ISBN No: 
ISBN 978-81-7434-189-1

स्वामी विवेकानंद - एक झंझावात
त्यांच्या सव्यासाची व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू.
हिंदू रूढी व अंधविश्वासांवर त्यांनी केलेले प्रहार.
धर्म, विज्ञान, संगीत, इतिहास अशा अनेक
विषयांवरील स्वामीजींचे प्रभुत्व.
या सा-याचे रसरशीत, जोशपूर्ण दर्शन
घडविणारे चरित्र.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे दिले जाणारे कै. प्रा. वि. ह. कुलकर्णी उत्कृष्ट चरित्रग्रंथाचे पारितोषिक 1991-92
पृष्ठसंख्या: 
304
किंमत: 
रु. 260
प्रथम आवृत्ती: 
1991
सद्य आवृती: 
August, 2013
ISBN No: 
ISBN No.978-81-7434-047-4

अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे,
एका विचित्र वळणावर
सारी मानवजात येऊन ठेपली आहे.
आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच
पर्याय उरलेले आहेत.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणार्यार
आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर
हताशपणे वाटचाल करायची
किंवा परत मागे फिरून कार्व्हरने
दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या
संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण
या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा.
भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया
घालायचा असेल तर
प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच
हवे असे पुस्तक.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 1981-82
पृष्ठसंख्या: 
184
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
1981
सद्य आवृती: 
January, 2014
ISBN No: 
ISBN 978-81-7434-435-9

हा आजारी पडला, तर अमेरिकेची अर्थव्यवस्था काळवंडून
जायची आणि हा प्रसन्न झाला, तर अनेक देशांत दिवाळी
साजरी व्हायची. कित्येक राष्ट्रप्रमुख, उद्योगपती याच्या
कृपाप्रसादासाठी तासनतास तिष्ठत बसायला तयार असायचे.
हा शेख अहमद झाकी यामानी.
सौदी राजघराण्याशी संबंधित. उच्चविद्याविभूषित तरुण.
'ओपेक', 'ओआपेक'सारख्या संघटनांचा पस्तीस वर्षांहूनही
अधिक काळ सूत्रधार राहिलेला तज्ज्ञ.
कार्लोससारख्या कुप्रसिध्द दहशतवाद्यालाही शह देऊ शकणारा
सौदी तेलमंत्री.
तेलाच्या अर्थकारणाचा व जागतिक राजकारणाचा रागरंगच
पालटवून टाकणारा एक अवलिया.
एक अफलातून तेलिया.
त्याची ही कथा...
डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी

पृष्ठसंख्या: 
256
किंमत: 
रु. 240
प्रथम आवृत्ती: 
2008
सद्य आवृती: 
December, 2011
ISBN No: 
978-81-7434-260-7

गांधी - काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्रं विणणारा विसाव्या शतकातला कबीर.
गांधींनी एका धाग्यात देश जोडला! मनं सांधली! फाळणीचं दुर्दैव मात्र ते टाळू शकले नाहीत.
धर्म ही त्यांच्या मते एक उन्नत प्रेरणा. पण त्यांच्या समोर मात्र धर्माच्या नावावरच रक्त सांडलं-सांडत राहिलं. विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष अशा कचाट्यात असतो गांधी. पुन्हा एकदा पाह्यला हवं महात्म्याकडं.
महादेवभाई देसाई, जमनालाल बजाज, मनुबेन गांधी, हरिलाल गांधी... या आणि अशाच काही जिवलग सहकार्‍यांच्या आठवणी, दैनंदिनी आणि पत्रव्यवहारातून एक वेगळाच नयानवेला गांधी रेखांकित होतो.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2003-04
पृष्ठसंख्या: 
161
किंमत: 
रु. 175
प्रथम आवृत्ती: 
2003
सद्य आवृती: 
March, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-119-8

'माझं आयुष्यच नाटयमय आहे.
तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव
माझ्या चित्रपटांवर पडणारच.
त्यातील सारं वास्तव
मी स्वत:च अनुभवल्यामुळे
माझे चित्रपट जिवंत वाटतात.
नकळत मी लोकांना
जीवनातलं दु:ख दाखवून देतो.'
आपल्या हस-या मुखवटयातून
जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणा-या
मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
केसरी मराठी संस्था व श्रीशिवाजी मंदिर संस्था यांच्यातर्फे साहित्य सम्राट न. चिं. केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक 1992-93
पृष्ठसंख्या: 
520
किंमत: 
रु. 375
प्रथम आवृत्ती: 
1993
सद्य आवृती: 
February, 2011