ISBN No: 
978-81-7434-315-4

--

पृष्ठसंख्या: 
138
किंमत: 
रु. 130
प्रथम आवृत्ती: 
2005
सद्य आवृती: 
June, 2012
ISBN No: 
978-81-7434-801-2

एक उलट एक सुलट

अक्षरांशी ओळख,
अक्षरांशी मैत्री, अक्षरांशी गप्पा
आणि अक्षरांसोबतीनं धरलेला फेर...

ती गाते सुरेख,
अभिनय तर तिच्या आवडीचा,
पण तिला व्यक्त व्हायला
या अक्षरांनीच हात दिला...

तिच्या मनातल्या विचारवादळांची
अन् आयुष्यातल्या अनुभवसरींची
अक्षरांनीच घडवली वीण...
एक उलट... एक सुलट

पृष्ठसंख्या: 
192
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
January, 2015
ISBN No: 
978-81-7434-716-9

ही अवघी सृष्टी म्हणजे जणू सृजनाचा फुललेला मळा!
या मळयाला सिंचन करतात पै-पर्जन्याच्या धारा.
एकाकी वाटणाऱ्या आभाळात विहार करतात मेघदूत.
रहाटमाळ न कुरकुरता विहिरीत उतरते, पाण्याने भरते,
वर येते, पन्हाळयात रिकामी होते... रिकामी होते, म्हणून पुन्हा भरते. समर्पण आहे म्हणून भरून पावणे आहे.
गातगात देत राहणे, देता देता भरून पावणे हाच आनंदाचा मूलमंत्र.
निसर्गाच्या खुल्या पाठशाळेत हा मूलमंत्र आपलासा करण्याची किमया ज्याला साधली, अशा हळव्या कविहृदयाच्या धर्मोपदेशकाने रचलेली भावकविता म्हणजे 'सृजनाचा मळा'.
जीव लावणारे लोभस पक्षी नि आत्म्याचे पोषण करणारे कोकिळगान... कोजागिरीच्या रात्रीचा नृत्यरंग नि मुग्ध चाफा...
गंधाच्या रानात 'तो' आणि 'ती' ह्यांनी मांडलेला खेळ...
शब्बाथराणीचा लडिवाळ सहवास नि प्रिय येशूचा आश्वासक आधार... अशी एक ना दोन... अनेकानेक निसर्गचित्रे रेखाटणारी प्रसन्न शैलीतील ही आस्वादक गद्यकाव्ये मराठी ललित वाङ्मयाच्या दालनात मानाने मिरवतील, यात शंकाच नाही!

पृष्ठसंख्या: 
138
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
May, 2014
ISBN No: 
978-81-7434-633-9

आपल्या आजूबाजूच्या घटनांचा
तिरकस लेखणीतून घेतलेला वेध...
हे या पत्रापत्रीचं स्वरूप.

तात्यासाहेब आणि माधवराव या जोडगोळीच्या
साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात.
यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो;
तर कधी आफ्रिकावारीतले 'उद्योग' हसू आणतात.
याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्य समोर येतं,
तर कधी होर्डिंग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत..

तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा
प्रभावळकरांचा मिस्कीलपणा आणि
या जोडगोळीची धम्माल
यासाठी वाचावं असं ...

पृष्ठसंख्या: 
156
किंमत: 
रु. 125
प्रथम आवृत्ती: 
2013
सद्य आवृती: 
October, 2013
ISBN No: 
978-81-7434-095-5

आपल्या खेळाची दुनिया अगाध आहे.

प्रत्यक्ष मैदानात खेळणारे मूठभर.
पण त्याबाबत लिहिणारे, बोलणारे, पैजा लावणारे,
अफवा पसरवणारे, अनाहूत सल्ले देणारे,
हजारो-लाखो नव्हे, सगळेच.
दिलाप प्रभावळकरांची मर्मग्राही लेखणी
या सर्वांचा मिस्कील वेध घेते, तेव्हा निर्माण होते गुगली.

जिच्यात एकच चीत्कार हे क्रीडापाक्षिक कष्टपैलू संघाच्या
खेळाचा आढावा घेत. ऑडीत बसून माहीममध्ये हिंडणा-या
रवी शास्त्रीला लोक धीरूभाई शास्त्री म्हणायला लागतात.
एखाद्या चाळकरणीचं मालकाशी पाण्यावरून भांडण झालं,
की, मी काही तुमची मांडलिकोव्हा नाहीयेत, असं ती ठणकावते.
सोल ऑलिम्पिकनंतर मराठी रंगभूमीवर ‘पातळमिठी’ हे
नवं नाटक आणण्याचा प्रस्ताव येतो. एखादे आजोबा आपल्या
नातवाला बॅटिंगची प्रॅक्टिस देण्यासाठी सटासटा बटाटे टाकतात.
रमण लांबा नव्याने उद्योजक झाल्यावर आपल्या हॉटेलमध्ये
‘एक्स्टकव्हर बँक्वेट हॉल’, सिलीपॉइंट मीटिंग रूम उघडतो.
सगळे मिळून जगणंच खेळमय करतात. किती न्याहाळावं..
किती बघावं..किती टाळ्या द्याव्या-घ्याव्यात, असा प्रश्न पडतो.

झकासपैकी ‘गुगली’ बघताना तरी वेगळं काय होतं ?

पृष्ठसंख्या: 
128
किंमत: 
रु. 120
प्रथम आवृत्ती: 
1997
सद्य आवृती: 
March, 2013
ISBN No: 
978-81-7434-329-1
पृष्ठसंख्या: 
270
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2005
सद्य आवृती: 
September, 2009
पृष्ठसंख्या: 
238
किंमत: 
रु. 175
सद्य आवृती: 
January, 2007
ISBN No: 
978-81-7434-328-4
पृष्ठसंख्या: 
304
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
1994
सद्य आवृती: 
March, 2011
ISBN No: 
978-81-7434-316-1
पृष्ठसंख्या: 
182
किंमत: 
रु. 140
प्रथम आवृत्ती: 
1972
सद्य आवृती: 
March, 2005
ISBN No: 
978-81-7434-476-2

सोनाली कुलकर्णी
ही देखणी आहे.
उत्तम अभिनेत्री आहे.
आणि तेवढीच संवेदनशील माणूसही.
त्यामुळेच, ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही
छोटया-मोठया प्रसंगांचा
तिनं घेतलेला वैचारिक वेधही
तेवढाच लोभस आहे.
मूल्यांवर आधारलेला आहे.
म्हणूनच, वाचावा असाही आहे.

पृष्ठसंख्या: 
236
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
February, 2011