ISBN No: 
ISBN 978-81-7434-554-7

गवंडीकाम करणा-या गृहस्थाची ती मुलगी.
सुदृढ, हसरी, खेळकर!
हौशीनं शाळेत जाणारी!
दोनदा दहावी अनुत्तीर्ण झाली, तसं
घरच्यांनी लग्न उरकलं.
काहीच न कमावणारा एडसग्रस्थ नवरा.
धाकात ठेवणारं सासर.
पाच वर्षांत नव-याचा मृत्यू.
हिला एडसची बाधा झालेली आणि पदरात छोटा मुलगा.
मग डॉक्टर ... समुपदेशक...!
सगळीकडे अंधारच!
मृत्यूच्या कल्पनेनं हादरली. पार खचली.
पण भेट झाली अॅडव्होकेट रामचंद्र परदेशी यांची.
त्यांनी दाखविलेल्या पणतीच्या मिणमिणत्या प्रकाशात
ही धीरानं पुढे झाली.
शिक्षण घेतलं. नोकरी मिळवली.
पाय घट्ट रोवून उभी राहिली.
इतरांना पणतीचा प्रकाश दाखवू लागली.
या पुस्तकात ती सांगते आहे,
तिचं हे अवघं ३५ वर्षांचं आयुष्य...

पृष्ठसंख्या: 
104
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2011
सद्य आवृती: 
December, 2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-566-0

एकीकडे नोबेल पुरस्कार मिळवणारे उत्तुंग संशोधन तर
दुसरीकडे सोपे, सुबोध विज्ञानलेखन.
एका बाजूला धर्म, तत्त्वज्ञान, मानवी जीवन यांवर गंभीर चिंतन तर
दुस-या बाजूला हलकेफुलके विनोदी निवेदन.
अशा बहुविध पैलूंनी नटलेल्या व्यक्तीमत्वाचा अवलिया संशोधक.
'आईनस्टाईननंतरचा विसाव्या शतकातील सर्वोत्तम फिजिसिस्ट'
असा सार्थ लौकिक मिळवणा-या वैज्ञानिकाचे
रंगतदार चरित्र

पृष्ठसंख्या: 
334
किंमत: 
रु. 275
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
February, 2012
ISBN No: 
978-81-7434-388-8

प्रिं. वासुदेवराव पटवर्धन यांच्या निधनाने जशी महाराष्ट्र-वाङ्मयाची, तशीच 'मनोरंजना'चीही मोठी हानी झाली आहे. 'मनोरंजना'च्या लेखक-वर्गापैकी ते एक होते, एवढेच नव्हे, तर त्याला लेखनसहाय्य करावयाला ते नेहमी तयार असत. 'मनोरंजना'वर त्यांचे फार प्रेम होते, व प. वा. काशीनाथपंत मित्र यांच्या निधनानंतर पाठविलेल्या सहानुभूतीच्या पत्रात त्यांनी 'मनोरंजन' संस्था नेटाने चालविण्याविषयी कळकळीचे प्रोत्साहन देऊन, या कामी शक्य ती मदत करण्यास आपण तयार आहो, असे अभिवचन दिले होते. 'मनोरंजना'त त्यांचे लहान-मोठे अनेक लेख प्रसिध्द झाले आहेत. 'सारेच विलक्षण' ही कादंबरी त्यांनी 'मनोरंजना'करिताच लिहावयास घेतली होती. वाचकांस त्या कादंबरीने चटका लावला होता. ती संपूर्ण झाली असती, तर मराठीत एका उत्तम कादंबरीची भर पडली असती. फर्ग्युसन कॉलेजच्या मंडळीने त्यांचे स्मारक करण्याचे योजिले आहे. त्यांच्या योजनेस लवकरच मूर्त स्वरूप प्राप्त होवो, असे आम्ही इच्छितो. पटवर्धनांच्या सर्व लहान-मोठया लेखांचा व कवितांचा संग्रह त्यांच्या विस्तृत चरित्रासह प्रसिध्द झाल्यास, महाराष्ट्र ग्रंथभांडारातील ते एक बहुमोल रत्न होईल. वासुदेवरावांचा साधा, प्रेमळ व विनोदी स्वभाव, त्यांच्याशी ज्यांचा ज्यांचा परिचय झाला, त्यांच्या आठवणीतून कधी जाणार नाही.
नेहमी विनोदपूर्ण भाषणाची तऱ्हा, हसतमुख चेहरा, व जग हे एक 'प्रचंड काव्य' आहे, म्हणूनच ते आनंदाचे वसतिस्थान होय, ही दृढ भावना त्यांच्या मनात बाणल्यामुळे त्यांच्या विनोदी स्वभावात कधीही बदल झाला नाही. आपल्या कर्तव्यात कधी त्यांनी खंडही पडू दिला नाही. अर्थातच सुख काय किंवा दु:ख काय, त्यांच्या बाबतीत समान ठरून गेले होते.
अशा तऱ्हेने पवित्र कर्तव्य बजावीत असता त्यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या वियोगाने महाराष्ट्रातील एक उत्तम टीकाकार नाहीसा झाला. त्यांच्या मृत्यूने डे.ए.सोसायटीची अपरिमित हानी झाली आहे. एवढेच नव्हे तर, सर्व महाराष्ट्राची हानी झाली आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. त्यांच्या संगतीत विद्यानंदाचा थोडाबहुत अनुभव जो काही माझ्या वाटयाला आला, त्याबद्दल कृतज्ञतापूर्वक व मन:पूर्वक त्यांच्या जीवात्म्यास हे स्मृतिलेखरूप पुष्प अर्पण करतो.
('मासिक मनोरंजन (इ.स.1895-1935) या
तत्कालीन अग्रगण्य मासिकात
वासुदेव बळवंत पटवर्धन यांना संपादकांनी वाहिलेली श्रध्दांजली)

पृष्ठसंख्या: 
512
किंमत: 
रु. 350
प्रथम आवृत्ती: 
2007
ISBN No: 
978-81-7434-374-1

अहिल्याबाई होळकर!
जन्म 31 मे 1725.
मृत्यू 13 ऑगस्ट 1795.
ती सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती.
ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती.
ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती.
ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती.
जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता,
हुकमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा_
तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले.
तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रुप घेतले.
तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले.
मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळया मर्यादा होत्या.
अठराव्या शतकातल्या मराठयांच्या इतिहासाच्या पटावर
ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2007-08
पृष्ठसंख्या: 
278
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2007
सद्य आवृती: 
December, 2011
ISBN No: 
978-81-7434-371-0

गेली 50 वर्षं कोऱ्या कागदाच्या शुभ्र हाकेला होकार देत, आंतरिक उर्मीनं लेखन करणारे घरंदाज लेखक.
अवसान आणि आग्रह वगळून मर्मशोधक, अल्पाक्षरी, रसाळ ललित लेखन करणारे शब्दांचे विणकर.
सातत्य हा त्यांचा आगळावेगळा गुण.
परंतु हे सातत्य आहे अंतरीच्या आनंदाच्या झऱ्याचं! आणि म्हणून ते परत परत वाचावंसं वाटतं.
रवींद्र पिंगे यांचा हा सदाबहार, 'सर्वोत्तम' नजराणा तुम्हां वाचकांसाठी_

पृष्ठसंख्या: 
328
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2007
सद्य आवृती: 
July, 2013
ISBN No: 
978-81-7434-482-3

ते फक्त धर्मप्रसारासाठी आलेले मिशनरी नव्हते.
अन् रूढार्थानं त्यांचा धर्मही चर्चच्या चार भिंतीत बंदिस्त नव्हता.
म्हणूनच भारता आल्यावर ते भारताचे बनले.
भारतीय लिपींमधून मुद्रण करण्यासाठी त्यांनी त्या त्या लिपीचे खिळे बनवले.
रामायण, सांख्य तत्त्वज्ञान अन अनेक संस्कृत ग्रंथांचं इंग्रजीत भाषांतर केलं.
सतीबंदीचा कायदा करण्यासाठी पुढाकार घेतला.
मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या तत्त्वाचा पुरस्कार केला, त्यासाठी बंगाली भाषेतून शिक्षण देणारं कॉलेज काढलं.
आणि हे सारं करता करता भारतही त्यांच्यात भिनला.
त्यांनी भारतावर अन् भारतानं त्यांच्यावर ठसा उमटवला.
त्यांच्या कर्तृत्वाचं, भारतप्रेमाचं सुंदर प्रतीक म्हणजे भारतीय टपालखात्यानं त्यांच्या जन्मदिनाची द्विशताब्दी साजरी करताना काढलेलं विशेष तिकीट.
इथल्या मातीत रुजलेल्या, इथल्या जानपदात रमलेल्या पण वर्तमानाल फारीश ओळ नसलेल्या एका कर्तृत्ववान महामानवाची प्रेरक चरितकहाणी-

पृष्ठसंख्या: 
212
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
April, 2011

बेळगावसारख्या छोटया गावातला हुशार पण हूड मुलगा ते भारतीय नौसेनेचे सरसेनापती - सरखेल!
आपल्या नेतृत्वगुणांच्या बळावर हे शिखर गाठणारा मराठी दर्यासारंग.
आजच्या तरुणाईच्या महत्त्वाकांक्षेला, कर्तृत्वाला वाव देणारे अथांग क्षेत्र म्हणजे सेनादलातील सहभाग.
या सहभागासाठी आवाहन करणारे प्रेरणादायी चरित्र- ऍडमिरल भास्कर सोमण नौसेनेचे सरखेल

पृष्ठसंख्या: 
248
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
October, 2011
ISBN No: 
978-81-7434-337-6

आर्यभट्ट अन् भास्कराचार्य कणाद अन् वराहमिहिर या महान भारतीय गणितज्ञांच्या प्रभावळीत शोभणारा प्रतिभावान गणितज्ञ-रामानुजन. दारिद्य्र अन् आजारपण कौटुंबिक समस्या अन् सामाजिक उदासीनता या साऱ्यांशी टक्कर देत आपल्या अल्पायुष्यात गणितातील गहन कूटप्रश्नांची उकल करणाऱ्या गणितज्ञाची स्फूर्तिदायक कहाणी.

पृष्ठसंख्या: 
84
किंमत: 
रु. 70
प्रथम आवृत्ती: 
2008
सद्य आवृती: 
April, 2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-496-0

संभाजी सोमा कदम.
ज्योत्स्ना दत्तात्रेय जोशी.
दोघांच्या वयांत पंचवीस वर्षांचं अंतर.
ते प्राध्यापक, ती विद्यार्थिनी.
त्यांची आर्थिक स्थिती बेताची, ती सुखवस्तू.
पण यांतले कुठलेच बांध या सर्जनशील
कलाकारांना एकत्र येण्यापासून रोखू शकले नाहीत.
मग सुरू झाला त्यांच्या मनस्वी
रंगीत चित्रांइतकाच धुंद सहजीवनाचा प्रवास!
राजाच्या मृत्यूनं
ताटातूट झालेल्या राणीनं
मग उभं केलं
हे उन्मुक्त सहजीवनाचं शब्दचित्र !

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार -2010-11 ; यशवंतराव चव्हाण पुरस्कार
पृष्ठसंख्या: 
200
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
June, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-550-9

भारतातील 'पाणी' या महत्त्वाच्या प्रश्नावर कार्य करणारा हा शास्त्रज्ञ. विदर्भासारख्या कोरडया भागात बालपण गेलेल्या या शास्त्रज्ञाने पाण्याचे महत्त्व जाणले. त्यांनी 'जलसंपदा अभियांत्रिकी' या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेली आहे. पानशेतचे धरण फुटल्यानंतर पुण्याला पाणी पुरवण्याचा यक्षप्रश्न असो वा सध्याचा गाजत असणारा मोठी धरणे बांधण्याबाबतचा प्रश्न असो, तो सोडवण्यात डॉ. माधव चितळे यांचे योगदान असतेच. या कार्याबद्दल नोबेल पुरस्काराच्या समकक्ष असणारा 'स्टॉकहोम पुरस्कार' मिळवणाऱ्या शास्त्रज्ञाचे हे वाचनीय चरित्र

पृष्ठसंख्या: 
120
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2011
सद्य आवृती: 
October, 2011