डॅा.अनुराग श्रीकांत लव्हेकर
शिक्षण : एम् बी बी एस्. , एम् डी. (मेडिसीन), डी. एम् (गॅस्ट्रोएंटेरॅालॅाजी व हिपॅटॅालॅाजी)
त्रिवेणी हॅास्पिटल, कैलासनगर, नांदेड.
* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, येथून पदवी प्राप्त.
* एन के पी सीम्स, नागपूर व जे एस एस वैद्यकीय महाविद्यालय, मैसूर येथून पदव्युत्तर शिक्षण.
* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड, सेंट जॅान्स हॅास्पिटल बेंगलोर,
* केअर हॅास्पिटल रायपूर, गॅलॅक्सी हॅास्पिटल, नांदेड, सागर हॅास्पिटल बेंगलोर येथे पदव्युत्तर कामाचा अनुभव.
* राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या परिषदांमधून व नियतकालिकांमधून अनेक शोधनिबंधांचे सादरीकरण व प्रकाशन.
‘* निनाद फाउंडेशन, नांदेड’ या आरोग्य व शिक्षणक्षेत्रात कार्यरत समाजसेवी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष. अवयवरोपण क्षेत्रातील कार्याबद्दल सह्याद्री हॅास्पिटल, पुणेतर्फे सन्मान.
* ‘सेवार्थ क्लिनीक’ हा धर्मार्थ दवाखाना नांदेड येथे कार्यरत.
सर्पदंश प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दर वर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला गम बूटांचे वाटप व तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन.शेकडो शेतकऱ्यांना लाभ.
* अनेक रक्तदान शिबिरे व आरोग्य शिबिरांचे आयोजन. अनेक कॅन्सरग्रस्त रूग्णांना सर्जरी व केमोथेरपीकरता थेट सहाय्य.
* आरोग्यविषयक प्रश्नांवर जनजागृतीसाठी ‘ Ninad Foundation ‘ हे मराठी यू ट्यूब चॅनल. सियाचीन येथे सैन्यासाठी नागरिकांतर्फे उभारल्या जाणाऱ्या ॲाक्सिजन प्लॅंटकरिता योगदान.
* भटक्या व विमुक्त समाजातील सर्वार्थाने निराधार मुलांसाठीची गोंदिया येथील ‘पालावरची शाळा’ संस्थेतर्फे दत्तक.
* नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ईयत्ता नववी व दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे दर वर्षी वाटप केले जाते. शेकडो लाभार्थी.
* ग्रामीण भागातील आरोग्य व शिक्षण सेवा सुधारण्यासाठी संस्थेतर्फे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
* वाचन, प्रवास, भटकंती,लेखनाची आवड.
इतिहास आणि भूगोल ही विशेष आवडीची क्षेत्रे.
* जागतिक घडामोडी व राजकारण व त्यांची भारताच्या प्राचीन परंपरा, संस्कृती, आस्था, लोकजीवन, मध्ययुगीन इतिहास व सद्य परिस्थिती यांच्यांशी सांगड घालण्याच्या प्रयत्नातून ‘ वसुंधरेचे शोधयात्री ‘ हा साहसी दर्यावर्द्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा पहिला ग्रंथ यावर्षी राजहंस प्रकाशन संस्था, पुणे तर्फे प्रकाशित. अन्य अप्रकाशित स्फुट लेखन.