ISBN No: 
978-81-7434-948-4

कविता महाजन यांच्या या दीर्घकवितेत एका मासळीचे समुद्रातले जीवन चित्रित करण्यात आले आहे. या कवितेत सलगपणे रेखाटले गेलेले मत्स्यजीवनाचे चित्र हे अंतिमत: मानवी जीवनाचेच चित्र बनून जाते. मानवी जीवनासंबंधीच्या सनातन आणि मूलभूत जाणिवांचा व्यापक पट या दीर्घकवितेने आपल्या कवेत घेतला असून तो मत्स्यजीवनाच्या संदर्भात अर्थपूर्ण बनवला आहे. माणसाच्या ठिकाणी स्वाभाविकपणे असलेली जिजीविषा आणि तिच्याशी अतूटपणे संलग्न असलेली गूढ अशी मृत्युप्रेरणा यांचे प्रभावी व प्रत्ययकारी चित्र या कवितेत रेखाटले गेले आहे. मानव ज्या जगात जगत असतो त्या जगापेक्षा वेगळया जगाची त्याला वाटणारी ओढ, मुळात व्यामिश्र असलेल्या आणि त्यामुळे अल्प प्रमाणात आकलनीय असलेल्या या जगासंबंधीचे आणि या जगापलीकडचे जे अज्ञात आहे ते जाणून घेण्याची मानवाच्या ठिकाणी असलेली ऊर्मी, इच्छाआकांक्षांच्या तृप्तीची मानवाची धडपड आणि त्यात त्याला प्राप्त होणारे विपरीत फल, सभोवतालाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही तो साधला जाण्यातील अशक्यता, अशा या प्रतिकूल परिस्थितीमुळे जाणवणारी जीवनाची निरर्थकता, आशयशून्यता आणि त्यातून निर्माण होणारी परकेपणाची-एकाकीपणाची भावना, त्यामुळे बलिष्ठ होत जाणारी मृत्युप्रेरणा, अशा मूलगामी, सनातन जाणिवांचा प्रत्यय या दीर्घ कवितेत घडवला गेला आहे. मराठी काव्यपरंपरेत दीर्घकवितांची निर्मिती अल्प प्रमाणात झालेली आहे आणि आजही मराठी कवींना हा आव्हानात्मक काव्यप्रकार आकर्षित करून घेताना दिसत नाही. अशा परिस्थितीत कविता महाजनांची `समुद्रच आहे एक विशाल जाळं' ही एकाच वेळी कथात्म आणि चिंतनात्म रूप धारण करणारी दीर्घकविता मराठी काव्यपरंपरेतील ही उणीव काही प्रमाणात दूर करणारी ठरणार आहे.

पृष्ठसंख्या: 
92
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2016
सद्य आवृती: 
February, 2016
ISBN No: 
978-81-7434-782-4

Fragrance of the Earth

Bahinabai Choudhary... An illiterate rural woman...
But still she had a rare gift of genius and her
inborn qualities flowed through her poetic ovis.
Translating her poems from Ahirani – a dialect
of Marathi – into standard English is realy a
herculean task. Prof. Madhuri Shanbhag deserves
sincere accolades for accomplishing it.
All the salient features of Bahinabai's poetry -
her native wisdom, unique power of observation and
unbelievable command over poetic expressions -
are brought out here in excellent translation
so that the fragrance of her earthly poetry
may spread to wider audience.

पृष्ठसंख्या: 
166
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
September, 2014
ISBN No: 
978-81-7434-195-2

श्री.हिमांशु कुलकर्णी यांचा ‘शहर एक कबर’ हा एक महत्त्वाचा
कवितासंग्रह आहे. पापणी जागी ठेवून आधुनिक माणसाचा शोध घेणारी
खोल जाणीव या कवितांना व्यापून राहिली आहे. यंत्रयुगाने माणसाच्या
डोक्यावरचे कष्टांचे ओझे खाली उतरवले. माणसाला यंत्राने दिलेली ही
मुक्ती वरदान ठरली काय ? की माणसाचे यंत्र झाले आणि यातून माणुसकीच्या
अवमूल्यनाची प्रक्रिया सुरू झाली ? ‘स्वत:चं मढं स्वत:च्या पाठी’ अशी
माणसे ‘दहा बाय दहाच्या खुराडयात शेवट नक्कीच होईल गोड’ हे ‘गोड’
स्वप्न पाहात राहिली ? शहर ही एक संस्कृती की माणुसकीची कबर ? मोरांचा
झडून गेलेला पिसारा आणि इथल्या सगळ्या स्वप्नांचा गळून गेलेला
फुलोरा श्री.हिमांशु कुलकर्णी करुणेच्या डोळयांनी पहातात. निवडुंगातून फूल
यावे तसे त्यांच्या काटेरी अनुभवाला आलेले करुणेचे हे फूल या कवितांतून
हाक घालते. श्री.हिमांशु कुलकर्णी यांची भाषा ही करुणेचा स्वर लाभलेली
सत्याची भाषा आहे. ही कविता सूचक प्रतिमांनी बोलते. या प्रतिमा ही
कविता आरशांसारख्या पुढे ठेवते. आपले जे खरे रूप पाहायचे माणसे
सतत टाळीत असतात, ते या प्रतिमांच्या आरशात कविता वाचताना
त्यांना दिसू लागते. स्वत:ला समजून घेण्यासाठी स्वत:ला पाहावेच लागते.
श्री.हिमांशु कुलकर्णी यांची कविता कुठेही हिडिस-विकृत न होता बुध्दाच्या
करुणेचे हे दर्शन घडवते. श्री.हिमांशु कुलकर्णी यांच्या कवितांमधून प्रीतीचा
कोमल झरा हळुवारपणे वहातो आहे. तो त्यांच्या प्रेमकवितांतून तर
जाणवतोच; पण त्यांच्या उपरोधालाही तो हिंसेचे हत्यार बनू देत नाही.
‘शहर एक कबर’ हा संग्रह मी वाचला, तेव्हा एक उत्कृष्ट कवितासंग्रह
वाचल्याचे समाधान मला मिळाले.

मंगेश पाडगावकर

पृष्ठसंख्या: 
76
किंमत: 
रु. 50
सद्य आवृती: 
October, 2000
ISBN No: 
978-81-7434-142-6

भावकविता ही काही विशिष्ट संदर्भांतच रचली गेलेली
असते आणि त्या संदर्भांतच ती कृतार्थ होत असते. हे
संदर्भ त्या कवितेवरूनच कळून येत नसले, तर अन्य
मार्गांनी जाणून घ्यावे लागतात. ते नीट उमगले नाहीत,
तर साहजिकच ती कविता दुर्बोध होते. मर्ढेकरांच्या कित्येक
कवितांत याचा पुरा प्रत्यय येतो. मर्ढेकरांचा काळ आणि
त्यांचे जीवन यांच्या संदर्भांतच त्यातील प्रतिमा खुलू-
बोलू लागतात.

मर्ढेकरांच्या काही दुर्बोध कवितांना हे संदर्भ पुरविण्याचा
प्रयत्न प्रस्तुत लेखांत केलेला आहे. त्यातून अकल्पितपणेच
नऊ सलग कवितांचा एक मोनोड्रामा साकार व्हावा, हेच
त्याच्या यशाचे आश्वासक गमक!

पृष्ठसंख्या: 
188
किंमत: 
रु. 140
सद्य आवृती: 
April, 1999

''हा एक अगदी वेगळया वाटेनं जाणारा चित्रसंग्रह. तो पाहायचा आणि वाचायचाही. वाचायच्या आहेत त्या कविता.
चित्रांना जुगलबंदीप्रमाणे शब्दांची त्या साथ देत असतात. प्रत्येक चित्र सरळ पाहायचं. नंतर त्या चित्रानं शीर्षासन केलं
की त्यातून दुसरंच एक चित्र दिसूं लागतं. असा अफलातून संग्रह प्रथमच माझ्या पाहण्यात आला...''
''... पुस्तकातील काही चित्रं गूढ, गंभीर, उदास, गमतीची अगर प्रक्षोभकही वाटतील. पाहणाऱ्याच्या दृष्टीवर ते सोकावावं.
प्रत्येक चित्र एका फिरत्या रंगमंचावर प्रवेश करतं. एक कोडं घालतं. मंच फिरल्यावर त्याचं सचित्र उत्तर दिसतं.
असा हा दृश्यकलेचा खेळ. वाचकांना एक वेगळा अनुभव व आनंद देणारा.
चित्रकार अरविंद नारळे आणि सहभागी कवींचं मन: पूर्वक अभिनंदन!''
शि. द. फडणीस, पुणे

किंमत: 
रु. 200
सद्य आवृती: 
November, 2011
ISBN No: 
978-81-7434-469-4

किती विचित्र घटना रात्रीतुन ह्या घडल्या ।
डोहात चांदण्या अश्या कश्या अडखळल्या ।
ओठात कळयांच्या मूक हुंदके विरले
अडकला चंद्र काटयात बाभळी रडल्या ।

पृष्ठसंख्या: 
120
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
August, 2009
ISBN No: 
978-81-7434-429-8

ही अक्षरं नाहीत
हे शब्द नाहीत
या कविता नाहीत

मौनातून उसळून
मौनात विसर्जित होण्यापूर्वी
मध्यसीमेवर अस्तित्वभान देत
निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची
स्मारकं आहेत ही

उभ्या आडव्या रेषा
काही बिंदू, काही वळणं
आणि बरचसं अवकाश
यांनी घडवलेली!

पृष्ठसंख्या: 
120
किंमत: 
रु. 80
सद्य आवृती: 
September, 2008
ISBN No: 
978-81-7434-379-6
अनुवाद: 
आसावरी काकडे

उत्कृष्ट अनुवादासाठीचा ’साहित्य अकादमी’चा पुरस्कार लाभलेल्या या काव्यसंग्रहाचा गोवा विद्यापीठामधल्या एका पदव्युत्तर अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे. महाभारतातली ही कथा.

’गालव’ हा ’विश्वामित्र’ ऋषींचा शिष्य. त्याच्या आग्रहाखातर विश्वामित्र त्याच्याकडे ८०० श्यामकर्णी घोड्यांची दक्षिणा मागतात. ती देण्याची ऐपत नसलेला गालव राजा ’ययाती’कडे जातो. ययातीकडेही तेवढं द्रव्य नसतं, परंतु याचकाला विन्मुख पाठवायचं नाही म्हणून तो आपली रुपमती मुलगी ’माधवी’ विनियोगासाठी गालवाला देतो. तिला ३ राजांकडे प्रत्येकी १ वर्ष गालव उपभोगासाठी ठेवतो. वर्षानंतर प्रत्येकाकडून २०० श्यामकर्णी घोडे घेऊन ६०० घोड्यांची दक्षिणा विश्वामित्राला देतो. विश्वामित्र स्वतःकडे माधवीला वर्षभर ठेवतात आणि उरलेल्या २०० घोड्यांची दक्षिणा माफ करून टाकतात. त्यानंतर ययाती तिचं स्वयंवर मांडतो, परंतु ती सगळ्यांना अव्हेरून तपोवनात निघून जाते.

अशी ही आदर्श गुरू, त्याचा आज्ञापालनकर्ता थोर शिष्य आणि नरोत्तम राजा ययाती यांची गोष्ट...

यात ’माधवी’चं स्थान काय? तिच्या इच्छा काय? तिला कसं समजावून घ्यायचं? तिच्यापर्यंत कसं पोचायचं?

’माधवी’च्या वेदनेचं महाभारत जाणून तडफडणार्‍या डॉ. देवल यांनी चहुअंगांनी तिचा वेध घेतला आहे. आणि तरीही हे करताना ते ’स्त्री’ च्या भूमिकेत शिरलेले नाहीत. पुरुष आणि स्त्री आदिअंतापर्यंतचं सत्य निखळपणे, प्रगल्भपणे अन् विनम्रपणे स्वीकारून ’माधवी’ रूपानं स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणार्‍या व्यथा-वेदनांना ते निर्विषपणे सामोरे गेले आहेत.

स्त्री प्रश्नांची दाहकता पुरुषांना जाणवली, तर ती किती थेटपणे भिडू शकते, याचं हा काव्यसंग्रह मूर्तिमंत प्रतीक आहे. कवीचं, त्याच्या काव्याचं अन् अनुवादाचं हे रूप फार विरळा आहे.
वाचावंच असं -

पृष्ठसंख्या: 
160
किंमत: 
रु. 125
प्रथम आवृत्ती: 
2007
सद्य आवृती: 
April, 2007
ISBN No: 
978-81-7434-195-2

हिमांशूंच्या कवितेत,
पळसपानांचे द्रोण,
प्राजक्त, रातराणी, फुलपाखरं
जशी येतात, तसंच
सलाइन आणि स्कॉचच्या
बाटल्याही येतात,
इन्फ्रारेड डोळे येतात आणि
सेपीया रंगही येतात.
अर्मानीसारख्या उंची,
अभिनव सुगंधाचा उल्लेख
येतो आणि
केसांचा नायगाराही येतो.
ह्या सगळयांना संदर्भ
असतो कवीच्या एका
वेगळ्याच उत्कट,
जिवंत अनुभवाचा.
मला ह्या कविता फार
आवडल्या म्हणून
कौतुकाचे, आशीर्वादाचे
हे चार शब्द लिहिले,
इतकंच.

इंदिरा संत

पृष्ठसंख्या: 
80
किंमत: 
रु. 50
सद्य आवृती: 
October, 2000

’काळ कुठला का असेना कवी मांडत राहील एक विराट कोलाहल.

आईच्या दुधातून माझ्या ओठांत उतरलेल्या भाषेत मांडीन मी अवघी कासावीशी.
माझ्या वाट्याला आलेल्या काळाच्या तुकड्यावर मी कोरीन माझं इवलं हस्ताक्षर.’

’कोणत्याही दिशेनं गेलो, तरी कवितेकडेच परतून आलो आहे मी... पुन्हापुन्हा’ हे सांगणार्‍या या तरुण कवीचा हा उत्कट काव्यसंग्रह.

’मी कविता लिहिली नसती... पण... हाती आलेल्या प्रत्येक वस्तूची लेखणी होते’ हा कबुलीजबाब देत आयुष्याला कळत-नकळत आयाम देणार्‍या कवितांचा सुंदर आविष्कार!

पृष्ठसंख्या: 
77
किंमत: 
रु. 60