जर्मनमधून पदवी (ऑनर्स) प्राप्त केल्यानंतर गडकरी यांनी मराठीतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
* कविवर्य बा.भ. बोरकर आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील निसर्ग : एक तौलनिक अभ्यास या विषयावर शोधनिबंध सादर करून त्यांनी एम.फिल. प्राप्त केली.
* रवींद्रनाथ टागोरांची कविता आणि समकालीन मराठी कविता हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता.
* पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि वर्ल्ड बायबल ट्रान्स्लेशन सेंटर यांच्या सहकार्याने इंग्रजी बायबलचा आधुनिक मराठीत अनुवाद करण्याच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग होता.
* विविध नियतकालिकांमधून त्यांचे लेखन व त्यांनी अनुवादित केलेले साहित्य प्रकाशित झाले आहे.
*** शिष्यवृत्त्या व पारितोषिके :
* पीएच.डी.साठी कै. गजानन विश्वनाथ साळवेकर शिष्यवृत्ती
* एम.फिल. साठी डॉ. सुहासिनी लद्दू पारितोषिक
* निर्बाचित कलाम या पुस्तकाला गाडगीळ भगिनी पुरस्कृत मातृ-पितृ पुरस्कार
* आमार मेयेबेला या पुस्तकाला डॉ. सुभाष भेंडे पुरस्कृत जी.ए. कुलकर्णी पुरस्कार
* देवदास या कादंबरीच्या अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार
* पश्चिम बंगाल सरकारमान्य, शरद समिती चा शरद पुरस्कार, १९६०
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जी.ए. कुलकर्णी पुरस्कार, २०११.