जन्म : १ नोव्हेंबर १९४५
शिक्षण : एम. बी. बी. एस.
* १९८२ पासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते
* १९८९ मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना, तेव्हापासून २० ऑगस्ट २०१३ पर्यंत कार्याध्यक्ष.
* महाराष्ट्र अं.नि. स . १८० शाखांव्दारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत कार्यरत.
* अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विविध पैलूंवर बारा पुस्तके. प्रत्येक पुस्तकाच्या अनेक आवृत्या. अनेक पुस्तकांना पुरस्कार.
* प्रथितयश वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन. आकाशवाणी, इलेक्ट्रोनिक्स chanels यांव्दारे अनेक कार्यक्रम. हजारो व्याख्याने.
* बुवाबाजी, भानामती, चमत्कार, भविष्य, अनिष्ट रूढी-परंपरा अशा सर्व प्रकारच्या अंधश्रद्धाच्या विरोधात अथक संघर्ष.
* वैज्ञनिक दृष्टीकोन व विवेकवाद रुजविणे यासाठी रचनात्मक कार्य.
* 'साधना' या साने गुरूजींनी स्थापना केलेल्या साप्ताहिकाचे सन २००० सालापासून संपादक.
* दशकातला सर्वोत्तम कार्यकर्ता' म्हणून २००६ साली महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्यातर्फे न्यू जर्सी येथे १० लाखांचा पुरस्कार. ही सर्व रक्कम 'अंनिस' ला प्रदान
प्रा. प.रा. आर्डे
* प्रा. प. रा. आर्डे (Prof.P.R. Arde) हे अंनिसच्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सोबत धडाडीने कार्य करणारे कार्यकर्ते होते.
* ज्येष्ठ कार्यकर्ते आणि संपादक आर्डे (Prof.P.R. Arde) यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन वृत्तपत्राचे तब्बल 20 वर्षे संपादक पद भूषविले आहे.
* प्रा. आर्डे यांनी फसवे विज्ञान, वेध विश्वाचा मानवी शौर्याचा यांसारखी महत्वपुर्ण पुस्तकं त्यांनी लिहीली.
* त्यांनी व्याख्याने, शिबीरांच्या माध्यमातून खगोल विज्ञान आणि अंधश्रध्दा या विषयांवर प्रबोधन केले.