शिक्षण : B.Arch (Architecture) (Pune University) 1998-2002
M. Tech.(Urban & Regional Planning (CEPT University, Ahmedabad) 2003-2005 (शहर आणि प्रादेशिक नियोजन) पदव्युत्तर शिक्षण
*** नोकरी : १२ वर्षे अध्यापनाचा अनुभव.
सप्टेंबर २०१० पासून मविप्र संस्थेच्या वास्तुकला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत.
* वास्तुकलेचे तज्ज्ञ म्हणून विविध वास्तुकला महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन . तसेच विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन.
* उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय स्तरावर 'बिर्ला व्हाईट युवारत्न पुरस्काराने सन्मानित.
*** व्यवसाय
* १८ वर्षे वास्तुकला क्षेत्राचा अनुभव.
* अभिकृती आर्किटेक्टस नावाची वास्तुकलेची संस्था स्थापन केली असून त्या माध्यमातून अनेक इमारती, संकुले, विद्यालये, इस्पितळे इ. प्रकल्पांची रेखीव रचना महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्रा बाहेर साकारली आहे.
* इमारतीमधील अंतर्गत सजावट आणि लँडस्केप ह्यांच्या पण रचना विविध प्रकल्पातून साकारल्या आहेत. तज्ज्ञ म्हणून प्र्क्प रचनेसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी.
*** छंद
* चित्रकलेची आवड असून जपान मधील 'योकोहामा येथील आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात कला सादर करण्याचे भाग्य लाभले आहे.
* छायाचित्रणाचा छंद असून त्या माध्यमातून विविध छायाचित्रांचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला आहे.
* खेळात शालेय जीवनापासून विशेष रुची असून विविध मैदानी खेळांमधून तालुका, विभाग आणि राज्य, विद्यापीठ इत्यादी स्तरावर विविध पुरस्कार मिळाले आहेत.
*** पुरस्कार
* सूर्योदय काव्य सरिता पुरस्कार २०२१ - समांतर काव्य संग्रहाला पहिल्या आखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात, जळगाव येथे राज्यस्तरीय पुरस्कार पदान झाला.
* अक्षरगंध पुरस्कार २०२१ - अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान (कल्याण) या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक स्पर्धेमध्ये २०२१ चा अक्षरगंध पुरस्कार कल्याण येथे समांतर काव्य संग्रहाला प्रदान करण्यात आला.
* शिवछत्रपती साहित्य गौरव पुरस्कार २०२१ - महाराष्ट्र साहिय परिषद शाखेचा साहित्य गौरव पुरस्कार चाकण येथील शश्री शिवाजी विद्या मंदिर येथे समांतर काव्य संग्रहाला प्रदान करण्यात आला.
* उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२२ - अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ (ललित व्दितीय)