शिक्षण: एमबीबीएस एमडी - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर १९७२
अभय बंग (सप्टेंबर २३, इ.स. १९५० – हे डॉक्टर आहेत. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात.
* अभय हे वर्ध्याजवळ सेवाग्राम आश्रमात वाढले. गांधीजीनी सुरु केलेल्या नयी तालीम या शिक्षणपद्धतीत त्यांचे शिक्षण झाले. कार्ल टेलर यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले.
* डॉक्टर झाल्यावर त्यांनी वर्ध्याजवळ कान्हापूर आणि महाकाळ या गावात वैद्यकीय काम सुरु केले. कालांतराने त्यांनी चेतना विकास ही संस्था सुरु केली आणि त्यामार्फत रोजगार हमीच्या मजुरांचे संघटन सुरु केले.
* बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप (मॉडेल) वापरतात.
* महाराष्ट्र शासनाच्या 'बालमृत्यू मूल्यांकन समिती' चे ते अध्यक्ष होते.
* आदिवासी आरोग्य तज्ञ समिती' चे ते अध्यक्ष होते. सध्या भारत सरकारचे आरोग्य धोरण ठरविणा-या सर्वोच्च Central Health Council व राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन चे तज्ञ सदस्य आहेत.
* वैद्यकीय नियतकालिक द लॅन्सेटमध्ये त्यांचे अनेक लेख छापून आलेले आहेत. त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
*** पुरस्कार :
१. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी. लिट. ही सन्माननीय पदवी
२. २००३ सालचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार.
३. २०१८ सालचा पद्मश्री पुरस्कार.
४. 'माझा साक्षात्कारी ह्रदयरोग" या पुस्तकाला न.चिं. केळकर वाड्मय पुरस्कार (२०००)
५. टाइम ने ग्लोबल हेल्थ हिरो
६. द लॅसेन्टने 'पायोनियर ऑफ रुरल हेल्थ इन इंडिया
७. डब्लू. एच. ओ. चे 'चॅम्पियन ऑफ पब्लिक हेल्थ'
*** राजहंस प्रकाशित साहित्य:
* माझा साक्षात्कारी हृदयरोग
* या जीवनाचे काय करू ?
*** साहित्यिक कामगिरी
* डॉ. अभय बंग यांचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक महाराष्ट्रात घरोघरी पोचले आहे. ह्याचे अनुवाद हिंदी व गुजराती मध्ये प्रकाशित झाले आहेत.
* महाराष्ट्रातील बालमृत्यूच्या प्रश्नावर त्यांचा 'कोवळी पानगळ' अहवाल राज्यात गाजला होता.
* भारतातील १० लक्ष 'आशा' कार्यकर्तीच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी व सहका-यांनी ३ भागात लिहिलेली प्रशिक्षण पुस्तके पूर्ण देशात वापरली जातात.
* डॉ. अभय बंग यांचे किंवा डॉ.बंग यांच्यावर लिखाण अमेरिकेतील Time, National Geographics व इंग्लंडमधील गार्डियन व द लॅसेन्ट मध्ये प्रकाशित झाले आहे.
* मराठी साहित्य संमेलन - वर्धा (२०२३) येथे डॉ. बंग यांची प्रदीर्घ मुलाखत घेण्यात आली.
* मराठी साहित्य संमेलन चंद्रपूर येथे एका परिसंवादाचे ते अध्यक्ष होते.