Home / Authors / Dr. Himmatrao Bawaskar, Penned by - Sumedh Wadawala (Risbud) | डॉ. हिम्मतराव बावस्कर शब्दांकन सुमेध वडावाला (रिसबूड )
Dr. Himmatrao Bawaskar, Penned by - Sumedh Wadawala (Risbud) | डॉ. हिम्मतराव बावस्कर शब्दांकन सुमेध वडावाला (रिसबूड )

डॉ.हिम्मतराव साळूब बावस्कर हे मूळचे देहेड तालुका भोकरदन जिल्हा जालना महाराष्ट्र येथील एका शेतकरी कुटुंबातून अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात नाव कमावलेले संशोधक आहेत. त्यांना २०२२ साली पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.

* खास करून कोकणात महाड येथे काम करत असतांना त्या ठिकाणी नेहमीच विंचू दंश झाल्याच्या घटना घडत व त्यासाठी उपचार मिळणं दुर्गम भागात कठीण काम होते त्यासाठी या विषयावर त्यांनी भरीव काम केलेले असून त्याबाबत त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत.

* ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहून काम करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक भारतीय डॉक्टर आहेत. त्यांचे वैद्यकीय संशोधणार लेख ब्रिटिश मेडिकल जर्नल, द लँसेटमध्ये प्रकाशित झाले आहेत.

* ते विंचू विषबाधेच्या उपचारांवरील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत.

* वैद्यकीय पेशातील भ्रष्टाचारविरोधी लढ्यात बावस्कर सहभागी आहेत



सुमेध वडावाला तथा मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड हे एक मराठी लेखक आहेत.

*** पुस्तके
* अनुभवंती (कथासंग्रह)
* आई ती आईच (आत्मकथन, आठवणी)
* काही काही माणसं! (कादंबरी)
* चित्रं (कथासंग्रह)
* तृष्णा (कादंबरी)
* दोन चाकं झपाटलेली (प्रवासवर्णन)
* थोरवी (माहितीपर)
* धर्मयुद्ध (कथासंग्रह)
* पुस्तक उघडलं (कथासंग्रह)
* प्रदीप लोखंडे, पुणे- १३ (चरित्र)
* बावन्‍नकशी (कथासंग्रह)
* ब्रह्मकमळ (कादंबरी)
* मनश्री (व्यक्तिचित्रण, या पुस्तकाला २००८-०९चा महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला.)
* मी, नंदा (आत्मचरित्र, सहलेखिका डॉ. नंदा केशव मेश्राम)
* रुपाली रेळेची सागरी झेप : जल आक्रमिले
* संदर्भासहित स्पष्टीकरण (कादंबरी)
* सफाई (कादंबरी, सहलेखक - उत्तमकुमार जैन)
* सांजवा (कथासंग्रह)
* 'साठे' उत्तरांची कहाणी : नामवंत अर्थतज्ज्ञांचं वेधक आत्मकथन
* सामक्षा (कथासंग्रह)
* हेडहंटर - असे शोधले जातात कॉर्पोरेट जगतातले ’डिसिजन मेकर्स’

*** पुरस्कार आणि सन्मान
* २००८-०९ सालचा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार (मनश्री या कादंबरीला)
* रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड येथे २० ऑक्टोबर २०१३ रोजी भरलेल्या एकदिवसीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
* वत्सला बाळकृष्ण अंबाडे (लेखिका डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांच्या मातोश्री) यांच्या स्मरणार्थ दिला गेलेला साहित्य पुरस्कार (७ फेब्रुवारी २०१६)

Dr. Himmatrao Bawaskar, Penned by - Sumedh Wadawala (Risbud) | डॉ. हिम्मतराव बावस्कर शब्दांकन सुमेध वडावाला (रिसबूड ) ह्यांची पुस्तके