जन्मतारीख: 15 ऑगस्ट 1950
शिक्षण: केमिकल इंजिनीयर, IIT, मुंबई
*** राजहंस प्रकाशित साहित्य:
१. बोर्डरूम
२. नादवेध
३. किमयागार
४. अर्थात
५. नॅनोदय
* अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे.
*** शैक्षणिक अर्हता
* दहावीच्या परीक्षेत सोळाव्या क्रमांकाने उत्तीर्ण .
* पहिली ते आय.आय.टीच्या जवळजवळ सर्व परीक्षांत त्यांनी गणितात सर्वोच्च गुण पारितोषिके मिळवली.
* भारतीय तंत्रज्ञान संस्थेमधून १९७२ साली उत्तीर्ण झालेले (आयआयटीचे) केमिकल इंजिनिअर आहेत.
*** कारकीर्द
* अच्युत गोडबोले यांनी एकेकाळी संगणक आणि त्याचं तंत्रज्ञान समजायला जड जात आहे; म्हणून चक्क ती नोकरी सोडायचा निर्णय घेतला होता. मात्र पुढे त्यांनीच संगणकाशी संबंधित असलेल्या अनेक जगद्विख्यात कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार म्हणून पदे सांभाळली;
* अमेरिकेतल्या "वर्ल्ड ट्रेड सेंटर‘च्या ५०व्या मजल्यावर कार्यालय स्थापून कंपन्यांच्या वतीने काही कोटींचे करार-मदार केले आणि संगणक या विषयावर ७००-८०० पृष्ठांचे चार चार ग्रंथही लिहिले.
* वर्षाला दोन कोटी रुपये पगाराची नोकरी नाकारून अच्युत गोडबोले यांनी केवळ लेखनालाच वाहूनही घेण्यासाठी संगीत, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, , मानसशास्त्र , या विषयात लिखाणाला सुरुवात केली.
*** अच्युत गोडबोले यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
* ‘मनकल्लोळ भाग १ व २ (सहलेखिका नीलांबरी जोशी)’ या पुस्तकाला मसापचा पुरस्कार (२६-५-२०१७)
* ‘नादवेध’, ‘किमयागार’, ‘अर्थात’, नॅनोदय’ आणि ‘मनात’ या पुस्तकांना राजशासनासह अनेक मानाचे पुरस्कार.
* आय.बी.एम.तर्फे दोनदा, भारताच्या पंतप्रधानांकडून दोनदा पुरस्कार.
* उद्योगरत्न पुरस्कार
* आयआयटीचा प्रचंड मानाचा ‘डिस्टिंग्विश्ड ॲल्युमिनस’ पुरस्कार
* भीमसेन जोशी यांच्या हस्ते कुमार गंधर्व पुरस्कार.
* अनेक मान्यवर संस्थांचे जीवनगौरव पुरस्कार
* TED या प्रचंड प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय भाषणमालिकेत भाषण देण्याचा बहुमान
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘युवा साहित्य-नाट्य संमेलना’चे अध्यक्षपद
* वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळात आणि बहुरंगी बहर[३][४][५] यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
*** सुलभा पिशवीकर
* सुलभा शरद पिशवीकर (माहेरच्या गोडबोले) या एक शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिका असून संगीत विषयावर लिहिणाऱ्या लेखिका आहेत.
* सुलभा पिशवीकर या एस.एस.सी. च्या परीक्षेत महाराष्ट्र बोर्डात आठव्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांना बोर्डाचे 'चॅटफील्ड पारितोषिक' आणि मराठीचे 'पद्मसेना बाबूराव जोशी पारितोषिक' मिळाले होते.
* पुणे विद्यापीठाच्या बी.ए. परीक्षेत अर्थ शास्त्राचे 'कोल्हटकर पारितोषिक'
* एम. ए. (अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र )
* १९६७ ते २००१ या काळात राज्यशास्त्रचे महाविद्यालयीन अध्यापन.
* श्यामराव बेंद्रे, पं. प्रभूदेव सरदार, सरदारबाई कारगदेकर, गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण.
* पुणे विद्यापीठ युवक महोत्सवात दोन वेळा शास्त्रीय संगीताचे, 'नाट्याचार्य काखादिलकर पारितोषिक'.
* आकाशवाणी आणि दूरदर्शनची अर्हताप्राप्त कलाकार.
* महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर प्रतिष्ठित संगीतमंडळे आणि संगीत-संमेलनात गायन.