श्री. अरविंद नारळे हे मूळचे विदर्भातील काटोल गावचे रहिवासी. त्यांनी खडगपूरच्या आय.आय.टी. मध्ये बी. आर्च. च्या पाचही वर्षी गुणवत्ता -शिष्यवृत्ती मिळवली असून १९६३ मध्ये आर्किटेक्चरच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता.
* १९६५ मध्ये त्यांनी 'कनेडियन कॉमनवेल्थ स्कॉलरशिप' मिळवली.
* १९६५ मध्ये अल्बर्टा येथील 'बॅम्फ स्कूल ऑफ फाईन आर्टस' मध्ये तैलचित्र व रंगीत छायाचित्रणाचा अभ्यास करण्यासाठी त्यांना विशेष अनुदान देण्यात आले होते.
* १९६६ साली 'युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटो' मधून एम. आर्च (अर्बन डिझाईन) ही पदवी प्राप्त केली.
* १९६६ पासून 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् चे सभासद.
* १९७३ पासून 'ओंटारिओ असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् चे सभासद.
* कॅनडामध्ये त्यांनी कित्येक इमारतींचे आराखडे बनविले आहेत.
* अलीकडेच, आपले जन्मस्थान काटोल येथील विश्वेश्वर वाचनालयाच्या इमारतीच्या पुनर्निर्मितीचा आराखडा त्यांनी बनविला आहे.
* शिल्पशास्त्राशिवाय गृहसजावट आणि जलरंग व तैलरंग या माध्यमांतील चित्रकलेत त्त्यांना उत्तम गती आहे.
* टोरांटोतील 'रायरसन पाॅलिटेक्निकल इन्स्टिट्यूट'मध्ये त्यांनी चित्रकलेचे वर्ग चालवले आहेत.
* Water (१९९१) व 'Sounds of Zilpa' हे दोन प्रायोगिक लघुपटही त्यांनी बनविले आहेत.
* १९९३ मध्ये टोरांटोतील ओंटारिओ असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् व
* १९९५ मध्ये 'ओकीफ सेंटर' या दोन सभागृहांत त्यांनी चित्रकलेचे प्रदर्शन भरविले होते.
* १९९३ मध्ये कनेडियन फाईन आर्टस् काँपिटिशन' मध्ये यांनी सन्मानपूर्वक नामोल्लेख प्राप्त केला.
* १९९३ मधे 'For the love of Simple Linework' हे यांचे पुस्तक प्रकाशित झाले.
* ओंटारिओ आणि ब्रिटीश कोलंबिया या दोन्ही प्रांतातील शिक्षण खात्याने हे पुस्तक शिक्षण क्रमातील पाठ्यपुस्तक (text book) म्हणून स्वीकारले आहे. हे पुस्तक भारतात इंग्रजी व मराठी भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे.
* १९९३ मध्ये For the love of Watercolor' हे त्यांचे दुसरे पुस्तक कॅनडात प्रकाशित झाले.
* आपल्या व्यवसायानिमित्त आणि पर्यटनाची आवड म्हणून भारत, इटली, फ्रान्स, ग्रीस, इजिप्त, इंग्लंड, कॅनडा व अमेरिका या देशांत त्यांनी बराच प्रवास केला आहे.