डॉ. अविनाश बिनीवाले (जन्म १२ मार्च १९४३) हे भाषाभ्यासक आणि बहुभाषाविद् लेखक आहेत. त्यांनी भाषा, भाषाव्यवहार इत्यादी विषयांवर मराठीतून लेखन केले आहे.
* मराठी-डॉइच् (जर्मन) शब्दकोशनिर्मितीच्या त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना मुंबई विद्यापीठाने डी. लिट् पदवीने सन्मानित केले आहे.
*** शिक्षण
* डॉ. अविनाश बिनीवाले यांनी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय येथून जर्मन व संस्कृत ह्या विषयांत बी.ए. ही पदवी प्राप्त केली.
* त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परदेशी-भाषा-विभागातून जर्मन आणि भाषाविज्ञान ह्या विषयांत एम.ए.पदवी प्राप्त केली.
* याखेरीज त्यांनी हैदराबाद येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश ॲन्ड फॉरेन लॅंग्वेजेस येथून परदेशी भाषा म्हणून जर्मनचे अध्यापन या विषयातली पदविका प्राप्त केली आहे.
* "मराठी-डॉइच् शब्दकोश" ह्या शब्दकोशाच्या निर्मितीसाठी मार्च २०१९ मध्ये मुंबई विद्यापीठाची डी. लिट् (D. Litt.) ही सर्वोच्च पदवी डॉ. अविनाश बिनीवाले यांनी मिळवली. ह्या पहिल्याच कोशाचे काम सुमारे ४० वर्षे चालू होते.
* १९६३ सालापासून जर्मन भाषा आणि साहित्य या विषयाचे अध्यापन केले. डॉ. अविनाश बिनीवाले यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात जर्मन भाषेचे अध्यापन केले आणि ह्याच महाविद्यालयातून जर्मन-विभागाचे विभागप्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले.
* पदवी स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना भूगोल या विषयाचे अध्यापन त्यांनी केले. उद्योगक्षेत्रात भाषांतरकार/दुभाषी म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले. १९६७ मध्ये महाराष्ट्र शिक्षणसेवेत राजपत्रित अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या रशियन भाषा पदविका अभ्यासक्रमाचे ७ वर्षे त्यांनी अध्यापन केले.
* मुंबई विद्यापीठाद्वारे अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्यासाठी चालवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात त्यांनी मराठीचे अध्यापन केले. परदेशातील विशेषतः फ्रेंच तसेच जर्मन विद्यार्थी/अभ्यासक ह्यांना हिंदी शिकवण्याचे काम ते करतात.
* सन १९८० आणि १९८९ मध्ये जर्मनीतील ग्यॉटिङनच्या ग्योटऽ इन्स्टिटूट्मध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले
*** भाषा अभ्यास
* मराठीच्या जोडीने संस्कृत, हिन्दी, गुजराती, बंगाली, सिन्धी, असमीया ह्या भारतीय भाषा डॉ. बिनीवाले यांना अवगत आहेत. याजोडीने जर्मन, फ्रेंच, रशियन, इंग्रजी या भाषांचा त्यांचा अभ्यास आहे
* भाषाविषयक पुस्तके
अ.क्र. ग्रंथनाव प्रकाशक स्थळ प्रकाशन वर्ष
१. भाषा - आपली सर्वांचीच राज्य मराठी विकास संस्था , मुंबई २०००
२. भाषाकारण मुद्रा प्रकाशन, विरार २००२
३. बोलु कवतिकें राजहंस प्रकाशन पुणे २००५
४. माय मरो पण ... राजहंस प्रकाशन पुणे २००५
५. शब्दगन्ध गौतमी प्रकाशन नाशिक २००७
६. भाषा घडतांना गौतमी प्रकाशन नाशिक २००७
७. भाकरीची भाषा डायमण्ड पब्लिकेशन पुणे २००९
८. परिसस्पर्श डायमण्ड पब्लिकेशन पुणे २००९
९. आवडतं व्याकरण अक्षरदालन प्रकाशन कोल्हापूर २०१५
१०. ओऽडर् ते राइन् अक्षरदालन प्रकाशन कोल्हापूर २०१५
११. भाषा - आपली सर्वांचीच राज्य मराठी विकास संस्था मुंबई २०२०
२०. भाषासौष्ठव महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ मुंबई २०२४
*** भाषा शिक्षणासाठी लिहिलेली पुस्तके
अ.क्र. ग्रन्थनाम प्रकाशक स्थळ प्रकाशनवर्ष
१. जर्मन भाषा परिचय फडके प्रकाशन कोल्हापूर १९८३
२. जर्मन शिकू या स्नेहल प्रकाशन पुणे १९९५
३. जर्मन शिका अनमोल प्रकाशन पुणे प्रथमावृत्ति जुलै २०००,
द्वितीयावृत्ति डिसेंबर २०००,
तृतीयावृत्ति २००१,
सुधारित चतुर्थावृत्ति २००३
४. जर्मन शिका नितीन प्रकाशन पुणे प्रथमावृत्ती २००६,
षष्ठावृत्ति २००९
५. झटपट जर्मन नितीन प्रकाशन पुणे २००४
६. जर्मनचा श्रीगणेशा गौतमी प्रकाशन नाशिक २००४
७. जर्मनचा श्रीगणेशा विराज प्रकाशन मुंबई २००४
८. जर्मन शिका (सुधारित) नितीन प्रकाशन पुणे २००९
९. जर्मन संभाषण वसुधा प्रकाशन नाशिक २०१३
१०. Model Handbook to Lernziel Deutsch (Oxford University Press) नवी दिल्ली २०००
११. जर्मन सीखिए (हिन्दी) अनमोल प्रकाशन पुणे २००२
१२. जर्मन शीखो (गुजराती) प्रवीण प्रकाशन राजकोट २००३
१३. German - Let’s learn it! व्हिजन पब्लिकेशन पुणे २००६
१४. ABC of German करिअर पब्लिकेशन नाशिक २००७
१५. जर्मन भाषा का श्रीगणेश (हिन्दी) नितीन प्रकाशन पुणे २००८
१६. जर्मन भाषा (असमीया) असम बुक हाइव् गुवाहाटी २०१४
१७. फ्रेंच भाषेचा श्रीगणेशा मुद्रा प्रकाशन विरार २००५
१८. ABC of French करिअर पब्लिकेशन नाशिक २००७
१९. फ्रांसिसी भाषा का श्रीगणेश (हिन्दी) नितीन प्रकाशन पुणे २००८
२०. फ्रेंच सम्भाषण वसुधा प्रकाशन नाशिक २०१४
*** कोशसाहित्य
अ.क्र. ग्रन्थनाम प्रकाशक स्थळ प्रकाशनवर्ष
१. मराठी-जर्मन व्यवहारोपयोगी शब्दकोश नितीन प्रकाशन पुणे १९९८
२. सुलभ हिन्दी-मराठी कोश के. भि. ढवळे प्रकाशन मुंबई २००१
३. डॉइच्-मराठी-इंग्लिश शब्दकोश व्हिजन प्रकाशन पुणे २००६
४. मराठी-जर्मन व्यवहारोपयोगी शब्दकोश
(सुधारित व विस्तारित आवृत्ती) नितीन प्रकाशन पुणे २००६
५. मराठी-डॉइच् शब्दकोश साहित्य संस्कृति मण्डळ मुंबई २०१२
६. जर्मन-मराठी भाषांतर शब्दकोश वसुधा प्रकाशन नाशिक २०१४
७. जर्मन-मराठी/सिन्धी शब्दकोश सिन्धु प्रकाशन पुणे २०१४
*** पुरस्कार
१. * 'भाषा - आपली सर्वांचीच' ह्या पुस्तकासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार (२००१)
२. * 'जय कैलाश' ह्या कादम्बरीसाठी हिन्दी साहित्य अकादमीचा पुरस्कार (२०१४)
३. * महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे 'डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार' (२७.२.२०१८)