ISBN No: 
ISBN 978-81-7434-610-0

'देशातील सगळयात महत्त्वाचा रसायनशास्त्रज्ञ'
असा सार्थ लौकिक असणारे वैज्ञानिक म्हणजे सी. एन. आर. राव.
परदेशातल्या ख्यातनाम विद्यापीठांतून
ज्ञानाचा ठेवा पाठीशी घेऊन राव भारतात परतले,
ते मायदेशात रसायनशास्त्रातलं संशोधन समृद्ध करण्याच्या निर्धारानेच.
आपल्या विषयातील नवी नवी क्षितिजे धुंडाळताना
त्यांनी स्वतःला झोकून दिले ते नॅनोतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात.
विविध नॅनोमटेरिअलचे संशोधन करताना
त्याचे व्यावहारिक फायदे भारताला मिळायला हवेत,
यासाठी राव अत्यंत जागरूक असतात.
अशा या नॅनोतंत्रज्ञान आणि रसायनशास्त्रातील जागतिक कीर्तीच्या
देशभक्त वैज्ञानिकाची स्फूर्तिदायक चरित्रगाथा

पृष्ठसंख्या: 
184
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2013
सद्य आवृती: 
April, 2013
ISBN No: 
ISBN 978-81-7434-603-2

हे अनुभवकथन आपल्याच समाजातील अंधांचे एक विश्व उजेडात आणतं.
या विश्वात सुखदु:ख, आशानिराशा यांचे स्वाभाविक हेलकावे आहेत,
विविध कलागुणांचे जोरदार आविष्कारही आहेत.
हे लेखन सहानुभूतीच्या भाराने वाकलेले नाही, तर आशावादाने जगण्याची
प्रेरणा देणारे आहे.
मुख्य म्हणजे एका सर्वसामान्य गृहिणीच्या मातृत्वाचा परीघ कसा सहजपणे
विस्तार पावत जातो, याचे प्रांजळ चित्रणही आहे.

पृष्ठसंख्या: 
222
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2013
सद्य आवृती: 
September, 2013
ISBN No: 
978-81-7434-323-9

मानवी जीवनातले सत्य आणि सौंदर्य
शाश्वत रूपात शब्दबध्द करून ठेवणा-या
एका अलौकिक प्रतिभावंताची
प्रत्यक्ष भेट घडल्याचा
आनंद मिळवून देणारे पुस्तक-

पृष्ठसंख्या: 
225
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2005
सद्य आवृती: 
July, 2008
ISBN No: 
978-81-7434-321-5

वडलांचा आदेश शिरसावंद्य मानून, आयुष्यभर
निष्काम कर्मयोग आचरीत आलेल्या जयंतराव
पाटलांची ही जीवनकहाणी आहे. कृषिक्षेत्रातले
आपले सखोल ज्ञान आणि प्रदीर्घ अनुभव उपयोगात
आणून आदिवासींच्या जीवनात समृध्दीचा प्रकाश
आणणा-या एका प्रयोगशील नियोजनकर्त्याची ही
गाथा आहे. ठाणे जिल्ह्यातील बोर्डीसारख्या एका
मागासलेल्या भागाचा कायापालट घडवून
आणणा-या फळशेतीच्या क्रांतिकारक उपक्रमाची ही
अनुकरणीय अशी कथा आहे.

जयंतराव पाटलांसारखीच साधी, सरळ आणि
तरीही समाधानाची समृध्दी मिळवून देणारी...

पृष्ठसंख्या: 
236
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2005
सद्य आवृती: 
August, 2005
ISBN No: 
978-81-7434-327-7

बाबूराव जगताप हे पुण्याच्या शैक्षणिक व नागरी जीवनामधले
एकेकाळचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांची ही जीवनगाथा.
'गुरुवर्य' जगताप यांनी श्री शिवाजी मराठा स्कूलची केलेली
स्थापना आणि ती संस्था नावारूपाला आणण्यासाठी केलेले विविध
प्रयत्न... कोल्हापूरचे शिक्षणाधिकारी म्हणून किंवा गारगोटीच्या श्री
मौनी विद्यापीठाचे संचालक म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी...
'शिक्षक' मासिकाचे प्रदीर्घकाळ संपादन करण्यामागचा किंवा
टॉलस्टॉयच्या निवडक कथा अनुवादित करून प्रकाशित
करण्यामागचा त्यांचा ध्येयवाद... पुण्याच्या नागरी जीवनात
पक्षनिरपेक्ष भूमिकेतून जबाबदारीची कामे पार पाडताना त्यांनी
सहज साधेपणाने उमटवलेला आपला ठसा आणि त्यामुळे
गाजलेली त्यांची महापौरपदाची कारकीर्द...
ही सारी तपशीलवार चरित्रकथा वाचली की, 'समाजावर सात्त्विक
संस्कार करतो, तो खरा गुरू', या अर्थाने बाबूराव जगताप यांना
'गुरुवर्य' ही उपाधी कशी चपखल शोभते, हे सहज स्पष्ट होते.
गुरुवर्यांच्या मुलानेच जिव्हाळयाने सांगितलेली ही चरित्रकथा.
शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात काम करणा-या
सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल, प्रेरणा देईल, अशी...

पृष्ठसंख्या: 
264
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2005
सद्य आवृती: 
July, 2005
ISBN No: 
978-81-7434-255-3
अनुवाद: 
माधुरी शानभाग (मूळ लेखक:आर.रामनाथन )

विख्यात अणुशास्त्रज्ञ, स्वदेशी बनावटीच्या भारतीय
क्षेपणास्त्रांचे शिल्पकार, डी.आर.डी.ओ.चे संचालक
या नात्याने जनसामान्यांना सुपरिचित असणारे
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आता भारताचे राष्ट्रपती
झाले आहेत. त्यांच्याबाबत, त्यांच्या कार्याबाबत
त्यांच्या लोकप्रियतेला साजेसे विपुल लेखन झाले
असले, तरीही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू
पुरेसे प्रकाशात आलेले नाहीत. एक मनस्वी,
वृक्षप्रेमी पर्यावरणवादी...जिवाभावाचे सख्य
जोडणारा एक वडीलधारा...ज्याचे जे श्रेय ते
त्याला जाहीरपणे देऊ करणारा दिलदार संघनायक...
आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावून
जाताना नोकरशाहीची कुंपणे ओलांडणारा मानवतावादी...
कार्यासक्ती हा आपला गुण इतरांच्याही अंगी बाणावा,
यासाठी धडपडणारा एक हाडाचा शिक्षक...अशा
विविध पैलूंवर त्यांच्या निकटवर्तीयांनी आठवणींच्या
रूपाने टाकलेला हा प्रकाशझोत. डॉ. कलामांचे
व्यक्तिमत्व त्यामुळे अधिकच झळाळून उठले,
तर आश्चर्य वाटायला नको. `इस्त्रो'मधल्या त्यांच्याच
एका जिवलग मित्राने डॉ. कलामांच्या व्यक्तिमत्वांचा
घेतलेला वेध त्यांच्याबद्दलच्या आदरभावात
भर घालतो, हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.

पृष्ठसंख्या: 
164
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2003
सद्य आवृती: 
July, 2010
ISBN No: 
81-7434-239-1

कुटुंबापासून दुरावलेली, ज्यू धर्म त्यागूनही सदैव ज्यू ठरलेली,
जर्मनीतून हद्दपार झालेली, स्वीडनच्या आश्रयाला जाऊन
राहिलेली एक ऑस्ट्रियन... 'मला कायम निराश्रितासारखं
वाटतं' असं म्हणणारी, एकाकी लीझ माइट्नर.

आईन्स्टाईनसारखा शास्त्रज्ञ 'अवर मादाम क्युरी' असं
जिच्याबाबत म्हणत असे, नोबेल पुरस्कारासाठी जिचं नाव
पंधरा वेळा सुचवलं गेलं, पुरुषी अहंकारापायी जिचं वैज्ञानिक
श्रेयसुद्धा सहका-यांकडूनच हिरावून घेतलं गेलं आणि तरीही
किरणोत्सर्ग व अणुविखंडन या बाबतीतल्या संशोधनामधले
जिचं अभिजात कर्तृत्व उपेक्षेच्या आणि वंचनेच्या सा-या
वार-प्रहारांनंतरही टिकून राहिलं, ती विसाव्या शतकातली थोर
मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ म्हणजे लीझ माइट्नर...

वैज्ञानिक क्षेत्रातल्या अनोख्या सत्तासंघर्षाचं विस्मयकारी दर्शन
घडवणारं, लीझ माइट्नरचं हे उत्कंठावर्धक चरित्र...

पृष्ठसंख्या: 
124
किंमत: 
रु. 120
प्रथम आवृत्ती: 
2003
सद्य आवृती: 
December, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-310-9

भारतात जन्मलेल्या आणि इंग्लंड-अमेरिकेत कर्तृत्व गाजवलेल्या
एका नोबेल पारितोषिकविजेत्या शास्त्रज्ञाचे - डॉ. सुब्रह्मण्यम
चंद्रशेखर यांचे - हे चरित्र आहे.

भारतातल्या प्रारंभिक शिक्षणापासून अमेरिकेतल्या प्रगत
संशोधनापर्यंत त्यांचा जीवनप्रवाह कसा वाहत गेला, त्याने
कोणकोणती वळणे घेतली, याचा हा वेधक वृत्तांत आहे.
'श्वेतबटू' किंवा 'कृष्णविवर' यांच्यासारख्या क्लिष्ट, अगम्य
वाटणा-या विषयांमध्ये त्यांनी केलेले संशोधन, त्या संशोधनाला
खूप विलंबाने मिळालेली मान्यता आणि त्या विलंबामुळे निराश न
होता त्यांनी प्राध्यापकीपासून ग्रंथलेखनापर्यंत विविध क्षेत्रांत केलेले
मौलिक कार्य, मायदेशी परतण्याऐवजी अमेरिकन नागरिकत्व
स्वीकारण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय, शेक्सपीयर-
बिथोव्हन-न्यूटन या दिग्गजांच्या सृजनशीलतेची वैज्ञानिक दृष्टीने
त्यांनी केलेली आस्वादक चिकित्सा...

हे सारे आणि आणि आणखी बरेच काही सांगणारे हे पुस्तक
सर्वसामान्य वाचकालाही समजेल अशा सरळसाध्या भाषेत
लिहिलेले असले, तरी त्याचे वैज्ञानिक कुतूहल जागे करण्याचे
सामर्थ्य त्यात दडलेले आहे. डॉ. चंद्रशेखर यांच्या बहुमुखी,
बहुआयामी प्रतिभेचा प्रत्ययकारी परिचय करून देणारे हे पुस्तक
मराठीमधील चरित्रग्रंथांमध्ये मौलिक भर घालणारे ठरेल, हे
निश्चित.

पृष्ठसंख्या: 
182
किंमत: 
रु. 160
प्रथम आवृत्ती: 
2005
ISBN No: 
ISBN 978-81-7434-609-4

''ही सारी सृष्टी केवळ माणसासाठी निर्माण झाली आहे, असं मानणं
वेडगळपणाचं ठरेल. माणूस नसेल, तर हे विश्व जेवढं अपूर्ण आहे,
तेवढंच एखादा कीटक नसेल, तरीही अपूर्ण आहे. या विश्वाची रचना
ईश्वरानं सर्वांसाठी केली आहे.
तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या, अशीच या विश्वाची धारणा आहे...

आपल्या या अफाट देशात अनेक ठिकाणी घनदाट जंगलं आहेत,
त-हेत-हेचे पशुपक्षी आहेत, डोंगरद-या आणि कोसळते धबधबे यांनी
आपला निसर्ग संपन्न आहे. परमेश्वरानं आपल्याला दिलेली ही निसर्गसंपत्ती
पुढच्या पिढयांसाठी नीट जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे...''

असं समजावून सांगणा-या एका अमेरिकन निसर्गमित्राची
ही चरित्रकथा...

पर्यावरणप्रेमी वाचकांना विचारप्रवृत्त करणारी आणि
कार्याची प्रेरणा देणारी...

पृष्ठसंख्या: 
100
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2013
सद्य आवृती: 
February, 2013
ISBN No: 
ISBN 978-81-7434-401-4

राजहंस प्रकाशन, पुणे
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
विभागीय केंद्र, नाशिक

पृष्ठसंख्या: 
234
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2008
सद्य आवृती: 
May, 2011