेरीकेत पोर्टलंड येथे प्रदर्शनासाठी निवड.