डॉ. क्षमा गोवर्धने शेलार
शिक्षण - (बी. एच्. एम्. एस्.)
संजीवन क्लिनिक
बेल्हा, तालुका जुन्नर, (पुणे जिल्हा) इथे २००८ पासून वैद्यकीय सेवेत कार्यरत
*** प्रमुख साहित्य-
* ऋग्वेदातील अल्पज्ञात घटनेवर आधारित ‘दशोराज्ञ’ या पहिल्या कादंबरीची पहिली आवृत्ती ‘पानिपत’कार श्री. विश्वास पाटील यांच्या हस्ते ३१ जानेवारी २०२१ रोजी नाशिक येथे प्रकाशित
* ‘दशोराज्ञ’ची दुसरी आवृत्तीही २०२३ मध्ये प्रसिध्द झाली आहे. तसेच भारताबाहेरच्या वाचकांसाठी किंडल आवृत्ती उपलब्ध आहे.
*** इतर लेखन-
१. 'घुमक्कड़ी' हे प्रवासवर्णन प्रसिद्ध. - त्याला नुकताच बडोदा वाड्मय परिषदेचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. (२०२२)
२. 'बायजा' ही कादंबरी पुण्यात ऑर्किड इंटरनॅशनल येथे 'लागिरं झालं जी' फेम अभिनेता श्री. तेजपाल वाघ यांच्या हस्ते प्रकाशित (२०२३)
३. राजहंस प्रकाशनतर्फे आयोजित रहस्य-सन्मान कादंबरी स्पर्धेत (२०२२) 'सवाष्ण' या कादंबरीस प्रथम पुरस्कार. ही कादंबरी ‘राजहंस’तर्फे २०२४ मध्ये प्रकाशित
*** ‘दशोराज्ञ’ला मिळालेले पुरस्कार
१. शब्दकळा साहित्य संघ , मंगळवेढा (२०२१)
२. मराठी वाड़्मय परिषद बडोदा संस्थेचा अभिरूची गौरव पुरस्कार, बडोदा (२०२१)
३. सृष्टी बहुउद्देशीय संस्था, सोलापूर (२०२२)
४. शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचा तापी-पूर्णा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, गोवा (२०२२)
५. तेजभूषण साहित्य पुरस्कार, आळंदी (२०२१)
६. सांडू प्रतिष्ठान, चेंबूरचा कादंबरीसाठीचा प्रथम पुरस्कार, मुंबई (२०२२)
७. पद्मगंधा प्रतिष्ठानचा सुधाकुसुम पुरस्कार, नागपूर (२०२३)
८. कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठान, मंचर यांच्यातर्फे पुरस्कार (२०२४)
९. संत नामदेव अखिल भारतीय पुरस्कार, भंडारा (२०२३)
१०. गिरणा गौरव पुरस्कार, नाशिक (२०२३)
११. मराठा मंदिर कादंबरी पुरस्कार, मुंबई (२०२२)
*** इतर पुरस्कार
* मिशिगन, अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या अंक निनाद कथास्पर्धेत प्रथम पुरस्कार (२०२२)
* रेऊ कथास्पर्धेत पुरस्कार (२०२२)
* गुलबर्गा, कर्नाटक येथील भाव अनुबंध कथा स्पर्धेत प्रथम पुरस्कार (२०२२)
* शब्दवेध कथास्पर्धेत पारितोषिक (२०२२)
* नुक्कड साहित्य संमेलनात उदयोन्मुख लेखिका म्हणून पुरस्कार (२०१८)
* नुक्कड साहित्य संमेलनात काही पाऊलखुणा काही आभाळवेणा पत्रमालिकेसाठी "सर्वोत्कृष्ट लेखिका" पुरस्कार (२०१९)
* इंडियन भारत' आयोजित लेखनस्पर्धेत पुरस्कार (२०२०)
* व्यंकटेश माडगूळकर प्रतिष्ठान आयोजित कथास्पर्धेतल्या प्रातिनिधिक कथासंग्रहात कथेची निवड (२०२१)
* विवेक साहित्य मंचातर्फे आयोजित महिला दिनविषयक कथास्पर्धेत उल्लेखनीय कथा म्हणून निवड आणि कथासंग्रहात समावेश (२०२२)
* संवादसेतू आयोजित कथाविशेषांकात सहभागी (२०२२)
* सकाळ, देशदूत, दिव्यमराठी, जनादेश दैनिकांमध्ये स्फुट लेख प्रसिद्ध
* दैनिक दिव्य मराठी व दैनिक जनादेशमध्ये सदरलेखन (२०१८-२०१९)
* अनेक दिवाळी अंकांमध्ये साहित्य प्रसिद्ध
* ‘एला’ या प्रातिनिधिक कथासंग्रहात सहभाग (२०२०)
* अनेक व्यासपीठांवर कविता सादरीकरण
*** इतर उपक्रम
* Indian doctors for peace and development ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेसाठी काम. त्यातल्या शिष्टमंडळात आग्रा, गोवा आणि दिल्ली येथील परिषदांसाठी निवड (२००६-२००७)
* IDPD च्या उपक्रमाचा भाग म्हणून लिहिलेला नाट्यप्रवेश फिनलँड येथे सादर (२००६)
* नाशिक आकाशवाणीवर बालनाट्यासाठी आवाज दिला.
* अस्ताचल ह्या आनंद जोर्वेकर ह्यांच्या कवितांवर आधारित कवितांच्या नाट्याविष्कारात सहभाग (२०००)
* ‘ वेचलेली नक्षत्रे’ ह्या नाशिक आकाशवाणीवर प्रसारित कार्यक्रमात कवितांचे सादरीकरण. (२००१)