ISBN No: 
978-81-7434-026-2

ज्ञानपीठ विजेते तपोधन साहित्यिक वि.स.खांडेकर
यांनी १९७२ साली अगत्याने लिहिलं, “काळाची नाडी
रवींद्र पिंगे ह्यांना सापडली आहे. ते मर्माचं तेवढंच, पण
काव्यात्मक लिहितात. त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा
आहेत.”

त्यानंतर पिंगे ह्यांनी जवळपास दोनशे मर्मग्राही व्यक्तिचित्रं
लिहिली.

घाटदार रचना,शब्दसौष्ठव आणि डोळस गुणग्राहकता
ही भाऊसाहेब खांडेकरांनी टिपलेली पिंगे ह्यांची
लेखनवैशिष्टयं ‘शतपावली’ ह्या पुरस्कारप्राप्त संग्रहात लखलखीत
दिसतात.

पृष्ठसंख्या: 
142
किंमत: 
रु. 125
प्रथम आवृत्ती: 
1974
सद्य आवृती: 
March, 2011
ISBN No: 
978-81-7434-048-1

भास्कररावांच्या ऐन उमेदीत, निरनिराळ्या
प्रसिध्द घराण्यांतील अनेक गवई उत्तरेकडून
दक्षिणेस आले होते. त्या प्रत्येकामध्ये काही
विशेष गुण होते, यात संशय नाही.
कोणामध्ये तानेची, कल्पनातीत तयारी,
कोणामध्ये गळ्याची मनस्वी माधुरी,
कोणामध्ये आलापाचे सौंदर्य, तर कोणामध्ये
तालाचा अजस्र खटाटोप दिसून येई. परंतु
स्वराचा जिवंतपणा, रागाचा सच्चेपणा व
तालाचे लालित्य हे तिन्ही गुण सारख्या
उत्कर्षाला पोहोचलेले गुरुवर्य
भास्कररावांप्रमाणे क्वचित् कोणा गायकाच्या
अंगी दिसून येत असत. सबंध शतकात
असा एकच पुरुष निर्माण होतो, असे
त्यांच्याविषयी कोणाही म्हणावे, एवढी त्यांची
थोरवी होती.

गोविंदराव टेंबे

पंजाबात अजूनही ऐकायला मिळतं की,
“ भास्करबुवांचं गाणं झालं की, असं वाटायचं
की, दुसरं गाणं ऐकू नये, हेच ऐकावं.” हे
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटण्यासारखं
आहे.... त्यांनी रंगभूमीच्या माध्यमातून
शास्त्रोक्त संगीताचा खूप प्रचार केला.
अजूनही पुष्कळ लोकांना यमन राग
ओळखता येत नाही. पण यमन म्हटलं की, हे
‘नाथ हा माझा’ सारखं आहे, हे त्यांना
ओळखता येतं.

पं.भीमसेन जोशी

अशी ही देवगंधर्वांची चरित्र मैफल.

पृष्ठसंख्या: 
340
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
1995
सद्य आवृती: 
March, 2008
ISBN No: 
978-81-7434-115-0

• कै.बापूसाहेब विधे वाड्.मय पुरस्कार (रत्नागिरी) मे ८९.
• श्री.रत्नाप्पा कुंभार साहित्य पुरस्कार(कोल्हापूर) जून ८९.
• डॉ.अरुण लिमये पुरस्कार, जुलै ८९.
• पंचगंगा सहकारी साखर कारखाना साहित्य पुरस्कार, सप्टेंबर ८९.
• मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बा.सी.मर्ढेकर साहित्य पुरस्कार, जानेवारी ९०.
• कर्नाटक राज्य साहित्य पुरस्कार, मार्च ९०
• महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, नोव्हेंबर ९०.
• मुकादम साहित्य पुरस्कार(कराड) जानेवारी ९१.
• समता साहित्य पुरस्कार(बेळगाव) मार्च ९१.

पृष्ठसंख्या: 
286
किंमत: 
रु. 235
प्रथम आवृत्ती: 
1998
सद्य आवृती: 
February, 2012
ISBN No: 
978-81-7434-179-2

बांधकाम क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणून कल्पकतेने ते यशस्वी करून
दाखविणारे धडाडीचे उद्योजक म्हणून बी.जी.शिर्के हे महाराष्ट्रास
सुपरिचित आहेत. ‘शिर्के म्हणजे सिपोरेक्स’ हे समीकरण कोणास
सांगावयास नको. परंतु या भव्य यशामागे केवढे अपार कष्ट, सततचे
संघर्ष, उत्तमतेचा ध्यास, ध्येयसिध्दीची जिद्द, भ्रष्टाचाराची चीड व
समाजसुधारणेची आच या गोष्टी दडलेल्या आहेत, हे अनेकांना माहीत
नसेल.

अनेक संकटांवर मात करीत व प्रतिकूल परिस्थतीशी झुंज देत
स्थापत्य क्षेत्रात नवे तंत्र-मंत्र आणूनच शिर्के स्वस्थ बसले नाहीत;
तर बांधकाम क्षेत्रातील गैरव्यवहार व देशाचे नुकसान करणा-या
चुकीच्या पध्दती यांच्यावर ते घणाघाती हल्ले चढवीत आले. कधी
शासकांचा तर कधी समव्यावसायिकांचा रोष पत्करून त्यांनी नुकसान सोसले;
पण धडाडी, जिद्द व आशावाद सोडला नाही. म्हणून घरबांधणी क्षेत्रातील
सर्व सुविधा एकाच छत्राखाली पुरविणारा जगातील एकमेव उद्योग म्हणून
बी.जी.शिर्के आणि कंपनीने ख्याती मिळवली आहे.

सातारा जिल्ह्यातील पसरणी या लहानशा खेडयात छोटया शेतक-याच्या
घरात जन्मलेला बहुजन समाजातील हा मुलगा. शिक्षणाची कौटुंबिक
पार्श्वभूमी नाही, उद्योजकतेची परंपरा नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीत
साहसी जिद्दीने शिक्षण पूर्ण करून व्यवसायाचा ध्यास घेऊन त्यात
यशस्वी झालेले हे विलक्षण उत्साही व्यक्तिमत्व.

शिर्के यांच्या व्यक्तिगत, व्यावसायिक व सामाजिक संघर्षाची त्यांनीच
आपल्या वैशिष्टयपूर्ण शैलीत सांगितलेली ही कथा उद्योजकतेची स्वप्ने
पाहणा-या धाडसी मराठी तरुणांना स्फूर्तिदायक ठरेल, यात शंका नाही.
त्याचबरोबर व्यवसायातील गैरप्रकारांचा त्यांनी केलेला दंभस्फोट वाचून
अनेकांना धक्काही बसेल.

अशी मराठीतील अपूर्व व्यावसायिक आत्मकथा, व्यक्तिगत जीवनातील
संघर्षाचे संवेदनशील पदर असलेली एका उद्योगी माणसाची आत्मकहाणी.

पृष्ठसंख्या: 
160
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2000
सद्य आवृती: 
February, 2011
ISBN No: 
978-81-7434-190-7

हे लखलखतं माणिक...मराठीत प्रथमच

सगळंच भव्य-दिव्य आणि चमत्कारिक!

साता-यातल्या ताम्हणखो-यातली शिलेदार मंडळी गायकवाडांबरोबर
बडोद्याला आली. त्यांनी तलवार गाजवली. म्हणून समस्त ताम्हाणे
‘माणिक’ ह्या किताबानं गौरविले गेले.

त्यातला एक कुलदीपक : गजानन यशवंत माणिक.
ह्या मल्लविद्याविशारदाला बडोदेकर संस्थानिकांनी सांभाळलं. माणिकनं
संस्थानात ऐतिहासिक शस्त्रागार निर्माण केलं. गुरू जुम्मादादांच्या
स्मरणार्थ ‘जुम्मादादा व्यायाम मंदिर’ स्थापन करून ते भरभराटीला
आणलं.

हकीम अब्दुल रहीमकडून युनानी वैद्यक आत्मसात केलं.
अस्थिसंधान विद्या संपादन करून अनेकांना व्याधिमुक्त केलं.
म.गांधींना शरीरमर्दनाची दीक्षा दिली.

‘प्रतापशस्त्रागार’ हा त्या क्षेत्रातला पहिला ग्रंथ रचला. ‘अखिल महाराष्ट्र
शारीरिक शिक्षण मंडळ’ कार्यरत केलं. कुस्तीगीर तयार केले. मलखांबपथकं
उभारली. गायकवाडीला ललामभूत झालेलं हे लखलखतं
‘माणिक’म्हणजेच लो.टिळकांनी गौरविलेले ‘प्रोफेसर माणिकराव.’
त्यांचा हा शैलीसंपन्न परिचय मराठीत प्रथमच...

पृष्ठसंख्या: 
304
किंमत: 
रु. 200
सद्य आवृती: 
December, 2000

“..त्यांनीं गोडीगुलाबीनें प्रजेची मनें राजी
केलीं; त्यांजपुढें आलेल्या मोठमोठया प्रश्नांचा
उदार अंत:करणानें निकाल करून लोकांस
खुष ठेविलें; अत्यंत सुधारलेल्या प्रभूनें
अर्धवट सुधारलेल्या प्रजेचें संगोपन कसें
करावें हें पूर्णपणें जाणून मुंबई इलाख्याचें
राज्य चालविलें इत्यादि गोष्टी जोपर्यंत लोक
आठवतील, तोपर्यंत एलफिन्स्टन साहेबांचें
नांव मागें राहिल.”

पृष्ठसंख्या: 
276
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
1990
सद्य आवृती: 
January, 1999
ISBN No: 
978-81-7434-019-1

विसाव्या शतकावर आपल्या अलौकिक कार्यानं आणि
व्यक्तिमत्वामुळे ज्या लोकोत्तर व्यक्तींचा ठसा उमटला, त्यांमध्ये
हेलन केलर ह्यांचं नाव अग्रगण्य आहे. अगदी लहानपणीच
एका आजारपणात त्यांची दृष्टी गेली. तरीही अंधत्व, मुकेपणा
आणि बधिरत्व अशा तिहेरी अपंगत्वाशी सामना देत त्यांनी
आपलं आत्मनिर्भर स्वत्व शोधलं. पुढे हेलन केलर बोलायला
तर शिकल्याच, पण व्याख्यानंही देऊ लागल्या. वक्तृत्व,
पत्रकारिता, साहित्य आणि अंधकल्याण अशी चौफेर कामगिरी
त्यांनी बजावली. त्यामुळेच जगभरच्या अपंगांच्या दृष्टीनं हेलन
केलर हे केवळ एक नाव नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे
नेणारी एक स्फूर्तिज्योत आहे. त्यांच्या जीवनातल्या
शिक्षणपर्वातले थक्क करणारे अनुभव सांगणारं त्यांचं हे
आत्मकथन – ‘माझी जीवनकहाणी’!

पृष्ठसंख्या: 
102
किंमत: 
रु. 85
प्रथम आवृत्ती: 
1994
सद्य आवृती: 
March, 2013
ISBN No: 
978-81-7434-002-3

जगात कुठेही मानवजात संकटात सापडली, की
धावून जायचं, हा मदर तेरेसांचा सहज धर्म ; मग तो
बांगलादेशचा महापूर असो, ग्वाटेमालातला भूकंप
असो किंवा इथियोपियातला दुष्काळ असो.

आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र या सगळ्या जागी जाताना
त्यांना आठवत असे, ती स्वत:ची जन्मभूमी
अल्बानिया. आपल्या देशाच्या झालेल्या चिंध्या पाहून
त्यांना क्लेश होत. त्या म्हणत, “एक शेवटची इच्छा
आहे, माझ्या जन्मभूमीत जाऊन कार्य करण्याची.
तिथे माझी आज फार गरज आहे.”

कशी होती त्यांची जन्मभूमी ?
त्यांचं बालपण ?

त्यांच्या बालपणापासून ते
‘मदर’पर्यंतच्या प्रवासाची
ही धावती ओळख.

पृष्ठसंख्या: 
94
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
1994
सद्य आवृती: 
July, 2013

ही रंजक कथा आहे
बारा अक्षरी नाव धारण करणा-या एका कल्लेदार व्यक्तीची!
ती आहे एका सामान्य कार्यकर्त्यापासून
आमदार-खासदारकीपर्यंतच्या तिच्या प्रवासाची...
तशीच ती आहे
सरदार घराण्यात जन्मलेल्या आणि
माणसावर मनस्वी प्रेम केलेल्या एका रुबाबदार व्यक्तीची.
वयाच्या चोविसाव्या वर्षी शेतीच्या अभ्यासासाठी
स्वत:च्या हिमतीवर अमेरिकेला गेलेल्या
जिद्दी तरुणाची!
लोकल बोर्डापासून यूनोपर्यंत
भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या आणि
सात मुख्यमंत्री आणि दहा पंतप्रधानांबरोबर
काम करण्याची संधी लाभलेल्या एका दिलदार, लोकप्रिय नेत्याचीही!

पृष्ठसंख्या: 
388
किंमत: 
रु. 225
सद्य आवृती: 
August, 2006
ISBN No: 
978-81-7434-613-1

नाटकाचं चित्रीकरण केलं, की सिनेमा होऊ शकेल,
असं वाटण्याच्या काळात
त्यांनी मूव्ही कॅमेरा बनवला,
बोलका मराठी चित्रपट बनवला,
तो सातासमुद्रापार नेऊन गौरवला,
महाराष्ट्र्राचा मानबिंदू उभा केला...
'प्रभात फिल्म कंपनी'.

'प्रभात'चे चित्रपट सर्वदूर माहीत आहेत,
पण दामलेमामांचा चरित्रपट ?
त्यातलीच ही काही सोनेरी पानं...

पृष्ठसंख्या: 
230
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2013
सद्य आवृती: 
June, 2013