ISBN No: 
ISBN 978-81-7434-601-8

सामान्यातल्या असामान्य 'स्त्री'चं हे आत्मकथन !
पार्वतीबाई आठवले!
१८७० मध्ये जन्मलेली,
कोकणच्या खेडयात लहानाची मोठी झालेली एक निरक्षर स्त्री...
वैधव्यानंतर केशवपन, परावलंबन हे दैवाचे भोग मानून जगणारी!
पण मुलाच्या काळजीनं पुण्यात बहीण बाया कर्वे यांच्याकडे
म्हणजेच मेहुणे धोंडो केशव कर्वे यांच्या घरी आली
आणि तिचं सारं जगच बदललं.
या सामान्य स्त्रीतले असामान्य गुण प्रकटले.
कर्वे यांचा 'अनाथ बालिकाश्रम' हे तिचं जीवनकार्य झालं.
या संस्थेला मदत मिळवण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसत
ती भारतभर फिरली, इंग्लंड-अमेरिकेतही जाऊन आली.
तिनं केलेलं हे आत्मकथन.

पृष्ठसंख्या: 
116
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2013
सद्य आवृती: 
July, 2013
ISBN No: 
ISBN 978-81-7434-331-4

ख्रिस्तवासी पोप दुसरे जॉन पॉल यांचे आयुष्य म्हणजे
असंख्य नाटयपूर्ण घटनांची मालिकाच!
या कॅथलिक धर्माचार्यांच्या पोलंडमधील पूर्वायुष्यासह
व्हॅटिकनमधील प्रदीर्घ प्रभावी कारकिर्दीचा
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी या पुस्तकात
सविस्तर आढावा घेतला आहे आणि त्याबरोबरच
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दडलेल्या
असंख्य मानवी पैलूंवरही प्रकाशझोत टाकला आहे.

पृष्ठसंख्या: 
240
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2005
ISBN No: 
ISBN 978-81-7434-590-5

तो होता जन्मानं ब्रिटिश; नाव होतं टी. ई. लॉरेन्स.
पण आयुष्यभर तो लढला असंघटित अरबांच्या हक्कांसाठी.
महानायक म्हणून जगभर गाजला
तो ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ म्हणूनच !
अरबांना मुक्ती मिळवून देणा-या
त्या अवलिया लढवय्याची अद्भुत कहाणी..

पृष्ठसंख्या: 
380
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
October, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-589-9

गुणगुणणारे छोटे छोटे कीटक असोत
वा रंगबिरंगी पक्ष्यांचे थवे,
समुद्राचे गहिरे तरंग असोत
वा आकाशाची मुग्ध निळाई,
निसर्गाच्या सा-याच रूपांवर
रेचेलनं मनापासून प्रेम केलं...
आणि म्हणूनच मानवानं केलेला
कीटकनाशकांचा मनमानी वापर
तिला सहन झाला नाही.

निसर्गाचं प्रेम, ध्यास अन्
रेचेलची तळमळ, अभ्यास
याची परिणीती म्हणजेच
‘सायलंट स्प्रिंग’

हे केवळ पुस्तक नव्हतं,
तो होता पर्यावरणासाठीचा लढा.
त्यानंच जन्म दिला,
जागतिक पर्यावरण चळवळीला.
सा-यांना पर्यावरणासंदर्भात
खडबडून जागं करणा-या
रेचेलची ही चरितकहाणी...

पृष्ठसंख्या: 
120
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
November, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-588-2

एक सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा...
एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शिकेचा बहुआयामी आत्मशोध!

मराठी रंगभूमीला नवतेचं भान मिळालं,
अनेक नवे नाटककार / कलावंत घडले,
मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारल्या;
हे सारं घडलं, ते बाईंमुळे.

वाचकाला विश्र्वासात घेऊन बाई सांगताहेत गोष्ट...
स्वत:ची आणि मराठी रंगभूमीची,
आपल्या दिलखुलास, प्रसन्न शैलीत.

आठवणींच्या धाग्यांचं हे मुलायम विणकाम
वाचकांना बांधून ठेवेल हे नि:संशय!

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
भैरू रतन दमाणी पुरस्कार 2012
पृष्ठसंख्या: 
456
किंमत: 
रु. 375
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
July, 2013
ISBN No: 
ISBN 978-81-7434-183-9

मराठीत स्त्रियांच्या आत्मवृत्तांना एक समृद्घ परंपरा लाभलेली आहे.
ही परंपरा उंचावणारे ‘कुणास्तव कुणीतरी…’ हे यशोदा पाडगावकर
यांचे अविस्मरणीय आत्मवृत्त.

सासवडमध्ये यशोदाबाईंचे वडील ख्रिती धर्माचे मिशनरी होते.
तिथल्या बालपणच्या सुखाच्या काळापासून हे आत्मवृत्त सुरू होते.
एकाएकी हे सुखाचे दिवस संपतात. वडिलांचा अकस्मात मृत्यू होतो.
कुटुंबाच्या प्रपंचाचे तारू हेलकावे खाऊ लागते... नियतीच्या
चढउतारातले अनुभव यशोदाबाईंचे संवेदनक्षम मन नोंदत राहते :
नोकरी आणि मुलांचे संगोपन या उसाभरीत आईची होणारी त्रेधा,
भावंडाचे व स्वत:चे शाळा-कॉलेजांतले शिक्षण, मित्रमैत्रिणी,
शिक्षक, वाढणारे वय, त-हात-हांच्या दुष्ट-सुष्ट व्यक्ति त्यांच्या
अभिलाषा आणि सचिच्छा... प्रतिभावंत कवी म्हणून पुढे ख्यातनाम
झालेल्या मंगेश पाडगावकरांवर जडलेली प्रीती. लग्नासाठी घरी
झालेला तीव्र विरोध आणि तो निर्धाराने दूर ठेवून लग्नात झालेली
परिणती... एका धर्माच्या संस्कृतीतून दुस-या धर्माच्या संस्कृतीत
प्रवेश करत असताना आयुष्यभर करत राहावा लागलेला मानसिक
संर्घष... मिळालेला सन्मान आणि साहिलेल्या अवहेलना...

अर्धशतकाहूनही अधिक काळ अनुभवलेल्या विशाल जीवनकलहाचे
रम्यभीषण रूप यशोदाबाई इथे संवेदनशीलतेने, सहजपणे चित्रित
करतात. त्यांच्या जीवनाविषयीच्या अनावर उत्सुकतेची, रसिक
आणि आनंदी वृत्तीची, स्वभावातल्या ऋजुतेची आणि सोशिकतेची
साक्ष सतत मिळत राहते.

संसारातल्या सुखदु:खांच्या छायांच्या पलीकडे जाऊन त्या त्यांचे
स्वरूप अलिप्तपणे पाहताना दिसतात... जीवनाचे निखळ रूपच
त्यांना पाहायचे आहे हे जाणवते. हे रूप पाहत असताना, हरपत
चाललेल्या श्रेयाचा झाकोळा त्यांच्या लेखनावर उतरत येतो.

मी कशी जगत आले याविषयी मोकळेपणानं, अलिप्तपणानं लिहावं
एवढीच या लिहीण्यामागची ऊर्मी होती असे यशोदाबाईंनी
मनोगतात म्हटले आहे. त्याचा निर्भर प्रत्यय इथे येतो.

पृष्ठसंख्या: 
314
किंमत: 
रु. 240
प्रथम आवृत्ती: 
2000
सद्य आवृती: 
November, 2009
ISBN No: 
ISBN 978-81-7434-276-8

अलौकिक प्रतिभावंत
विश्वशांतीचा प्रणेता
दलितांचा कैवारी
सत्याचा सांगाती
अविरत आत्मसंशोधक
अभिनव शिक्षणतज्ज्ञ...
असे अनंतमिती व्यक्तिमत्त्व होते
काऊंट लिओ टॉलस्टॉय यांचे.

या प्रतिभाशाली महामानवाची
जगावेगळी जीवनकथा.

पृष्ठसंख्या: 
512
किंमत: 
रु. 400
प्रथम आवृत्ती: 
1974
सद्य आवृती: 
September, 2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-227-0

एक सच्चा, सत्वशील सूर
भीमसेन
भारतीय जनसंस्कृतीच्या महासागरात
विरघळून गेलेला एक सुरेल प्रवाह.
त्यांची गायकी जेवढी अदभुत
तितकीच त्यांची जीवनकथाही अकल्पित.
अशा या नाटयपूर्ण जीवनाची
आणि अविश्वसनीय वाटेल
अशा गानकर्तृत्वाची ही चरित्र मैफल.

पृष्ठसंख्या: 
268
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2000
सद्य आवृती: 
February, 2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-319-2

पाण्याच्या थेंबाशी
इमान असणारा हा माणूस
पाण्याच्या थेंबासारखा नितळ होता...

विलासराव जे म्हणत,
ते आज नाही,
तरी नजीकच्या भविष्यात
तुम्हांला एकावंच लागेल.
पाणी मोजूनच द्यावं लागेल!...

पृष्ठसंख्या: 
234
किंमत: 
रु. 180
प्रथम आवृत्ती: 
2005
सद्य आवृती: 
September, 2009
ISBN No: 
978-81-7434-393-2
अनुवाद: 
कल्याणी हर्डीकर

फ्लॉरेन्स नाइटिंगेल
फक्त एक थोर रुग्णसेविका नव्हे, तर गणितज्ज्ञ, संख्याशास्त्रज्ञ
आणि लेखकही.
१८ व्या शतकाला अज्ञात अशी परिसर स्वच्छता, सेवाभावी वृत्ती,
आजारांची नोंदणी, त्यांचं सांख्यिकी विश्लेषण, रुग्णसेवेबाबतची यंत्रणा
हे सर्व विकसित अन् नियमबद्ध करणारी कर्तृत्ववान व्यवस्थापक.
हे करताना त्या काळाच्या पुरुषी सत्तेशी कधी संघर्ष करीत, कधी नमतं
घेत, तर आपल्या अविरत कष्टांनी त्यांना कधी अचंबित करीत,
रुग्णांचं प्रेम मिळवीत वाटचाल करणारी धीरोदात्त समाजसेविका.
तिच्या रुग्णसेवाव्रती आयुष्याची ही एक कृतज्ञ आठवण!

पृष्ठसंख्या: 
96
किंमत: 
रु. 75
प्रथम आवृत्ती: 
2007