ISBN No: 
978-81-7434-783-1

भारतीय शास्त्रीय कंठसंगीताच्या क्षेत्रामध्ये आपल्या बहुमुखी प्रतिभेची कधीही
न पुसता येणारी ठाशीव मुद्रा उमटविणारे श्रेष्ठ वाग्गेयकार, संगीतकार व
गायक म्हणजे कुमार गंधर्व!

त्यांच्या चैतन्यपूर्ण अस्तित्वाचा, प्रयोगशीलतेचा आणि वैचारिकतेचा शोध
घेण्याचा प्रयत्न 'कालजयी कुमार गंधर्व' या मराठी आणि हिंदी-इंग्रजी (संयुक्त)
अशा द्विखंडात्मक ग्रंथामध्ये केला आहे.

प्रत्येक खंड स्वतंत्र आहे. यामध्ये समाविष्ट केलेले लेख वेगवेगळे आहेत. भाषांतरित नाहीत.

कोणाही रसिकाला कधीही, कोणतेही पान उघडून वाचावासा वाटेल, असा हा संग्राह्य ग्रंथ आहे.

पृष्ठसंख्या: 
280
किंमत: 
रु. 1000
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
March, 2015
ISBN No: 
978-81-7434-753-4

मी मिठाची बाहुली
गेल्या शतकातलं चवथं दशक.
जेमतेम पंधरा पावसाळे पाहिलेली
एक मराठी मुलगी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवते.
अन् पाहता पाहता भाषेची भिंत ओलांडून
मुंबईच्या गुजराथी-मारवाडी नाट्यसृष्टीत एक कुशल
गायिका-अभिनेत्री म्हणून मानाचं स्थान मिळवते.
तर ही गोष्ट आहे सुशीला लोटलीकरची.
म्हणजेच वंदना मिश्र यांची.
आणि प्रतिकूल परिस्थितीशी झुंजणाऱ्या
एका साध्या, पण मानी धैर्यशील कुटुंबाची.
या गोष्टीत आहे अनामिक हुरहूर लावणाऱ्या
मुंबईचा अखंड वावर
एखाद्या सिंगल पर्सन कोरसप्रमाणे.
माणुसकीनं भारलेली अनेक लहान-थोर माणसं
या पुस्तकात भेटतील अन्
वाचकांना लळा लावतील.
वंदनाताईच्या लिखाणात मौखिक परंपरेतला
जिव्हाळा अन् आपुलकी आहे.
त्यांच्या सांगण्यातूनच त्यांचं आत्मकथन सिद्ध झालंय.
हे केवळ स्मरणरंजन नाही,
हे आहे एका अपूर्व काळाचं
अर्थगर्भ आत्मचिंतन.

पृष्ठसंख्या: 
166
किंमत: 
रु. 175
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
July, 2014
ISBN No: 
978-81-7434-735-0

भारत स्वतंत्र झाल्यावर जवाहरलाल नेहरूंचे पुरोगामी,
संवेदनाक्षम आणि द्रष्टे नेतृत्व लाभले म्हणूनच
संसदीय लोकशाहीची सुदृढ पायाभरणी होऊ शकली
आणि धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था स्थिरावू शकली.
या दोन्ही बाबतींतील नेहरूंचे योगदान
न विसरता येण्याजोगे आहे.

अर्थात काश्मीरचा रेंगाळलेला संघर्ष,
चीनबरोबरचा चिघळलेला सीमावाद अशा
अनेक समस्यांचे ओझेदेखील त्यांच्या चुकांमुळेच
आपल्याला अजूनही वाहावे लागते आहे.

तथापि जमाखर्चाचा हिशोब मांडायचाच झाला,
तर नेहरूंनी दिलेल्या देणग्यांचे पारडे निश्चितच जड आहे.

हे पुस्तक म्हणजे त्यांच्या उत्तुंग नेतृत्वाच्या प्रदीर्घ कारकिर्दीचे
सिंहावलोकन आहे.

पृष्ठसंख्या: 
286
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
May, 2014
ISBN No: 
978-81-7434-910-1

एका आगळया समाजपरिवर्तनाच्या प्रयोगाची कहाणी

मेळघाट म्हणजे सातपुडा पर्वतातील घनदाट अरण्यप्रदेश.
येथील तापी-खापरा-सिपना या नद्यांच्या संगमावरचं गाव बैरागड.
दारिद्रयानं पोखरलेलं, आजारानं ग्रासलेलं,
अज्ञानानं पिचलेलं हे छोटं गाव.
१९९० च्या आसपास डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे येथे आले.
दवाखान्यात औषधोपचार व अवघड बाळंतपणं करायची.
पण मनात हेतू गावच्या सर्वांगीण विकासाचा!
त्यांनी संस्था उभारली नाही.
पण प्रबोधनासाठी वेगळया वाटा शोधल्या.
कधी शिक्षणातून प्रबोधन, कधी उत्सवातून प्रबोधन,
तर कधी कोर्टकचेरीचा हिसका दाखवून प्रबोधन.
ते शेतीच्या प्रयोगात शिरले.
ते धर्मांतराच्या प्रश्नाला भिडले.
त्यातून काय घडलं?
हे सांगत आहेत मृणालिनी चितळे.

पृष्ठसंख्या: 
300
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
August, 2015
ISBN No: 
978-81-7434-715-2
अनुवाद: 
सुजाता गोडबोले (मूळ लेखक:पास्कल अ‍ॅलन नाझरेथ)

'महात्मा गांधी हे विसाव्या शतकातील एक लोकोत्तर नेते होते.
जगातील एका बलाढय साम्राज्याला नामोहरम करताना त्यांनी
अहिंसात्मक सत्याग्रहाचे अभिनव साधन वापरले.
त्या साधनाची महती जगभर पसरली.
त्यांच्या जीवनातून अनेकांना नवी प्रेरणा मिळाली'...
हे सारे काही आपण ऐकून असतो;
पण याबद्दलचा महत्त्वाचा तपशील मात्र आपल्याला ठाऊक नसतो.
नेमका तो तपशील पुरवणारे हे पुस्तक...
गांधीजींच्या असामान्य नेतृत्वगुणांची ते मीमांसाही करते,
त्या गुणांमुळे मिळालेल्या यशाची कथाही सांगते
आणि देशोदेशीच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वावर
गांधीजींच्या विभूतिमत्त्वाचा कसा, कोणता प्रभाव पडला,
याचे सविस्तर, सोदाहरण विवेचनही करते.
अनेक देशीविदेशी भाषांमध्ये अनुवादित झालेले हे पुस्तक
आता मराठी वाचकांच्या भेटीला...

पृष्ठसंख्या: 
287
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
May, 2014
ISBN No: 
978-81-7434-694-0

गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी या जयपूर अत्रौली
घराण्याचा घरंदाज वारसा जपणा-या गायिका.
या घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खाँसाहेब यांच्या
सहवासात गाणं शिकण्याची संधी धोंडूताईंना लाभली.

या घराण्याचे चार मातब्बर कलाकार
उस्ताद भुर्जी खाँसाहेब, लक्ष्मीबाई जाधव आणि
ख्याल गायकीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी केसरबाई केरकर
धोंडूताईना गुरू म्हणून लाभले.
संगीताच्या क्षेत्रात ‘घराणी हवीत कशाला’? असे सूर
उमटत असतानाच्या काळात ‘घराणी हवीतच’ असा बाणा
जपणा-या आणि जयपूर गायकीची विशुद्ध परंपरा
सर्वस्व पणाला लावून पुढे चालवणा-या धोंडूताईंनी
त्यांच्या गुरूंविषयी आणि सांगीतिक कारकीर्दीविषयी
सांगितलेल्या आठवणी म्हणजेच -

पृष्ठसंख्या: 
152
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
February, 2014
ISBN No: 
978-81-7434-696-4

चार दशकांपूर्वी भारतातल्या धूळवाटांतून येऊन
अमेरिकेतल्या गगनमहालाला गवसणी घालणा-या
मराठी माणसाचे हे प्रांजळ आत्मकथन.

वास्तुरचनेतून मानवी आयुष्य सुंदर, उन्नत करण्याचा निदिध्यास,
कौटुंबिक एकात्मतेवर प्रगाढ विश्र्वास, स्वत:शीच चाललेला
निरंतर संघर्ष, अविरत विश्र्वभ्रमण, उत्कट कलासक्ति, उदंड कर्तृत्व,
दातृत्व यांची प्रतिबिंबं यात दिसतील.

नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यमान वास्तुरचनाकारांच्या मालिकेत
अग्रभागी विराजमान झालेले अनिवासी भारतीय सुधीर जांभेकर.

मराठी माणसाला अभिमान वाटावी, तरूणाईला प्रेरक ठरावी अशी
एका मनस्वी वास्तुरचनाकाराची ही आगळीवेगळी कहाणी.
वैयक्तिकतेकडून वैश्र्विकतेचा रोमहर्षक प्रवास...

पृष्ठसंख्या: 
198
किंमत: 
रु. 350
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
February, 2014
ISBN No: 
978-81-7434-690-2

या आहेत आठ प्रतिभावंतांच्या चरितकथा.
शारीरिक अन् मानसिक व्याधींपासून
दारुण दारिद्रय अन् टोकाच्या सामाजिक अवहेलनेपर्यंत
अनंत अपेष्टा भोगलेले
हे सारे जणू शापित यक्षच.
मात्र स्वत: दु:ख, यातना भोगणा-या
या सगळयांच्या मनी अवघ्या विश्वाचे आर्त प्रकटले
आणि त्यांच्या अक्षरातून तेच कागदावर अवतरले.
आपल्या प्रतिभेच्या तेजाने विश्वसाहित्याच्या नभात
नक्षत्रांचे अढळ स्थान मिळवणारे

पृष्ठसंख्या: 
200
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
February, 2014
ISBN No: 
978-81-7434-629-2

नेल्सन मंडेला म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा शेवट.
नेल्सन मंडेला म्हणजे प्रदीर्घ कारावासानंतरही
सतेज राहिलेली दुर्दम्य ध्येयनिष्ठा.
नेल्सन मंडेला म्हणजे सा-या मानवजातीसाठी, सा-या जगासाठी
प्रकाशाची दिशा दाखवणारा महान दीपस्तंभ.
इतिहासाच्या अर्धशतकाच्या पानावर
आपली अमिट मुद्रा उमटवणा-या
या महामानवाचे प्रेरणादायी चरित्र

पृष्ठसंख्या: 
168
किंमत: 
रु. 175
सद्य आवृती: 
December, 2013
ISBN No: 
978-81-7434-623-0

सिंगापूर... आग्नेय आशियाच्या नकाशातला
अगदी टिकलीएवढा छोटासा देश.
शेजारच्या मलेशियाच्या आधाराने जगू पाहणारा...
पण त्या देशाने झिडकारल्यानंतर
हताश न होता अथक प्रयत्नांची कास धरणारा...
त्या सिंगापूरने सर्वांगीण प्रगतीची
जी गरूडभरारी घेतली, तिची ही कथा...
त्या प्रयत्नांमागे प्रेरणा होती
ली क्वान यू नावाच्या एका
जिद्दी पण द्रष्ट्या नेत्याची.
त्या नेत्याच्या अफाट कर्तबगारीची ही कथा...
भारतीयांनाही प्रेरक ठरावी अशी...

पृष्ठसंख्या: 
246
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2013
सद्य आवृती: 
September, 2013