वितरण

मराठी नाट्यसृष्टीचा पावणेदोनशे वर्षांचा संंक्षिप्त इतिहास म्हणजेच प्रस्तुत ग्रंथ होय. मराठी रंगभूमीच्या प्रारंभकालापासून ते तिच्या संक्रमण - उत्कर्ष - सुवर्ण - आसन्नमरण - अशा अवस्था आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुनर्जन्म घेऊन सातासमुद्रापार झेपावणारा नाट्यमय प्रवास इथे शब्दबद्ध झाला आहे.
विष्णुदास भावे, किर्लोस्कर, देवल, गडकरी, अत्रे, पुलं, तेंडुलकर असे नाटककार; गणपतराव जोशी, भाऊराव कोल्हटकर, बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, ज्योत्स्ना भोळे यांच्यापासून ते आजकालच्या रंगकर्मींपर्यंतचा कलाप्रवास; याचबरोबर अनेक नाट्यसंस्था आणि पडद्यामागचे कलाकार अशांची आस्थेनं घेतलेली नोंद इथे आहे.
गेल्या पन्नास वर्षांंहूनही अधिक काळ रंगभूमीचं वेड जोपासणार्‍या श्रीराम रानडे या नाट्यधर्मीने शब्दरूप दिलेला हा ठेवा रसिकांच्या संग्रही असायलाच हवा.

पृष्ठसंख्या: 
248
किंमत: 
रु. 250
सद्य आवृती: 
October, 2014
ISBN No: 
978-81-7434-833-3

पाच लाख म्हशी.
दोन लाख गायी.
अठराशे कर्मचारी. असंख्य उद्योजक.
चाळीस लाख ग्राहक.
या सा-यांचं नांदतं-गाजतं कुटुंब म्हणजे
कोल्हापूरचा दूधसंघ –
‘गोकुळ’.
आणि या ‘गोकुळ’ला प्रगतिपथावर नेणारा
नंदगोप म्हणजे अरूण नरके.
सलग दहा वर्षं या संघाचं अध्यक्षपद भूषवणारे
अरूण नरके म्हणजेच गोकुळ
अन्
गोकुळ म्हणजेच अरूण नरके
असं समीकरणच सिद्ध झालेलं.
म्हणूनच अरूण नरके यांनी सांगितलेलं आत्मकथन बनलंय
‘गोकुळगाथा’

पृष्ठसंख्या: 
180
किंमत: 
रु. 450
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
February, 2015
ISBN No: 
978-81-7434-792-3

'दुनियेच्या बाजारी जरा हिंडू या,
देशाटनातून अनुभवाची शिदोरी साठवू या'

या विचारानं परदेशात गेलेला
एक संवेदनशील व्यवस्थापन तज्ज्ञ

आपल्या जगभरच्या भ्रमंतीत
त्याने टिपले अनेक अनुभव
न्याहाळल्या अनेक घटना,
त्याला भेटली अनेक माणसं

या साऱ्या कणचित्रातून अन् क्षणचित्रातून
बनलेलं कोलाज

ब्रॅकनेलच्या खिडकीतून

पृष्ठसंख्या: 
117
किंमत: 
रु. 120
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
October, 2014

विविध समस्यांच्या अंधारात चाचपडणा-या
आपल्या मुलांना, त्यांच्या पालकांना व शिक्षकांना
समुपदेशनाचा बहुरंगी दिवा दाखवता आला तर...
या तळमळीतूनच प्रकाशित झालंय
‘रंग समुपदेशनाचे’
आयुष्याच्या टप्पयांवरील विविध समस्या
आणि त्यांवरील उपाय यांचे विश्लेषण
मानसशास्त्रीय समुपदेशकांनी मांडलेले आहे.
ते वाचतांना आपले परस्परसंबंध, भावनांची
आंदोलने, सवयी याविषयी नवनवे पैलू
उलगडत जातात. सर्वसामान्य व्यक्ती, विद्यार्थी,
पालक, शिक्षक, प्रशिक्षणार्थी शिक्षक,
समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते
यांना या पुस्तकाद्वारे नवी दृष्टी मिळेल.
हे पुस्तक समुपदेशनाच्या कार्याला
नक्कीच एक नवी दिशा देईल.

पृष्ठसंख्या: 
236
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
January, 2014

डॉ.अशोक दा.रानडे म्हणजे विसाव्या शतकातील
भारतीय संगीत-संस्कृतीचे एक अग्रगण्य भाष्यकार...

गायक,रचनाकार, आवाज-जोपासना-शास्त्रकार,
संगीत व नाट्य अशा ललितकलांच्या संदर्भात मौलिक व
सखोल लेखन करणारे तज्ज्ञ व विचारवंत
असे बहुआयामी व्यक्तित्त्व असणा-या डॉ.अशोक दा.रानडे
यांच्या व्यापक कार्याचा आढावा घेणारा हा गौरव ग्रंथ...

डॉ.अशोक दा.रानडे यांची निवडक भाषणे, मुलाखती, पत्रव्यवहार,
लेखनाची विस्तृत सूची, संकल्पनाधारित कार्यक्रम व
ध्वनि-चित्रफितींची सूची, बंदिशींचे निवडक नमुने
यांसह अनेक मान्यवरांचे मराठी, हिंदी व इंग्रजी ६५ लेखांचे
संकलन असणारा हा संग्राह्य गौरव ग्रंथ...

पृष्ठसंख्या: 
348
किंमत: 
रु. 400
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
December, 2012

आपल्या संग्रही असावे असे पुस्तक
“ यशवंत व्हा!”
… दहावी बारवीच्या
‘मेरिट लिस्ट’चा राजमार्ग

पृष्ठसंख्या: 
60
किंमत: 
रु. 70
प्रथम आवृत्ती: 
1996
सद्य आवृती: 
June, 2013

This information book is a rough sketch of my personal thoughts about the North Indian Classical Music. It is a purely technical literature. It deals with the Theoretical, abstract, analytical, technical as well as the practical aspects of the concerned subject. I have presented and explained so many important points that normally disciples do not get form their Gurus (teachers). It will certainly open the eyes of the musicians as well as the musicologists in many ways. More than sixty percent of the thoughts presented here are a part of my research in music /musicology, and hence, will be new to the reader. The reader should practically enjoy and experience each of them. It should serve the purpose of motivating the students as well as the musicians (vocalist as well instrumentalists.). The reader will get a variety of seeds that have a potential to get transformed into big trees which will yield good blossom.

पृष्ठसंख्या: 
342
किंमत: 
रु. 450
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
January, 2010

अमेरिकेत राहत असलेली तन्वी.
एकूण परिस्थितीविषयी असमाधानी असणारी.
विकासाच्या औद्योगिक प्रतिमानाची भयानकता अनुभवणारी,
अन् पर्यायांचा तोकडेपणाही जाणवणारी.
पण, नेमक काय हवंय हेही उमगत नसणारी.
दिशाहीन, भांबावलेली.

त्याच औद्योगिक विकासाची पाठराखण करणा-या
आपल्या वडिलांसमवेत सहज म्हणून ती
कण्हेरवाडीत येते काय, नि
दादाजींशी होणा-या चर्चांमधून शंकामुक्त होऊन,
शाश्र्वत विकासासाठी कार्य करण्याचं ठरवून,
भारतात परतण्याचा निर्णय घेते काय:
सारं काही स्वप्नवतच!

आजच्या परिस्थितीविषयी असमाधानी असणा-या
आणि विधायक विकासाची स्वप्नं पाहणा-या प्रत्येकाला
मूलभूत वैचारिक मार्गदर्शन करणारी ही विचारकथा :

पृष्ठसंख्या: 
176
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
December, 2011
ISBN No: 
978-81-8452-000-2
अनुवाद: 
अरुंधती देवस्थळे - मार्टिन कालुंगू-बांडा(मूळ लेखक)

देशाला गौरव मिळवून देणारा खेळाडू असो वा विरोधी पक्षनेता, तुटक वृत्तीचा
शेजारी असो वा धडधडत्या मनानं मुलाखत घेणारा पत्रकार - वेगवेगळ्या
निमित्तांनी नेल्सन मंडेलांशी थेट संपर्कात आलेल्या सर्वांचा अनुभव एकच-
मंडेलांच्या नेतृत्वाला शब्दांपलीकडच्या महानतेचं कोंदण आहे! भेटणा-या
प्रत्येकाचं मन निखळ, निर्व्याज वृत्तीनं जिंकणं आणि अनायासच त्याला जन्मभर
पुरणा-या स्फूर्तीनं भारून टाकणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सहजसुंदर वैशिष्टय!

मंडेलांचे स्वभावगुण आणि त्यांच्या बावनकशी नेतृत्वशैलीतून खूप काही
शिकण्यासारखं आहे, यांत्रिकपणे जगताना माणूसपणाचा विसर पडलेल्या
तुम्हा-आम्हा सर्वांना सहजगत्या जागं करणारं हे पुस्तक ज्याला कुठल्याही
क्षेत्रात अनुयायांचं परिवर्तन ‘मनुष्य बळात’ करायचं आहे, अशा नेत्याला मार्ग
दाखवणारं आहे. आदर्श नेतेपणाचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या नेल्सन
मंडेलांचे गुण असामान्य असूनही अनुकरणीयतेच्या कक्षांपलीकडचे नाहीत.

माणूस म्हणून अंगी असलेल्या गुणांनीच मंडेलांना जागतिक पातळीवरच्या
नेतृत्वात सर्वोच्च स्थान कसं मिळवून दिलं आहे, हे विविधांगानं दाखवून
देणा-या या गोष्टी मनाला नक्कीच भावणा-या आहेत. प्रथमदर्शनी
साध्या-सरळ वाटणा-या या गोष्टींमध्ये लहानथोर वाचकांना उदात्ततेकडे
नेण्याची अमोघ शक्ति आहे.
यू. आर. अनंतमूर्ति

पृष्ठसंख्या: 
98
किंमत: 
रु. 80
प्रथम आवृत्ती: 
2007
सद्य आवृती: 
September, 2007

राष्ट्रध्वज म्हणजे केवळ रंगीबेरंगी कापड नव्हे,
त्यात असलेले उभे-आडवे धागे तर
आपल्या तनमनातील जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे
आणि इथल्या सर्व जातींना, धर्मांना, पंथांना
एकत्र बांधणा-या राष्ट्रप्रेमाचे धागे आहेत.

गेल्या पाच हजार वर्षांत
परकीय आक्रमकांना परतवून लावताना
आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचा
साक्षीदार असणा-या ध्वजाचा हा इतिहास.

इंग्रजांविरूध्दच्या राष्ट्रीय स्वातंत्र्यसंग्रामातील
एक अनमोल शस्त्र असणारा तिरंगा ध्वज
आज स्वातंत्र्यानंतर शेजारच्या परकीय
आक्रमकांच्या मनात धडकी भरवतो!

आपल्या राष्ट्रीय मानचिन्हाच्या इतिहासाचा
आणि वर्तमानाचा घेतलेला हा वेध!

पृष्ठसंख्या: 
116
किंमत: 
रु. 120
सद्य आवृती: 
August, 2007