ISBN No: 
978-81-7434-286-7

महात्मा गांधी जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रसंगी केवळ भारतातच
नव्हे, तर सा-या जगभर त्यांचे पुण्यस्मरण होत आहे. केवळ
राजकारणी पुढारीच नव्हेत; तर गायक, नर्तक, चित्रकार,
शिल्पकार सारेच जण शब्द, स्वर, रंग, रेखा, अभिनय ह्यांतून
आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. गांधीजींचे आपणावर तर
मोठे ॠण आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालू
शकलो नाही, हा त्यांचा दोष नव्हे. गांधीजींच्या चरित्राचे हे
लेखन ही त्यांच्या चरणी वाहिलेली माझी लहानशी फुलाची
पाकळी आहे. ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही, अशा मराठी
वाचकांसाठी मी हे चिमुकले पुस्तक लिहिले आहे.
हे पुस्तक वाचल्यावर गांधीजींच्याविषयी अधिकारी लेखकांनी
लिहिलेली चरित्रे वाचण्याची आणि त्यांचे तत्त्वज्ञान अधिक
बारकाईने समजून घेण्याची इच्छा झाली, तर माझ्या ह्या
लेखनकामाचे चीज झाले, असे मला वाटेल.
पु. ल. देशपांडे

पृष्ठसंख्या: 
88
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2004
सद्य आवृती: 
April, 2012
ISBN No: 
978-81-7434-154-9

...मग ते आई-बाप म्हणतात
'मुलीला सिनेमा लाईनची हौस आहे,
तिला सिनेमात टाकायचंय.' त्या मुलीकडे
बघून मला कळवळून येतं. मी सांगते
'शहाणे असाल, मुलीचं हित करायचं असेल तर
तिला या लाईनकडे चुकूनही फिरकूसुद्धा देऊ
नका.' माझा अनुभव आहे त्या मागे.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार
पृष्ठसंख्या: 
68
किंमत: 
रु. 55
प्रथम आवृत्ती: 
1970
सद्य आवृती: 
December, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-344-4

'ब्रेकिंग न्यूज'च्या वेडयापिश्या घाईपूर्वीचे
मराठी पत्रकारितेचे संथ पण विश्वासार्ह जग.
या जगात अठ्ठेचाळीस उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या,
वादळवारे साहसाने अंगावर घेतलेल्या,
यशाचे मान-सन्मान आणि
अपयशाचे तडाखे सोसलेल्या
एका पत्रकार-संपादकाच्या
जिंदादिल मुशाफिरीची
ही रसाळ, व्यावसायिक आत्मकथा.

पृष्ठसंख्या: 
282
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2006
सद्य आवृती: 
October, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-163-1

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतात
आधुनिक विज्ञानाची पहाट उगवली.
त्यापूर्वीच्या शतकानुशतकांच्या तमोयुगाला छेद देणारा पहिला
विज्ञान-रश्मी बसू हा होता!
भरतभूच्या कुशीत निपजलेला तो पहिला
आणि जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ.

बसूंनी पदार्थविज्ञान आणि वनस्पतिशास्त्र या क्षेत्रांमध्ये
वैज्ञानिक म्हणून केलेलं कार्य हे जितकं उत्कंठावर्धक आहे,
तितकंच त्यांचं ॠषितुल्य असं संपूर्ण जीवनही.

त्या जीवन आणि कार्याचा हा आलेख.

पृष्ठसंख्या: 
168
किंमत: 
रु. 125
प्रथम आवृत्ती: 
1999
सद्य आवृती: 
December, 2006
ISBN No: 
ISBN 978-81-7434-075-7

राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली
समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात, जन्माला आली.
परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली.
तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा,
इतिहास, काही माहीत नव्हतं. इथही ती निरक्षरच होती;
त्यामुळं लंडन हे गावाचं नाव आहे की देशाचं, असा
संभ्रमही बरेच दिवस तिच्या मनाला असायचा! पण
कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती
झाली. तिनं भरपूर पैसे मिळवले. भरपूर खर्चही केले.
आपली माणसं, आपला धर्म, आपली जीवनपद्धती यांचं
एक मूर्त चित्र स्वत:च्या आयुष्यात तिनं दाखवून दिलं...

तिनं जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या शवावर
वाहण्यासाठी लंडनच्या गो-या मेयरनं – मेयर ऑफ
बारनेटनं फुलं पाठवली आणि लंडनमधल्या तिच्या भारतीय
मुलांनी तिची शवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून
नेली.!

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 1996-97
पृष्ठसंख्या: 
196
किंमत: 
रु. 175
प्रथम आवृत्ती: 
1996
सद्य आवृती: 
March, 2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-126-6

कलावंत काय आणि विचारवंत काय
ते प्रतिभावंत असतातच.
पण बरेचसे अहंमन्य, त-हेवाईक,
विक्षिप्त, व्यसनी, दुबळे!
ते स्वत:तच मश्गुल असतात.
ते प्रेमात होरपळून निघतात.
दारिद्रयात पिचून जातात.
आपल्या उत्कट प्रतिभेशीच त्यांच्या
अनावर निष्ठा असतात.
आपल्या प्रतिभाशाली निर्मितीतून
ते जगाच्या इतिहासात आपलं नाव
लखलखत ठेवतात.
पण जगाच्या व्यवहारात मात्र
ते नगण्य ठरतात.
वेदना आणि संवेदनांच्या वावटळीत
सापडलले हे प्रतिभेचे प्रेषित
कधी आकाशाएवढे प्रचंड भासतात;
तर कधी खसखशीच्या दाण्याएवढे
छोटे वाटतात. त्यांच्या समग्र
जीवनाचे, त्यातल्या जीवघेण्या
संघर्षाचे, त्यांच्या उत्तुंग झेपांचे
आणि एक सर्वसामान्य माणूस
म्हणून त्यांच्या वाटयाला आलेल्या
सुखदु:खाचे चित्रण करणारे पुस्तक –
कलावंत आणि विचारवंत

पृष्ठसंख्या: 
206
किंमत: 
रु. 140
प्रथम आवृत्ती: 
1999
सद्य आवृती: 
February, 2004
ISBN No: 
ISBN 978-81-7434-385-7

पर्यावरण सावैभौमत्वाच्या
वाटेवरला मी योगी?
छे! मी तर वियोगी!

मिळाले नाही मला
मागितले ते सर्व
पण पाहिलेली सर्व स्वप्नं
साकारली आहेत माझी.

म्हणूनच आज
आयुष्याच्या मावळतीला
निघालोय पकडायला
नर्मदा किना-यावरचा सूर्योदय.

मला ठाउक आहे,
हे सामान्य माणसाचे शतक आहे.
न्यायोचित माणसाला, अन्याय्य व्यवस्थेत
जागा एकच : तुरूंग किंवा मृत्यू
तुरूंगाबद्दल मला प्रेम आहे
आणि मृत्यूचे मला भय नाही.

या माझ्या लोकमातेचं लावण्य
कुणी हिरावून घेऊ नये
म्हणून माझं जीवन मी उधळत राहणार आहे
जगत राहणार आहे मी...
- बाबा आमटे

पृष्ठसंख्या: 
256
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
1997
सद्य आवृती: 
September, 2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-143-3

मुलांच्या छंदांना एखाद्या रोपटयाप्रमाणे जपायचं
असतं. रेमंडला तर जगावेगळा छंद होता....
साप पाळण्याचा! भीतभीत का होईना त्याच्या
आईवडलांनी त्याला रोखलं नाही.... आणि रेमंडचा
सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स झाला. अभ्यासाच्या
दृष्टीने उपेक्षित राहिलेल्या 'साप' या प्राण्याचा
रेमंडनं त्या काळात कसून अभ्यास केला. त्यावर
विपुल मौलिक लेखन केलं. निसर्ग चित्रपटांची
सुंदर निर्मिती केली....

'एक होता कार्व्हर' या गाजलेल्या ग्रंथाच्या लेखिका
वीणा गवाणकर खास मुलांसाठी उलगडून दाखवत
आहेत डॉ. रेमंड डिटमार्सचा जीवनपट.... एका
रसाळ आणि सुबोध शैलीत.

पृष्ठसंख्या: 
64
किंमत: 
रु. 60
प्रथम आवृत्ती: 
1987
सद्य आवृती: 
February, 2013
ISBN No: 
ISBN 978-81-7434-146-4

आपला समृध्द आणि प्रगत
मायदेश मागे सोडून
डॉ. आयडा वेलूरला आल्या.
धुळीने भरलेल्या, सततच्या
दुष्काळाने आणि म्हणून
दारिद्रयाने गांजलेल्या
भुकेकंगाल प्रदेशाला त्यांनी
आपलं म्हटलं. सलग पन्नास
वर्ष या प्रदेशाची दुखणी-खुपणी
निस्तरताना त्यांनी एक स्वप्न
उराशी बाळगलं. ते साकार
करीत असताना त्या या मातीत
मिसळून गेल्या.

एक होता कार्व्हर
या पुस्तकाच्या लेखिका
वीणा गवाणकर
यांचे एका दुर्लक्षित
विषयावरील पुस्तक –
डॉ. आयडा स्कडर

पृष्ठसंख्या: 
128
किंमत: 
रु. 110
प्रथम आवृत्ती: 
1999
सद्य आवृती: 
June, 1999
ISBN No: 
ISBN 978-81-7434-567-7

एका हातात पिस्तुलाची जळती आग
दुस-या हातात स्फोटक निखारा.
वेदनांच्या अन् यातनांच्या,
जळत्या लाव्हातून हे अग्निपुत्र
सशस्त्र क्रांतीची वाट चालले.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले.
अवघ्या अडीच वर्षांत ब्रिटीश साम्राज्याला
विजेचा तडाखा देणा-या
हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन
असोसिएशनचा तेजस्वी इतिहास.

पृष्ठसंख्या: 
172
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
1971
सद्य आवृती: 
June, 2012