Home / Authors / Balasaheb Vikhe Patil |बाळासाहेब विखे-पाटील
Balasaheb Vikhe Patil |बाळासाहेब विखे-पाटील
Balasaheb Vikhe Patil |बाळासाहेब विखे-पाटील

एकनाथराव विठ्ठलराव तथा बाळासाहेब विखे पाटील
जन्मदिनांक : ५ मे १९३२
पत्ता : मु़ पो़ लोणी बुद्रुक, ता़ राहाता, जि़ अहमदनगर, पिन- ४१३ ७३६
शिक्षण : एस़ एस़ सी़

व्यवसाय : प्रगतिशील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ता

*** भूषवलेली पदे :
* लोकसभा सदस्य : कोपरगाव मतदारसंघ : १९७१ ते १९९१
* लोकसभा सदस्य : अहमदनगर मतदारसंघ : १९९८ ते १९९९
* लोकसभा सदस्य : कोपरगाव मतदारसंघ : सप्टेंबर १९९९ ते फेब्रुवारी २००४
* केंद्रीय अर्थ राज्यमंत्री (व्यवसाय बँकिंग आणि विमा), भारत सरकार : १३ ऑक्टोबर १९९९ ते १ जुलै २००२
* केंद्रीय उद्योगमंत्री (अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम), भारत सरकार : १ जुलै २००२ ते २४ मे २००३
* लोकसभा सदस्य : कोपरगाव मतदारसंघ : २००४ ते २००९

*** अध्यक्षपद :
* महाराष्ट्र राज्य सहकारी साखरकारखाना संघ लि़ : १९८१ ते १९८४
* महाराष्ट्र राज्य मद्यार्क निर्मिती संघ : १९७७ ते १९८२
* भारत–सोविएत मैत्री संघ, महाराष्ट्र राज्य : १९८० ते १९९१
* महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा ग्रंथपाल महासंघ, मुंबई : १९८२ ते २००१
* महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस : १९७७ ते १९७९
* संस्थापक कार्याध्यक्ष - महाराष्ट्र पाणी परिषद, लोणी, ता. राहाता, जि. अहमदनगर, महाराष्ट्र : १९९५ पासून
* इंडिया वॉटर पार्टनरशिप, नवी दिल्ली : नोव्हेंबर २००३ ते नोव्हेंबर २००४

*** उपाध्यक्ष :
* भारत सोविएत मैत्री संघ, महाराष्ट्र राज्य : १९७५ ते १९८०
* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (आय) : १९८० ते १९८४
* अहमदनगर जिल्हापरिषद : १९६२ ते १९७१
* महाराष्ट्र राज्य सहकारी साखरकारखाना संघ लि., मुंबई : १९८० ते १९८१

*** चेअरमन :
* लोकसभा पिटीशन कमिटी : १९८७ ते १९८९
* लोकसभा कृषी समिती : १९८९ ते १९९१
* राज्यस्तरीय हिशोब समिती, महाराष्ट्र राज्य : १९८८
* महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय शेतमजूर किमान वेतन समिती : १९८७ ते १९८८
* शिक्षण सार्वजनिक बांधकाम समिती, जिल्हापरिषद, अहमदनगर : १९६२ ते १९६७
* कृषी व सार्वजनिक बांधकाम समिती, जिल्हापरिषद, अहमदनगर : १९६७ ते १९७१
* पंचायत समिती, श्रीगोंदा : १९६४ ते १९६६
* प्रवरा सहकारी साखरकारखाना लि. प्रवरानगर : १९६६ ते १९७७, १९७८ ते १९८१ व १९८२ ते १९८७
* महाराष्ट्र शासन नियुक्त उसाचे उत्पादन उतारा वाढीसाठी अभ्यासपथक.
* महाराष्ट्र शासन नियुक्त सहकारी साखरकारखाना व सहकारी संस्था कायद्यात बदल सुचविण्यासाठीची समिती.
* प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर : १९८१ पासून
* सहकारी बँक पुनर्वसन समिती, भारत सरकार : २००१
* संरक्षणविषयी स्थायी समिती, नवी दिल्ली : ५ ऑगस्ट २००४ ते २००९
* अहमदनगर जिल्हा दक्षता समिती : डिसेंबर २००४ ते २००९
* जिल्हास्तरीय विद्युतीकरण प्रभावीपणे राबविणेसाठी जिल्हास्तरीय समिती : २००८ ते २००९

*** खजिनदार :
* महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी (आय) : १९८५ ते १९८९

*** कायम निमंत्रित सदस्य :
* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर २२.९.२०११ पासून

*** सचिव :
* अहमदनगर जिल्हा काँग्रेस समिती : १९६८ ते १९७१

*** प्रवर्तक :
* पारनेर सहकारी साखरकारखाना, पारनेर
* जगदंबा सहकारी साखरकारखाना लि., कर्जत
* वृद्धेश्वर सहकारी साखरकारखाना लि. ता., पाथर्डी
* प्रवरा सहकारी बँक लि. प्रवरानगर

*** संस्थापक सदस्य :
* प्रवरा ग्रामीण नैसर्गिक शिक्षण आणि सामाजिक संशोधन संस्था, लोणी, ता. राहता. (झ्घ्REर्‍ए)
* प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी ब्रुद्रुक, ता. राहाता
* पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंग (पॉलिटेक्निक), प्रवरानगर.
* डॉ. विखे पाटील फौंडेशन, पुणे
* प्रवरा दूध सोसायटी, प्रवरानगर
* पंडित जवाहरलाल नेहरू ललित कला अकादमी, प्रवरानगर
* पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, अहमदनगर
* डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, नाशिक
* शिर्डी साई रूरल इन्स्टिट्यूट, राहाता

*** कुलपती :
* प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (अभिमत विद्यापीठ) लोणी, ता. राहाता (२००४ ते २०१०)

*** संचालक :
* महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ लि. : १९६४ ते १९७७
* महाराष्ट्र राज्य सहकारी साखरकारखाना संघ लि., मुंबई : १९६६ ते १९८८
* राष्ट्रीय साखरकारखाना संघ लि. नवी दिल्ली (१९७६ ते १९९० व कार्यकारी मंडळ सदस्य १९८२ ते १९८६)
* भारतीय साखर निर्यात महामंडळ (१९७९ ते १९८८)
* प्रवरा सहकारी बँक लि. प्रवरानगर (१९७५ ते १९९६)
* पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखरकारखाना लि. प्रवरानगर (१९६६ ते १९९७)
* विविध भागांत अनेक क्षेत्रांत सामाजिक विश्वस्त मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत.

*** सदस्य :
* अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, नवी दिल्ली : नोव्हेंबर २०१० पासून)
* भारतीय कृषी अनुसंधान केंद्र, कार्यकारी समिती, नवी दिल्ली
* राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था, हैद्राबाद
* कार्यकारी समिती, डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट, पुणे : १९७५ ते १९८५
* कार्यकारी समिती, अखिल भारतीय मद्यार्क उत्पादन प्रकल्प संघ, नवी दिल्ली : १९७८ ते १९८९
* डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असो., पुणे (१९७६ पासून)
* राज्य पाटबंधारे समिती
* ऊर्जा व पाटबंधारे सल्लागार समिती : १९७५ ते १९७८
* सल्लागार समिती डाक व तार विभाग
* राज्य साखर वेतन मंडळ : १९६६ ते १९७१
* राज्य कृषीमूल्य निर्धारण समिती : १९७५
* राज्य शासन मजूर वेतन समिती : १९६६
* अखिल भारतीय शांतता व ऐक्य परिषद
* सल्लागार समिती, कृषी, उद्योग, पाटबंधारे, नागरी अन्न पुरवठा, सहकार मंत्रालय, लोकसभा नवी दिल्ली.
* दुय्यम कायदे सल्लागार समिती, लोकसभा, नवी दिल्ली : १९८० ते १९८२
* तांत्रिक शिक्षण सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य : १९८२ ते १९९०
* लोकसभा सरासरी किमती (अंदाज) समिती : १९८० ते १९८२
* महाराष्ट्र आर्थिक विकास समिती (मंडळ)
* महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार उच्चस्तरीय समिती : १९९६ ते १९९७
* प्रवरा सामाजिक अभ्यास मंडळ : १९९२ पासून
* दूरसंचार स्थायी समिती, लोकसभा, नवी दिल्ली : १९९८
* सल्लागार समिती, मानव विकास संशोधन मंत्रालय, नवी दिल्ली : १९९८ व ५ ऑक्टोबर २००४ ते २००९
* अनौपचारिक सल्लागार समिती मध्य व दक्षिण मध्य रेल्वे मंडळ, नवी दिल्ली : १९९८
* विभाग संबंधित व वाणिज्य संबंधी संसदीय स्थायी समिती : ऑक्टोबर २००३ ते फेब्रुवारी २००४
* भारतीय कृषी अनुसंधान केंद्र नवी दिल्ली : २० मे १९८५ ते २० एप्रिल १९८८
* सल्लागार समिती सदस्य इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च नवी दिल्ली : २००६ ते २००९

*** विधीसभा सदस्य :
* महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी : १९६६ ते १९७२ व १९७४ ते १९७९
* सिनेट मेंबर, पुणे विद्यापीठ : १९७५ ते १९७६ व १९८५ ते १९८६
* यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ, नाशिक : १९९७ ते २००९

*** कार्यकारी विश्वस्त :
* प्रवरा ग्रामीण वैद्यकीय ट्रस्ट लोणी, प्रवरा ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय लोणी, ग्रामीण दत्त महाविद्यालय लोणी, अद्ययावत प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी : १९७३ पासून
* शिर्डी साई रूरल इन्स्टिट्यूट, प्रवरानगर : १९९७ पासून

*** विश्वस्त :
* पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, अहमदनगर
* पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, पुणे
* आंतरराष्ट्रीय परिसंवाद सहभाग :
* आंतरराष्ट्रीय साखर तंत्रज्ञ परिषद, ब्राझील (१९९७), क्युबा (१९८२) हवाना (१९८५)
* आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवाद, पॅरीस : १९८४
* आशियायी ग्रामीण आरोग्य परिषद, बिजींग, चीन : १९८८
* विद्यापीठ अभ्यास दौरा, इस्राईल, इजिप्त, यु.के., अमेरिका : १९९७
* सभापती, लोकसभा यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळात मॉस्को, स्पिटसबर्ग येथे भेट व त्यानंतर स्वीडन, अमेरिका व रशिया या देशांना भेटी : १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २००३
* वेगवेगळ्या देशातील विद्यापीठास भेटी, इस्राईल, इजिप्त, युरोप, अमेरिका (१९९७) (न्यूयॉर्क २००६)
* सहावी कृषी वैद्यकीय व ग्रामीण आरोग्य परिषद, (आशिया खंड) ‘ग्रामीण आरोग्य नूतन उपाय नूतन *योजना’ : जानेवारी १९९३
* प्रवरानगर येथील राष्ट्रीय परिषद, ग्रामीण समस्या व माहिती : १९९७
* बुडापेस्ट, हंगेरी येथील जागतिक विज्ञान परिषदेस : जुलै १९९९
* न्यूयॉर्क (युएसए) येथे संयुक्त राष्ट्र संघाने आयोजित केलेल्या ६१व्या चर्चासत्रात भारताच्या वतीने सहभाग : ऑक्टोबर २००६

*** प्रकाशने :
* महाराष्ट्र राज्य उस उत्पादन व सरासरी वाढ होण्यासाठी नेमलेल्या अभ्यास गटाचा अहवाल.
* सहकारातून समृद्धीकडे प्रतिक.
* वृत्तपत्रे व मासिके यांच्या माध्यमातून शेती, ग्रामीण शिक्षण, ग्रामीण आरोग्य, ग्रामीण अर्थकारण, सहकारी चळवळ, साखर उद्योग इत्यादी विषयावर अभ्यासपूर्ण लेख व मुलाखती.

*** मराठी प्रकाशने
* शिक्षण आणि ग्रामीण रोजगार : लोकसत्ता दि. ३०.७.१९९५ व दि.६.८.१९९५
* महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाकडे झालेले दुर्लक्ष आता पुरे : महाराष्ट्र टाईम्स, २६ व २७ जुलै १९९५
* पांढर पेशांच्या स्वप्नातील शेती आणि वास्तव : लोकसत्ता, दि. २२ डिसेंबर १९९६ व बळीराजा एप्रिल १९९७
* राजकीय नेतृत्व वैचारिक दुर्बलतेच्या लाटेत : महाराष्ट्र टाईम्स, दि. १६ डिसेंबर १९९५
* औद्योगिक नीतीतील सरकारचा संभ्रम : लोकसत्ता ७ व १० डिसेंबर १९९५
* असे असावे जाहीरनामे : सकाळ २८ ऑगस्ट व ४ ऑगस्ट १९९६
* सहकार चळवळीतील संघटन एक आढावा : पुढारी १९९६
* सहकारी अवहेलनेचे बळी (खंडकरी शेतकरी) : केसरी, दि. १ जुलै १९९६
* मराठा समाज : काळाबरोबर बदलण्याची तयारी हवी.
* बँका आणि कृषी पतपुरवठा : सामना दि. १५ मे १९९८
* नाठाळ नेतृत्त्वामुळेच राजकीय अधोगती : महाराष्ट्र टाईम्स, दि. १५ डिसेंबर १९९५
* उरले तर तुम्हाला : लोकसत्ता दि. १५ डिसेंबर २००२
* शेतकर्‍यांच्या आत्महत्या - सरत्या शतकाने विचारलेला भेदक प्रश्न : महाराष्ट्र टाईम्स, २८ सप्टेंबर १९८८
* भांडवलदारी शेतीचे मृगजळ - शेती वजा शेतकरी बाकी शून्य : सकाळ ४ ऑगस्ट १९९८

*** इंग्रजी
* Role of agriculture credit in Rural Development.
* Co-operative Vs. coporate and individual farming system Co-operative study (papers submitted in the‘National Seminar on problems and prospects on Rural Development’
held in Nov. 1997 at Pravaranagar M.S.)
* Effective implementation of IRDP- some suggestion (Yojana, May 1991)
* Late Shri Vaikuthabhai Mehata and Pravara Sahakari Sakhar Karkhana Ltd.
* From mixed economy to mixed liberalization (lokmat times 3.4.1994)
* The policy recommendations for fertilizer prices subsidies (A note submitted to Hn'ble Chairman, The Committee on Fertilizer Prices and subsidies, Govit. of India, New Delhi
* Appraisal of integrated Rural Development Programmes (IRDP)

*** पुरस्कार :
* भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित : २६ जानेवारी २०१०
* किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना लि. भुईज, ता. वाई, जि. सातारा यांचा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार : २०.८.२०११
* युनायटेड वेस्टर्न बँकेचे संस्थापक व विमा महर्षी वा. ग. तथा अण्णासाहेब चिरमुले गौरव पुरस्काराने सन्मानित : २००१
* राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान पुणे यांचा सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय बंधुता पुरस्कार : दि. २२.२.२००४, स्थळ - कालिदास मंदिर, नाशिक
* कैलास मठ नाशिक यांचा श्री सरस्वती पुरस्कार : फेब्रुवारी २००६
* सहकारी महर्षी कै. आ. गणपतराव साठे प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा पहिला राज्यस्तरीय सहकारमहर्षी गणपतराव साठे जीवनगौरव पुरस्कार : ११.३.२००६
* पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठान पुणे यांचा मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार : २७ एप्रिल २००६
* पुणे विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार : १० फेब्रुवारी २००७
* काकासाहेब म्हस्के प्रतिष्ठान अहमदनगर यांचा विकास भूषण पुरस्कार : ५ मे २००७
* महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची डॉक्टर ऑफ सायन्स पदवी : २९ नोव्हेंबर २०१३
* कर्मवीर शंकरराव काळे जीवन गौरव पुरस्कार : २००५
* दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि. मुंबई यांचा कै. विष्णू अण्णा पाटील जीवन गौरव पुरस्कार : २०१५
* दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचा लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार : २०१५

*** शिक्षणक्षेत्र :
* ग्रामीण जनता, महिला, भूमिहीन मजूर आणि सामाजिकदृष्ट्या उपेक्षित वर्गाला विविध प्रकारच्या शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या़
* प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण देणार्‍या अनेक शिक्षणसंस्थांची ग्रामीण भागात उभारणी़
* तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण देणार्‍या संस्थांची उभारणी़ त्याद्वारे ग्रामीण औद्योगिक विकास, आरोग्यविषयक जाण आणि स्वयंरोजगारास मौलिक हातभाऱ
* विविध शिक्षणसंस्थांमध्ये अध्यापन आणि व्यवस्थापन विभागांत मिळून हजारो पदांची रोजगारनिर्मिती़ विविध शाखांमधून ४०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणसुविधा़
* विविध अभिनव उपक्रमांमधून ५००० विद्यार्थ्यांना विशेष शिक्षणसंधी़
* `प्रवरा पब्लिक स्कूल' हे ग्रामीण भारतातील पहिले पब्लिक स्कूल़ हे पब्लिक स्कूल इंडियन पब्लिक स्कूल कॉन्फरन्स (नवी दिल्ली) या संस्थेचे सदस्य आहे़
* मुलींनी तंत्रकौशल्य आत्मसात करावे, यासाठी महाराष्ट्रातील पहिल्या `मुलींसाठी तंत्रशिक्षण संस्थे'ची स्थापना़

*** सहकारक्षेत्र आणि ग्रामीण विकासक्षेत्र :
* स्वयंसाहाय्य आणि परस्परसहकार्य यांद्वारे विकासकार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये शेतकर्‍यांना भरीव प्रोत्साहऩ
* नव्या जागतिकीकरणाच्या काळात बेरोजगारी, दारिद्य्र, अज्ञान आणि निरक्षरता या समस्यांवरील उपायांचा विचाऱ
* महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अनेक सहकारी साखरकारखान्यांच्या उभारणीस प्रोत्साहऩ शेतकरी सहकारी पतपेढ्या, ग्रामीण सहकारी बँका, सहकारी

ऊस उत्पादनविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून देणार्‍या आंतरराष्ट्रीय साखरतंत्रज्ञांच्या परिषदांमध्ये ब्राझील आणि क्यूबामध्ये सहभाग़
* ग्रामीण विकास, निरक्षरता-निर्मूलन, आरोग्यविषयक सुविधा अशा योजनांमध्ये सहभाग़
* सहकारातून कृषितंत्रज्ञान आणि कृषिविपणनविषयक महत्त्वपूर्ण गोष्टींची सुरुवात़

*** कृषिक्षेत्र :
* कृषिविकास क्षेत्रातील कार्य पाहून द इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च (ICAR), नवी दिल्ली या संस्थेतर्फे १९९२मध्ये `कृषिविज्ञान केंद्र' सुरू करण्यास मान्यता़ या केंद्राच्या पुढाकाराने दहा लाख छोट्या
आणि मध्यम शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ़
* प्रवरा प्रगती आयटी नेटवर्कच्या माध्यमातून २० गावांमधील १२ प्रवरा संस्थांची जोडणी – त्याद्वारे ८५,००० ग्रामीण कुटुंबे संपर्कक्षेत्रात़ ग्रामीण जनतेला न्न्एAऊ तंत्राद्वारे आधुनिक तंत्रज्ञान पुरवणारे पहिले यशस्वी
प्रारूप़
* कृषिक्षेत्रात आधुनिक तंत्र पुरवणारे विविध प्रशिक्षण उपक्रम़
* क्रेंद्रीय अर्थराज्यमंत्री असताना कृषिक्षेत्र, छोटे शेतकरी आणि शेतमजूर यांच्यासाठी विमासंरक्षणाच्या योजनांना बऴ
* `महाराष्ट्र पाणी परिषद' या स्वयंसेवी संस्थेच्या स्थापनेतून पाण्याचे दुर्भिक्ष्य, दुष्काळ अशा पाणीविषयक समस्यांचा अभ्यास आणि सुचवलेल्या उपाययोजना़

*** अर्थक्षेत्र :
* १९७५ मध्ये `प्रवरा सहकारी बँके'चा प्रारंभ़ ४०० सदस्यांनी प्रत्येकी रू़ ५०००/- ठेवीतून उभारलेल्या रू़ २० लाखाच्या भांडवलातून उभी राहिलेली ही बँक २००३ साली रिझर्व्ह बँकेने `शेडयूल्ड बँक' म्हणून घोषित केली़ आज बँकेचे भागभांडवल रू़ २९९ लाख, तर ठेवी रू़ २४,७१६ लाख इतक्या आहेत़
* मर्यादित उत्पन्नगटास शैक्षणिक अर्थसाहाय्य, अनुसूचित जाती-जमातींना गृहकर्जसाहाय्य, ग्रामीण विकास, ग्रामीण उद्योग आणि सहकारास उत्तेजन, होतकरू तरुणांना स्वत:चा उद्योगव्यवसाय सुरू करण्यास साहाय्य आणि डेअरीव्यवसायास उत्तेजन अशा अनेक उपक्रमांना बँकेतर्फे अर्थसाहाय्य़

*** आरोग्यक्षेत्र :
* `प्रवरा ग्रामीण रुग्णालय' १९७२मध्ये स्थापऩ आज १३०० (२०१६) बेडचे अत्याधुनिक विविध सोयींनीयुक्त़ अनेक वैद्यकीय तज्ज्ञ कार्यरत़ या रुग्णालयातर्फे ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेतली
जाते आणि जनतेला परवडणार्‍या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध केली जाते़
* स्त्री-आरोग्य स्वयंसेविकांमार्फत ५०० खेड्यांमधील आदिवासी जनतेला घरपोच वैद्यकीय सेवा़
* प्रवरा ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना़
* मास्द्रिद, नेदरलँड विद्यापीठ (लिंबर्ग), पेक्स विद्यापीठ (हंगेरी) आणि लिंकोपिंग विद्यापीठ (स्वीडन) यांच्या सहकार्याने प्राध्यापक-विद्यार्थी-संशोधक यांच्या देवाणघेवाणीतून आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनकार्यात या महाविद्यालयाचा सहभाग़
* या महाविद्यालयास `अभिमत विद्यापीठ' म्हणून मान्यता़
* `प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड एज्युकेशन इन नॅचरल अँड सोशल सायन्सेस' (PIRENS) या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक आणि आर्थिक विकासकार्यास चालना़
* ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती़
* विविध आरोग्य शिबिरांमार्फत लाखो लोकांना लाभ़

Balasaheb Vikhe Patil |बाळासाहेब विखे-पाटील ह्यांची पुस्तके