डॉ. सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून, १९५२) हे मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत. ]
*** शिक्षण :
सदानंद मोरे यांनी एकदा तत्त्वज्ञान हा विषय, आणि दुसऱ्यांदा प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन, असे दोनदा एम.ए. केले आहे.
* ‘द गीता – अ थिअरी ऑफ ह्यूमन ॲक्शन ‘ या विषयावर मोरे यांचे पीएच.डी.चे संशोधन होते. त्यासाठी लिहिलेल्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधलेखनाचा गुरुदेव दामले पुरस्कार मिळाला.
* डॉ.सदानंद मोरे यांनी विद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या ‘कारकीर्द ॲवार्ड‘ या योजनेअंतर्गत ‘कृष्ण : द मॅन ॲन्ड हिज मिशन ‘ या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन केले आहे.
*** व्यवसाय :
डॉ. सदानंद मोरे पेशाने तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक आहेत. पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागासहित विविध अन्य अध्यासनांचे ते समन्वयक आहेत.
* तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्या शाखीय व्यासंगाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत म्हणून त्यांना लोक मानतात.] मोरे यांनी अनेक संतसाहित्यविषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे. विविध परिसंवाद आणि कार्यशाळांतून त्यांनी अनेक शोधनिबंधांचे वाचन केले आहे आणि अनेक व्याख्याने दिली आहेत.
* डॉ. सदानंद मोरे हे इ.स. २०१५ साली पंजाबमधील घुमान येथे पार पडलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष होते. जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
*** डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेले/संपादित केलेले ग्रंथ
* अनुभवामृत- वासुदेवी टीका सह-संपादन (आळंदी देवस्थान प्रकाशन)
* अर्भकाचेसाठी (प्रेस्टिज प्रकाशन, पुणे १९९८)
* उजळल्या दिशा – बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित नाटक (अक्षर प्रकाशन, मुंबई २००१). सदानंद मोरे यांचे हे पहिलेच
* नाटक अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केले होते.
* उंबरठ्यावर
* कर्मयोगी लोकमान्य
* कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृती ग्रंथ सह-संपादन (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे)
Kŗsna -The man and his mission (गाज प्रकाशन, अहमदनगर १९९५)
* गर्जा महाराष्ट्र
* द गीता – अ थिअरी ऑफ़ ह्यूमन ॲक्शन -(श्री सद्गुरू प्रकाशन, नवी दिल्ली)
* गीतारहस्याची निर्मिती-मीमांसा (केसरी मराठा प्रकाशन, पुणे १९९२)
* जागृतीकार पाळेकर (चरित्र -जे पी एस पी, पुणे १९९६)
* ताटीचे अभंग – एक विवेचन (भागवत प्रबोधन, देहू १९९५)
* तुका म्हणे (उत्कर्ष प्रकाशन, पुणे, २००१)
* तुकाराम गाथा संपादन (देहू देवस्थान प्रकाशन)
* तुकाराम दर्शन (गाज प्रकाशन, अहमदनगर १९९६)
* त्रयोदशी (नवीन उद्योग प्रकाशन, पुणे १९९५)
* निवडक सकल संत गाथा
* पालखी सोहळा उगम आणि विकास (देहू देवस्थान प्रकाशन, १९९५)
* प्रसादाची वाणी (सकाळ प्रकाशन)
* मंथन – शोध निबंध व लेख संग्रह (प्रकाशक - ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, अहमदनगर)
* महात्मा फुले यांचे राजकीय विचार (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर १९९५)
* या सम हा
* वि.का. राजवाडे समग्र साहित्य, प्रस्तावना खंड – संपादन (राजवाडे संशोधन मंडळ, धुळे)
* लोकमान्य टिळक यांचे चरित्र (गंधर्व वेद प्रकाशन)
* लोकमान्य ते महात्मा (२ खंड, राजहंस प्रकाशन, पुणे)
* लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (मनोविकास प्रकाशन)
* वारकरी साहित्य भूमिका आणि स्वरूप (नाना पाटील ॲकॅडमी पुणे १९९५)
* वाळूचे किल्ले
* विद्रोहाचे व्याकरण
* शिवचरित्र (नाटक)
* क्षितिज
* ज्ञानदेव तुकाराम (देहू देवस्थान प्रकाशन २०००)
* ॲग्रोवन दैनिकात संत तुकारामांच्या साहित्यावर ‘अध्यात्म’ नावाचे सदरलेखन
* महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकसत्ता आदी दैनिकांतून आणि साप्ताहिक साधना, साप्ताहिक लोकप्रभा, साप्ताहिक *
* विवेक आदींमधून लेखप्रकाशन
* "मराठा समाज : वास्तव आणि अपेक्षा" या पुस्तकाची प्रस्तावना
* साप्ताहिक सकाळमध्ये स्तंभलेखन (विषय : टिळकांकडून गांधींकडे नेतृत्वाचे हस्तांतरण)
* साप्ताहिक सकाळमधून “गर्जा महाराष्ट्र’, “तुकाराम दर्शन’, "महाराष्ट्राची लोकयात्रा" आणि “लोकमान्य ते महात्मा", "विचारांच्या सावल्या" या लेखमाला.
*** पुरस्कार
* उजळल्या दिशा या नाटकासाठी राज्य शासनासह १० संस्थांचे पुरस्कार.
* अनंत काणेकर पुरस्कार, मुंबई
* मराठी साहित्य परिषदेचा कमलाकर सारंग स्मृती पुरस्कार
* पुण्याच्या कला गौरव प्रतिष्ठानचा पुरस्कार
* नाट्य गौरव पुरस्कार
* नाट्यदर्पण पुरस्कार, मुंबई
* मुंबईच्या नाट्य परिषदेचा पुरस्कार
* मामा वरेरकर पुरस्कार, मुंबई
* रंगदर्पण पुरस्कार, मुंबई
* शिव मंत्री स्मृती पुरस्कार
* तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी १९९८ सालच्या साहित्य अकादमी पुरस्कारासह अन्य १५ संस्थांचे पुरस्कार
* अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय यांचा पुरस्कार
* इचलकरंजीचा ग्रंथोत्तेजक पुरस्कार
* पिंपरी-चिंचवड येथे भरलेल्या ग्राम जागर साहित्य संमेलनाचा पुरस्कार
* ना.गो. चाफेकर पुरस्कार
* प्रो.पी.आर. जिनसीवाले पुरस्कार
* तनपुरे महाराज पुरस्कार (पंढरपूर)
* संत तुकाराम महाराज साहित्य पुरस्कार
* अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार
* पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
* सत्यशोधक मुकुंदराव पुरस्कार, तारावाडी
* समर्थ रामदास पुरस्कार, माळेगाव
* लोकमान्य ते महात्मा या पुस्तकाला मिळालेले पुरस्कार:-
* कळवा येथील जवाहर वाचनालयाचा गोपीनाथ शिवराम पाटील पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारचा महात्मा जोतिबा फुले राज्य पुरस्कार
* पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शं.ना. जोशी पुरस्कार
* नाशिकचाच प्रसाद बन वाङमय पुरस्कार
* ना. के. बेहरे पुरस्कार, पुणे
* मराठी ग्रंथालय पुरस्कार, पुणे
* नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा मु.बा. यंदे साहित्य पुरस्कार
* कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार
* सहकार महर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर
* ’द गीता : अ थिअरी ऑफ़ ह्यूमन ॲक्शन’ या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी असलेला गुरुदेव दामले पुरस्कार
* अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेत २०१७ चा इतिहासभूषण वा .सी. बेंद्रे पुरस्कार .
* न.चिं. केळकर पुरस्कार - ’कर्मयोगी लोकमान्य’साठी
* सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगावचा अखिल भारतीय श्री दलुभाऊ जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार