ISBN No: 
978-81-7434-891-3

जी. ए. कुलकर्णी म्हणजे एक अरभाट साहित्यिक!
अवघ्या सत्त्याण्णव कथांमधून जीवनाचा भला मोठा पैस कवेत घेणारे कथाकार.
जितके प्रतिभेच्या तेजाने तळपणारे,
तितकेच गूढतेचे धूसर वलय बाळगणारे.
ना कोणात मिसळणारे, ना कुणाला भेटणारे.
ना सभासमारंभात मिरवणारे, ना कुणाला सामोरे जाणारे.
कसा शोध घ्यायचा या लेखकाच्या मनातल्या अंत:प्रवाहाचा?
वाचकाला थक्क करणारी त्यांच्या कथासृष्टीतली पात्रे,
परिसर, कथानक आले तरी कोठून?
जी. एं. च्या वैशिष्टयपूर्ण अर्पणपत्रिकांनी
वि. गो. वडेर यांना साद घातली.
आणि त्यातून ते शोधत गेले -
जी. एं. च्या आयुष्यातील व्यक्ती आणि कथांतील पात्रे.
या प्रयासातून उभे राहिलेले हे पुस्तक!

पृष्ठसंख्या: 
430
किंमत: 
रु. 400
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
July, 2015
ISBN No: 
978-81-7434-775-6

---

पृष्ठसंख्या: 
248
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
1997
सद्य आवृती: 
July, 2015
ISBN No: 
978-81-7434-362-8

जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ हा मराठ्यांचा आद्य इतिहासकार म्हणून ओळखला
जात असला, तरी त्याच्याबद्दल अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत.
मराठ्यांचे राज्य लयाला गेल्यानंतरच्या काळात सातारला त्याने बजावलेली
प्रशासकीय कामगिरी तर दुर्लक्षितच राहिलेली आहे.
या पाश्र्वभूमीवर खुद्द इंग्लंडमधील अस्सल कागदपत्रांचा धांडोळा घेऊन
लिहिलेले हे त्याचे चरित्र खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. मराठ्यांचा इतिहास
लिहिण्यामागच्या डफच्या मूळ प्रेरणा, तो इतिहास लिहिताना त्याला
आलेल्या अडचणी, साधनसामग्री गोळा करण्यासाठी त्याने घेतलेले अपार
कष्ट आणि तरीही प्रशासकीय जबाबदारी सांभाळताना इतिहासकार म्हणून
त्याच्या लेखनाला पडलेल्या मर्यादा व राहिलेल्या उणिवा... हे सारे काही
स्पष्ट प्रकाशझोतात आणणारे हे चरित्र मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आस्था
असणा-या सर्वांनीच अवश्य वाचले पाहिजे.

पृष्ठसंख्या: 
232
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2006
सद्य आवृती: 
March, 2012
ISBN No: 
978-81-7434-237-9

डॉ. विश्राम रामजी घोले.
अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरात प्रत्यक्ष युद्धभूमीवर काम करणारे
निष्णात शल्यविशारद.
पुण्यातल्या जहालांचे आणि मावळांचे, ब्राह्मणांचे आणि ब्राह्मणेतरांचे मित्र.
शेती उद्योग, वैद्यक, शिक्षण...अनेक क्षेत्रांतल्या विधयक उपक्रमांचे साथी.
नगरपालिकेचे दीर्घकाळचे जागरूक सेवाभावी सभासद.
त्यांचे जावई डॉ. रघुनाथराव खेडकर हेही प्रख्यात धन्वंतरी.
कोल्हापूर संस्थानातच नव्हे, तर पुणे, भावनगर, नहान, नेपाळ -
सर्वत्र त्यांची कीर्ती पसरलेली.
यादव समाजाचे अखिल भारतीय पातळीवरचे ते पहिले संघटक नेते
आणि वेदान्त तत्त्वज्ञानाची ध्वजा स्वामी विवेकानंदांच्या पाठोपाठ
इंग्लंड-अमेरिकेत फडकत ठेवणारे तेजस्वी धर्मप्रसारक.
या दोन बुद्धिमान आणि कर्तबगार माणसांची
ही चरितकहाणी आहे.

पृष्ठसंख्या: 
282
किंमत: 
रु. 140
प्रथम आवृत्ती: 
2002
सद्य आवृती: 
August, 2002
ISBN No: 
978-81-7434-850-0

चित्रकार गोपाळ देऊसकर
ही कहाणी आहे त्यांच्या चित्रनिर्मितीची.
बालपणीच त्यांच्यातले चित्रगुण प्रकटले.
उत्तरोत्तर ते बहरत गेले.
या कलेच्या जोरावर ते इंग्लंडला
जाऊन रॉयल ऍकॅडमीत शिकले.
भारतीय संस्थानिकांच्या राजवाडयातून वावरले.
पुण्याच्या 'टिळक स्मारक मंदिरा'तील
लोकमान्य टिळक जीवनदर्शन
आणि 'बालगंधर्व रंगमंदिरा'तील
बालगंधर्व त्यांच्या कुंचल्यातून साकार झाले.
त्यांच्या कॅनव्हासवर कोटयवधींचे दागिने
ल्यालेली राणी उमटली,
तशीच दूध विकणारी खेडूत स्त्रीही!
अशी त्यांची कित्येक चित्रे!
ही कहाणी आहे देऊसकरांच्या
व्यक्तिगत जीवनाची.
लहानपणीच आईवडलांचे छत्र हरपले.
त्यांचे जीवन एकाकी तरीही रंगीन,
अफलातून तरीही काटेकोर हिशोबी!
त्यांनी हौशीने संसार उभारला
आणि व्यवहारीपणे तो तोडलाही!
ते जगले जन्मभर चित्रकलेच्या साथसंगतीतच!
स्वत:च्याच मस्तीत!
सुप्रसिध्द चित्रकार सुहास बहुळकर
यांच्या शब्दांतून रंगलेले हे देऊसकर दर्शन.

पृष्ठसंख्या: 
272
किंमत: 
रु. 350
सद्य आवृती: 
March, 2015
ISBN No: 
978-81-7434-844-9
अनुवाद: 
सुनीता लोहोकरे

डॉ. आई तेंडुलकर.
नावापासूनच सारे विलक्षण.
बेळगावजवळील छोटयाशा गावातला बुध्दिमान तरूण,
गणपत तेंडुलकर शिक्षणासाठी युरोपात जातो. तेथेच तीन विवाह
करतो. डॉ. आई तेंडुलकर या नावाने जर्मन वृत्तपत्रांत भारतीय
स्वातंत्र्यलढयाचे चित्रण करू लागतो.
आणि अचानक दुस-या महायुद्धाचे पडघम वाजू लागतात. हा युवक
भारतात परतून मराठी वृत्तपत्र सुरू करतो. स्वातंत्र्य चळवळीतील
सहभागासाठी पाच वर्षांचा तुरुंगवास भोगतो. गांधीजींच्या
आश्रमातील एका तडफदार तरुणीशी विवाह करतो. स्वतंत्र
भारतासाठी पोलाद उद्योग सुरू करतो.
त्याचे सगळे आयुष्यच विलक्षण आणि जगावेगळे.
दोन देशांत घडलेली, डॉ. आई तेंडुलकर यांची,
त्यांच्याच कन्येने सांगितलेली ही अदभुत कहाणी.

पृष्ठसंख्या: 
282
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
February, 2015
ISBN No: 
978-81-7434-829-6

मराठवाडयातील एका सर्वसामान्य हिंदू कुटुंबात
जन्माला आलेली आणि निजामी राज्यात स्वकर्तृत्वाच्या जोरावर
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदापर्यंत पोचलेली
पहिली व्यक्ती म्हणजे केशवराव कोरटकर.
त्यांचे हे छोटेसे चरित्र.
काशिनाथराव वैद्य या एका निकटवर्तीयाने लिहिलेले.
1933 साली त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी प्रसिध्द केलेले...
न्या. कोरटकर यांच्या कार्याचे ऐतिहासिक मोल
लक्षात घेऊन मुद्दाम त्या चरित्राची ही नवी संपादित आवृत्ती.
नरेन्द्र चपळगावकरांच्या विवेचक प्रस्तावनेसह...

पृष्ठसंख्या: 
86
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
February, 2015
ISBN No: 
ISBN 978-81-7434-837

डॉ. गोविंद स्वरूप
हे भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक. कल्याण येथे प्रायोगिक रेडिओ दुर्बीण उभारून त्यांनी भारतात या शास्त्राचा श्रीगणेशा केला. पुणे जिल्ह्यामध्ये खोडद या गावी त्यांच्या पुढाकाराने रेडिओ दुर्बिणींचे संकुलच उभारण्यात आले. 'मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण' (जीएमआरटी) म्हणून
ओळखला जाणारा हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय ठरलेला आहे.
भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचा लौकिक जगभर नेणारे उमदे आणि उत्साही शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचा हा परिचय.

पृष्ठसंख्या: 
110
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
February, 2015
ISBN No: 
978-81-7434-816-6

प्रिय दिलीप

'जिगसॉ', 'जिव्हाळा', माझं संकल्पित
पुस्तक 'जिज्ञासा' या तिन्ही पुस्तकांची प्रेरणा
समान आहे. माझ्या वाढत्या वयापासून थोर
प्रतिभावंत आणि विचारवंत यांच्याशी माझा संबंध
येत गेला. आमच्या योग्यतेतील फरक लक्षात न
घेता त्यांनी मला जवळ येऊ दिलं. आमच्यामधील
संवाद -विसंवाद आणि तरीही स्नेहभावना यांचा
वेध घेण्याचा माझा चाळा सुरू झाला. गेली
पंचेचाळीस वर्षं तुम्ही 'माणूस'मधून आणि
त्यानंतर राजहंस प्रकाशनाच्या माध्यमातून माझ्या
लेखनाचा पाठपुरावा करत आलात.
मराठी प्रकाशनाच्या कामात माझा ज्यांच्याशी
संपर्क येत गेला त्या गंगाधर गाडगीळ यांच्यापासून
विश्राम आणि मालतीबाई बेडेकर यांच्यापर्यंत
युगप्रवर्तक लेखकांविषयी लिहिताना छाती दडपून जाते.
वसंत कानेटकर, दुर्गा भागवत, कुसुमाग्रज,
विंदा करंदीकर, ग्रेस सारीच अद्वितीय माणसं. तारा
वनारसे, ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि श्री.पु. भागवत
ही माझी अखंड मित्रमंडळी. या सा-यांबद्दल
लिहिणं हे अत्यंत जबाबदारीचं. न लिहावं तर
यांच्याशी दीर्घकाल जवळीक साधता आली ती
इतरांपर्यंत न पोहचवण्याचा अप्पलपोटेपणा.
ते सारं लिहून वाचकांपर्यंत नेण्यात जिव्हाळा हीच
माझी प्रेरणा आणि जिव्हाळा हेच माझं समर्थन.
-रामदास

पृष्ठसंख्या: 
420
किंमत: 
रु. 400
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
January, 2015
ISBN No: 
978-81-7434-794-7

भारतीय शास्त्रीय संगीत के क्षेत्र में अपनी बहुमुखी प्रतिभा से कभी न मिटनेवाली
नाममुद्रा अंकित करनेवाले युगप्रवर्तक संगीतकार, वाग्गेयकार, गायक पंडीत कुमार गंधर्व
की नब्बेवी जन्मजयंती के उपलक्ष्य में 'कालजयी कुमार गंधर्व' यह ग्रंथ दो भागों में
संपादित किया गया है।

पंडित कुमार गंधर्व की प्रखर प्रतिभा, प्रयोगशीलता के संदर्भ में उनकी सांगीतिक
विचारशीलता का मर्म समझाने का प्रयास इन ग्रंथो में किया गया है।

हिंदी-अंग्रेजी(संयुक्त) एवं मराठी भाषाओं में छपे यह दोनों ग्रंथ स्वतंत्र हैं।
इनमें समाविष्ट किये गए लेख भाषांतरित न होकर भिन्न भिन्न है।

कभीभी, किसीभी पृष्ठ को खोलकर पढने का आनन्द पाठकों को इन संग्राह्य ग्रंथों के
माध्यम से मिल सकेगा।

पृष्ठसंख्या: 
277
किंमत: 
रु. 1000
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
November, 2014