ISBN No: 
ISBN 978-81-7434-492-2

माहेर सासर... दोन्ही ठिकाणी वयांतलं आणि कर्तृत्वांतलं धाकटेपण
मनमुरादपणे उपभोगणा-या गृहिणीचं हे साधंसुधं आत्मकथन.
तिचे थोरले भाऊ ‘माणूस’कार श्री.ग.माजगावकर,
थोरली बहीण समाजकार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे,
मेहुणे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
यांच्या सहवासात तिचं बालपण समृध्द झालं.
कोणाही चारचौघींसारखी ती संसारात रमली होती.
पण दैवाच्या अनपेक्षित आघातानं खचली. सैरभैर झाली.
जीवनसाथी वासुदेव गोडे आणि बरोबरीचाच भाऊ दिलीप माजगावकर
यांनी विश्र्वासपूर्ण साथ दिली.
ती सावरली. पाय रोवून उभी राहिली.

जेव्हा ती हे सर्व कथन करते, तेव्हा सामाजिक व्यासपीठावर दिसणा-या
माजगावकर-पुरंदरे कुटुंबियांचं गृहजीवन आपोआपच सामोरं येतं
आणि जोडीला ‘राजहंस’-‘माणूस’च्या वाटचालीचं
ओझरतं दर्शनही होऊन जातं.
कधी शाळकरी मुलीच्या कोवळ्या नजरेतून;
कधी अनुभवी गृहिणीच्या चष्म्यातून!
त्यामुळे हे आत्मकथन आगळंवेगळं झालं आहे.

पृष्ठसंख्या: 
156
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
December, 2010
ISBN No: 
978-81-7434-416-8

मिकी माउस, डॉनल्ड डक या आणि अशाच
इतरही असंख्य पात्रांची निर्मिती करून
जगभरातल्या आबालवृद्धांना कल्पनारम्य जगातली
सुहानी सफर घडवून आणणा-या
एका अफलातून माणसाची निखळ चरित्रकथा

पृष्ठसंख्या: 
344
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2008
सद्य आवृती: 
July, 2011
ISBN No: 
978-81-7434-461-8

रोझलिंड फ्रँकलीन शास्त्रज्ञ म्हणून जितकी थोर होती
तितकीच सामाजिक भान असणारी जबाबदार व्यक्ती होती...
कुटुंबाविषयीची आस्था असणारी, प्रखर विज्ञाननिष्ठा जपणारी,
कॅन्सरशी निकरानं लढा देणारी खंबीर तरुणी रोझलिंड...
केवळ स्त्रियांसाठीच नव्हे, तर संपूर्ण
विज्ञानजगतासाठी ती आदर्श ठरली...
डीएनए संशोधनातलं तिचं श्रेय हडपलं जाऊनही
ती चार अंगुळं वरच उरली...

पृष्ठसंख्या: 
144
किंमत: 
रु. 130
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
December, 2009
ISBN No: 
ISBN 978-81-7434-509-7

मार्क इंग्लिस
या माणसानं हिमदंशामुळे
आपले दोन्ही पाय गमावले,
त्यानंतर तब्बल चोवीस वर्षांनंतर
दोन कृत्रिम पाय लावून
तो एव्हरेस्ट शिखरावर चढला !

ही आहे मानवाच्या जिद्दीची
आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची
एक प्रेरणादायी साहसकथा...

पृष्ठसंख्या: 
164
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
August, 2013
ISBN No: 
ISBN 978-81-7434-516-5

सुनीताबाई देशपांडे
आधुनिक महाराष्ट्रामधलं एक बहुचर्चित व्यक्तिमत्त्व
सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका
वत्सल कुटुंबिनी
कर्तव्यकठोर विश्वस्त
काव्यप्रेमी रसिक
परखड समाज हितचिंतक
आप्तेष्टांच्या आठवणींचा आणि स्वत: सुनीताबाईंच्या
लेखनाचा आधार घेऊन केलेली ही स्मरणयात्रा.
काही संस्मरणं नुसती रंजक नसतात, प्रेरक आणि
वेगवेगळया अर्थांनी उदबोधकही ठरू शकतात.

पृष्ठसंख्या: 
198
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
April, 2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-544-8

तो होता एक यशस्वी वैज्ञानिक.
अणुबाँबच्या निर्मितीत त्याने हिरीरीने भाग घेतला,
पण हायड्रोजनबाँबच्या निर्मितीला मात्र विरोध दर्शवला...
मग राजसत्तेने त्याला शत्रू मानले,
सरकारने त्याला जवळजवळ आयुष्यातूनच उठवले...
जे. रॉबर्ट ओपेनहायमर त्याचे नाव!
तरल कल्पनाशक्ती आणि विकृत वासना,
लौकिक संपन्नता आणि मानसिक विषण्णता...
अशा अनेक विरोधाभासांचा धनी ठरलेल्या
एका लोकविलक्षण माणसाची, त्याच्या गुणदोषांची,
त्याच्या सुखदु:खांची ही शोकात्म संघर्षकथा.

पृष्ठसंख्या: 
360
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2011
सद्य आवृती: 
August, 2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-533-2

मानवी नीतिधैर्याच्या अंतिम विजयावर
विश्र्वास ठेवून ब्रह्मदेशाचा इतिहास
नव्यानं लिहू पाहणा-या
एका तपस्विनीची संघर्षकथा

पृष्ठसंख्या: 
304
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2011
सद्य आवृती: 
November, 2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-567-7

गांधीजींच्या तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात
त्यांनी आयुष्यभर वाटचाल केली.
नाशिकजवळ डांग परिसरात
आदिवासींच्या विकासासाठी संस्था उभारल्या.
त्यांनी सुरू केलेल्या कार्यात
त्यांच्या पुढच्या दोन पिढ्याही
सहभागी झाल्या.
या सर्वांची प्रेरक कहाणी!

पृष्ठसंख्या: 
116
किंमत: 
रु. 120
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
March, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-565-3

ही काही कपोलकल्पित कथा नाही,
काल्पनिक कहाणी नाही.
ही आहे एक खरीखुरी गोष्ट.
एक डॉक्टर, तिला झालेला ब्लडकॅन्सर
अन् तिनं जिद्दीनं त्याच्याशी दिलेला लढा
यांची अगदी कालपरवा घडलेली वास्तव गोष्ट.
पारदर्शक साधेपणा, नितळ निवेदन
अन् जीवनाबद्दलचा सकारात्मक विचार
अशा तिहेरी पेडांनी विणलेला गोफ
चितारणारे आत्मकथन

पृष्ठसंख्या: 
156
किंमत: 
रु. 130
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
February, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-552-3

व्यंकटेश बापूजी केतकर यांच्याबद्दल बहुतेक सुशिक्षित
भारतीयांना माहिती नसते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नेपच्युन
ग्रहापलीकडे परिक्रमा करीत असलेला ग्रह आणि त्याची
परिक्रमा याचे भाकीत केतकर यांनी केले. केतकर ज्या
समाजात वाढले, त्यातील अधिकांश घटक नवग्रह म्हणजे
मानवी जीवनात ढवळाढवळ करणारे अशा अंधश्रध्देखाली
वावरत होते. ह्यावरूनच केतकरांच्या विलक्षणतेची कल्पना
येते व या विचारकाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा
होते. ती जिज्ञासापूर्ती डॉ.प्रभाकर कुंटे यांच्या
चरित्रलेखनातून होते.

या पुस्तकावर आधारलेला एक धडा पाठयपुस्तकात
असावा म्हणजे नव्या पिढीला व्यंकटेश बापूजी केतकर हे
कोण होते, याची कल्पना येईल.
-जयंत नारळीकर

पृष्ठसंख्या: 
110
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
January, 2012