धनंजय जयंत गोडबोले -
* कॉमर्स ग्रज्युएट असलेल्या धनंजय जयंत गोडबोले यांनी एम. कॉम. आणि मग मॅनेजमेंट मध्ये पदव्युतर शिक्षण घेतले आहे. त्याना ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि सेल्स या क्षेत्रात कामाचा दांडगा अनुभव आहे.
* ॲपल कॉम्प्यूटर्स, मॅक्सवेल पब्लिशिंग ग्रुप, परगमन प्रेस, वाॅल्टर क्लूवर ग्रुप अशा विविध कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
* पुस्तकात उल्लेखलेल्या अपघातापूर्वी ते ऑटोमोबाईल क्षेत्रात ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं काम करत होते. आपल्याला ह्या अपघातानं जगण्याची एक नवीन संधी दिली आणि खूप काही शिकवलं, त्या अनुभवाचा उपयोग इतरांना व्हावा म्हणून ह्या लिखाण प्रपंचाला त्यांनी होकार दिला.
* उद्ध्वस्त होते की काय अशी वाटणारी संसाराची घडी आश्चर्यकारकरित्या पुन्हा नीट बसू शकते, कितीही भयानक संकट आलं तरी त्यातून मार्ग दाखवला जात असतो आणि माणसाच्या इच्छाशक्तीच्या जोरावर टो राखेतूनही भरारी घेऊ शकतो, हेच त्यांच्या प्रवासातून सिद्ध होतं.
*** डॉ. मेघा देऊसकर
* मानसशास्त्र विषयात पदव्युतर शिक्षण घेऊन डॉ. मेघा देऊस कर यांनी २००६ मध्ये पुणे विद्यापीठातून पी एच.डी.ची पदवी मिळवली. त्यांनी योगाचं शिक्षण योग विद्या धाम, नाशिक इथून घेतलं होतं आणि त्यांचा पीएच डी.चा विषयही 'योगनिद्रेव्दारा तणावमुक्ती' असा होता.
* २००५ सालापासून त्या फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापन करतात.
* त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
* पर्सनॅलिटी सायकोलॉजीवरच्या लार्सन आणि बस ह्यांच्या संदर्भ ग्रंथाचे भारतीय रुपांतर त्यांनी केले आहे.
* गेली पंधरा वर्षे त्या समुपदेशन करतात. आपल्या स्मुपादेशानात त्या यौगिक तंत्रांचा वापर करतात.
* योगनिद्रेच्या कार्यशाळांचे आयोजन करतात.
* फर्ग्युसन महाविद्यालयात स्मुपादेशनाचा एक वर्षाचे प्रशिक्षण देणारा कोर्स त्या सांभाळतात.
* प्रत्येक व्यक्ती मुळात परिपूर्ण असते पण प्रतिकूल परीस्थितीतून जात असल्यामुळे तिच्या स्वभावात आणि व्यक्तीकरणात अडथळा येतो. समुपदेशनात प्रत्येक व्यक्तीचं बोलणं काळजीपूर्वक ऐकून घेतलं आणि त्याची मनाची ताकद त्याला परत मिळवून दिली, तर हे अडथळे दूर होतात, अस्म तत्त्वं त्या अवलंबतात.