ISBN No: 
978-81-7434-930-9

पॉप, रॉक, जॅझ, कंट्री, डिस्को --
गेल्या पिढीनं नावंच ऐकलेले हे पश्चिमी संगीतप्रकार.
आजची तरुणाई मात्र त्यांच्या धुंद सुरांवर डोलतीय,
त्यांच्या झिंग आणणा-या तालावर थिरकतीय.
पण हे संगीतप्रकार म्हणजे
केवळ कानांवर पडणा-या (की आदळणा-या?) सुरावटी नाहीत.
पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रवासातील
वेगवेगळ्या पाऊलखुणा म्हणजे हे संगीतप्रकार.
संगीताची समाजाशी असलेली सांगड
दाखवणारे हे संगीतप्रकार.
बेदरकार जगणा-या अन् गाणा-या माणसांच्या प्रतिभेतून
साकारलेले हे संगीतप्रकार.
या सा-या संगीतप्रकारांची केवळ 'माहिती' नाही,
तर 'अनुभव' देणारं -
जीवनशैली अन् संगीताचा अनुबंध उलगडणारं -
मायकेल जॅक्सन - रिकी मार्टिनपासून
मडोना - शकिरापर्यंतच्या कलाकारांच्या
रंगीबेरंगी स्वरचित्रांना शब्दांतून रेखाटणारं
लयपश्चिमा

पृष्ठसंख्या: 
254
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
October, 2015
ISBN No: 
978-81-7434-853-1

डॉ. विद्याधर ओक हे ज्येष्ठ हार्मोनियमवादक,
तसेच रागसंगीताचे व्यासंगी अभ्यासक.
संगीताच्या ध्यासापोटी औषधविज्ञानक्षेत्रातील करियर सोडून
संगीतसंशोधनात रमलेले संशोधक कलावंत.
आपल्या कल्पक संशोधनातून
श्रुतींची संख्या आणि स्थाने त्यांनी निश्चित केली.
जगभरात मान्यताप्राप्त या संशोधनाचे फलित म्हणजेच
22 श्रुती हार्मोनियम.
जिद्द, चिकाटी अन् अथक परिश्रमाने भरलेली
त्यांची ही शोधगाथा सांगत आहेत
प्रख्यात संगीतसमीक्षक आणि पत्रकार सदाशिव बाक्रे.
श्रुतिविज्ञान व रागसौंदर्य

किंमत: 
रु. 200
सद्य आवृती: 
March, 2015

उभयगानविदुषी डॉ. श्यामला जी. भावे.

हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन्ही
अभिजात संगीतशैलींमध्ये पारंगत ख्यातकीर्त गायिका.

पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, वडील आचार्य गोविंदराव भावे अन्
आई लक्ष्मीबाईंची संगीतसाधनेची परंपरा
पुढे नेणाऱ्या समर्थ वारसदार.

गायन-वादनापासून नृत्यापर्यंत विविध कलाक्षेत्रांत
मुद्रा उमटवणाऱ्या प्रतिभावान कलाकार.

भारतीय संगीताच्या दोन्ही संगीतशैलींमध्ये अप्रतिहत संचार करणाऱ्या
या उभयगानविदुषीची सुरेल गानयात्रा

किंमत: 
रु. 200
सद्य आवृती: 
January, 2015
ISBN No: 
978-81-7434-808-1

तबल्याचे बोल जसे ऐकता येतात, तसे लिहिता येतात का?
हे बोल लिहिण्याची आजची पध्दत परिपूर्ण आहे का?
हे बोल लिपिबध्द करण्यासाठी
अधिक सोपी, अधिक नेटकी, अधिक सुयोग्य पध्दत वापरता येईल का?
तबलावादनाचा साकल्याने विचार करून
त्यातील जाती आणि पट या दोन्हींचा समावेश करून
रचलेली सोपी अन् नेमकी लिपी
तबला लिपी

पृष्ठसंख्या: 
304
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
January, 2015
ISBN No: 
978-81-7434-785-5

डॉ. अशोक दा. रानडे यांच्या लिखाणातून नेहमीच वाचकाला संगीताबद्दलची नवी नजर मिळते.
संगीतातील सृजनप्रक्रियेपासून सादरीकरणापर्यंत अनेकविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या त्यांच्या लेखमालांचे निवडक संकलन म्हणजे हा ग्रंथ.
शास्त्रोक्त संगीत, विविध संगीत-परंपरा, नाट्य-संगीत, भावगीत-गायन, संगीतातील साहित्यिक अंग अशा विविध विषयांची मार्मिक मांडणी हे या ग्रंथाचे आगळे वैशिष्ट्य. जयदेव-बैजू-होनाजी अशा इतिहासातून डोकावणाऱ्या कलाकारांपासून रवींद्रनाथ टागोर, गजाननबुवा जोशी, सुब्बलक्ष्मी ते लता मंगेशकर अन् आशा भोसले अशा कित्येक कलाकारांशी डॉ.रानडे वाचकाचे अलगद बोट धरून भेट घडवतात.
डॉ. रानड्यांची रसाळ, नर्मविनोदी शैली, अनेक किस्से आणि चुटके यांनी नटलेले हे संगीत विचारप्रवर्तक लिखाण वाचकाला एखाद्या कथा-कादंबरीसारखे गुंतवून ठेवील.
मैफलीत पेशकश करणाऱ्या कलाकारांनी, संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि आस्वादक व अभ्यासक संगीतरसिकांनी संगीतकलेच्या व्यापकतेचे भान येण्यासाठी आवर्जून वाचायलाच हवा असा ग्रंथ.

पृष्ठसंख्या: 
302
किंमत: 
रु. 325
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
October, 2014
ISBN No: 
978-81-7434-784-8

'सूक्ष्मानं स्थूलाचं भान ठेवावं अन्
सूक्ष्माकडे झेपावण्यासाठीच स्थूलाचं अस्तित्व असावं'
हा आहे भारतीय संगीतचा मंत्र
कसा चालतो हा स्थूल-सूक्ष्माचा अंतर्संवाद
कोणत्या तत्त्वांमधून फुलतं हिंदुस्थानी संगीत?
घराण्यांची चौकट जोडावी की मोडावी?
'साथ' म्हणजे काय? अन् संगत म्हणजे?
संगीत हीच अर्चना, तीच साधना, उपासना –
असं मानून तबला–तपश्चर्येत रमलेल्या
तालयोग्याचं संगीताबद्दलचं सखोल, चौफेर चिंतन
आवर्तन

पृष्ठसंख्या: 
212
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
September, 2014
ISBN No: 
978-81-7434-750-3

येथे चित्रित झालं आहे,
लावणीचे विविध रंग-ढंग आणि संग दाखविणारं
संगीत बारीचं जग !
यात कधी कलेची उन्मत्त बेहोषी आहे.
कधी फुटल्यातुटल्या मनाची उदासी आहे.
नाचणा-या मुलींच्या घुंगराचे दमदार आवाज ऐकू येतात.
त्यांच्या विझल्या मनाचे उसासेही जाणवतात.
संगणक युगाच्या चकचकाटाला छेद देणारी
संगीत बारीची स्वतःचीच लुकलुकणारी दुनिया आहे.
या दुनियेची ओळख करून देणारे पुस्तक !

पृष्ठसंख्या: 
205
किंमत: 
रु. 240
सद्य आवृती: 
July, 2014
ISBN No: 
978-81-7434-152-5

जागतिक चित्रपटांच्या इतिहासात चिरस्थायी लेणी बनलेले
गॉन विथ द विंड / द गॉडफादर / कॅसाब्लांका / सायको /
लॉरेन्स ऑफ अरेबिया / 2001 : अ स्पेस ओडिसी
हे हॉलीवुडचे सहा चित्रपट.
पावलोपावली संघर्ष, अडथळे, कोंडी, आणि वैफल्य
अशा भोवंडून टाकणा-या क्षणांनी नाटयपूर्ण बनलेल्या
या त्यांच्या निर्मितिकथा.

पृष्ठसंख्या: 
184
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
1999
सद्य आवृती: 
June, 2013

मराठी माणसाला नाटक हा आणखी
एक अवयव विधात्याने बहाल केला आहे.
असे अनेक कलावंत आहेत की, आपली
वहिवाटीची वाट सोडून नाटकाच्या बिकट
वाटेकडे वळले आहेत. म्हणूनच आपली
मराठी रंगभूमी एक वेगळाच घाट घेऊन
मानाने मिरवित आहे. रंगभूमीच्या या हद्य
आठवणी अगत्याने सांगण्याचा हेतू इतकाच
की, आजच्या पिढीला आपल्या पूर्वसुरींची
ओळख व्हावी, आठवण राहावी नि
त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञता वाटावी.

पृष्ठसंख्या: 
113
किंमत: 
रु. 20
प्रथम आवृत्ती: 
1985
सद्य आवृती: 
March, 1985
ISBN No: 
978-81-7434-332-1

'नादवेध' ही हिंदुस्थानी रागांना सगुण साकार करून
गान-रसिकांपुढे उभी केलेली 'अक्षर-मैफल' आहे.
ओळखीचेच, परंतु वेगवेगळे राग, बंदिशी, त्यावरील गीते
आणि त्या त्या रागाच्या स्वभावाला अनुरूप काव्यपंक्ती,
अशा चहुबाजूंनी हा नादसोहळा रंजक आणि प्रत्ययकारी
बनला आहे.
नाटयगीते, चित्रगीते, भावगीते, मैफिली,
आठवणी आणि किस्से...
हव्याहव्याशा या नादप्रवासात वाचक बघता बघता रागांचा
अनुरागी श्रोता बनून जातो.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2005-06
पृष्ठसंख्या: 
254
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2005
सद्य आवृती: 
October, 2011