अर्थव्यवहार
ISBN No: 
978-81-7434-423-6

शेअर म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर आपला हक्क आणि नफ्यात पूर्ण हिस्सेदारी;
पण कंपनीला तोटा झाला, तर मात्र आपल्यावर काहीच जबाबदारी नाही.

चांगल्या शेअर्समुळे म्हणून तर समृद्धीची गंगाच दारी अवतरू शकते.

पण मुळात शेअर्स म्हणजे काय? ते मिळतात कुठे? चांगले शेअर्स नेमके ओळखायचे कसे?
त्यांच्या खरेदीची व विक्रीची योग्य वेळ कोणती? इन्ट्रा-डे आणि डिलिव्हरी व्यवहारांतील
खाचाखोचा कोणत्या? कंपनीची कार्यक्षमता नेमकी कशी जोखायची? ताळेबंद व नफा-
तोटा पत्रक कसे वाचायचे?
एखादी कंपनी उद्यासुद्धा फायद्यात राहील की नाही, हे इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरून
आजच ओळखायचे कसे?
नेमके हेच तर सारे सांगितले आहे या पुस्तकात!
तुमच्या सा-या शंकांचे अत्यंत सोप्या शब्दांत निरसन करणारे
मराठीतील एकमेव सचित्र पुस्तक
शेअर बाजार
जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!

पृष्ठसंख्या: 
230
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2008
सद्य आवृती: 
December, 2014
ISBN No: 
978-81-7434-869-2

दररोज कोटयवधी रुपयांची उलाढाल करणारा शेअर बाजार
म्हणजे जणू काही एखादी जिवंत व्यक्तीच!
माणसाच्या विचार-भावना-वर्तणूक यावर
जशा अनेक गोष्टी परिणाम घडवतात,
तशाच शेअर मार्केट घडवणा-या
अन् बिघडवणा-या अनेक बाबी असतात.
याच आहेत 'मार्केट मेकर्स'.

कर्तबगार व्यक्ती, कंपन्यांचे ताळमेळ आणि व्यवस्थापन,
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना, राजकीय निर्णय,
गुंतवणूक, पैशाची उपलब्धता, गुंतवणूकदारांची मानसिकता,
मार्केटमधल्या कंपन्यांची भलीबुरी प्रतिमा...
असे अनेक घटक कारणीभूत ठरतात मार्केटच्या चढउताराला.
या घटकांचा आणि मार्केटवरील त्यांच्या परिणामांचा वेध घेणारे,
सामान्य माणसाच्या पैशाला मार्गदर्शनाचे कवच पुरवणारे पुस्तक.

पृष्ठसंख्या: 
212
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
June, 2015
ISBN No: 
978-81-7434-618-6

 पगारदारांनी आपला इन्कम टॅक्स कसा वाचवावा?
 होमलोनच्या व्याजावर किती वजावट मिळते? ती प्रत्येक
सहमालकाला मिळते का?
 सेकंड होम तुमचा इन्कम टॅक्स कसा वाचवते?
 वीस हजार किंवा त्याहून अधिक रकमेचे कर्ज रोखीत का घेऊ नये?
 घर, जमीन, दागिने विकून होणा-या कॅपिटल गेन्सवरील इन्कम
टॅक्स कसा वाचवावा?
 फ्लॅट विकताना बाजारभावापेक्षा कमी दराने विकला तर काय होते?
 शेअर्स, म्युच्युअल फंडाची युनिट्स, बॉण्ड्सवरील उत्पन्नावर इन्कम
टॅक्स कसा आकारला जातो?
 कोणत्या नातेवाइकांकडून मिळालेली गिफ्ट करमुक्त असते?
 टी.डी.एस. टाळण्याचे राजमार्ग कोणते?
 पॅन असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरावेच लागते का?
 अपंग नातेवाइकांच्या वैद्यकीय देखभालीच्या खर्चावर किती वजावट
मिळते?
या आणि तुमच्या मनातील अशा अक्षरश: शेकडो प्रश्नांना सुंदर
मराठीत उत्तरे देणारे हे पुस्तक करदाते, करसल्लागार व
विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरेल.

पृष्ठसंख्या: 
426
किंमत: 
रु. 275
प्रथम आवृत्ती: 
2013
सद्य आवृती: 
July, 2013
ISBN No: 
978-81-7434-848-7

शेअरबाजार म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ - तसाच अनिश्चित, तसाच निसरडा.
पण क्रिकेटच्या खेळाचेही काही एक तंत्र असतेच.
आणि हे तंत्र समजावून देणारे कसलेले खेळाडू असतील तर?
गुंतवणुकीतील आद्य कुलगुरू बेंजामिन ग्रॅहॅम म्हणजे क्रिकेटमधला विजय मर्चंट.
सर जॉन टेम्पलटन म्हणजे जणू सुनील गावसकर.
यशस्वी खेळ्या करणा-या वॉरेन बफेची तुलना सचिन तेंडुलकरशीच होईल.
जातिवंत सट्टेबाज जॉर्ज सोरोस सौरभदादा गांगुलीची आठवण करून देणार.
तर या क्षेत्रावर पुस्तके लिहून अफाट लोकप्रियता कमावणारे पीटर लिंच
म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा राहुल द्रवीड.

या पाच गुंतवणूक-तज्ज्ञांनी सांगितलेले यशाचे तंत्र
महत्त्वाच्या युक्त्याप्रयुक्त्यांसह तपशीलवार समजावून देणारे
एखाद्या कादंबरीसारखे सरस आणि चित्तवेधक पुस्तक.

पृष्ठसंख्या: 
230
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2000
सद्य आवृती: 
March, 2015
ISBN No: 
ISBN 978-81-7434-508-0

जगभरातले निरनिराळे देश अन् त्यांची वेगवेगळी चलने.
या सा-या देशांचा आपापसात होणारा व्यापार,
आर्थिक व्यवहार आणि त्यासाठी लागणारे
परकी चलनाचे भांडवल.
कशी चालते ही सारी यंत्रणा?
कोण हाताळते हे अर्थकारण?
अब्जावधी डॉलर्सच्या अर्थव्यवहाराची उलाढाल होणा-या
क्षेत्रात तीन दशकांचा काळ सक्रिय असणा-या अर्थतज्ञाची
या गतिमान दुनियेचे अनोखे दर्शन घडवणारी टिपणे
माझी अर्थविश्वातील भ्रमंती

पृष्ठसंख्या: 
188
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
September, 2010
ISBN No: 
ISBN 978-81-7434-569-1

 गृहकर्जाच्या सापळ्यातून लवकर बाहेर कसे पडायचे?
 फसव्या फ्लॅट व्याजदरापासून स्वत:ला कसे वाचवायचे?
 व्याजदर वाढत असताना जुनी मुदत ठेव मोडून नवीन मुदत
ठेव करणे फायदेशीर असते का?
 मामाकडून भाच्याला मिळणारी गिफ्ट करमुक्त असते,
पण भाच्याने मामाला दिलेली गिफ्टदेखील करमुक्त असते का?
 कात टाकलेल्या पोस्टाच्या नवीन बचत योजनांचा जास्तीत
जास्त लाभ कसा घ्यायचा?
 दुसरे घर आपला प्रचंड रकमेचा प्राप्तिकर कसा वाचवू शकते?
 स्वत:कडे पैसे असताना घर घ्यायचे असेल तर, `ओन फंड्स'
वापरायचे की `लोन फड्स'?

...या आणि अशा अनेक प्रश्नांवर, भरपूर उदाहरणांसह सोप्या
भाषेत लिहिलेले आणि तुम्हांला श्रीमंत करणारे पुस्तक.

पृष्ठसंख्या: 
160
किंमत: 
रु. 125
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
December, 2013
ISBN No: 
ISBN 978-81-7434-539-4

लठ्ठ पगार कमावणारा कंपनीतील मॅनेजर असो,
फक्त चूल अन् मूल सांभाळणारी गृहिणी असो,
मध्यमवर्गीय कारकून असो की कारखान्यात राबणारा मजूर,
शेती कसणारा शेतकरी असो की छोटा दुकानदार,
धुण्या-भांड्यांच्या कामात राबणारी मोलकरीण असो की
गॅरेजमधला हरकाम्या `बारक्या',
बोबडे बोल बोलणारी छकुली असो वा
तोंडाचे बोळके झालेले आजी-आजोबा –
प्रत्येकाच्या मनातील स्वप्नांना भक्कम `अर्थ'पूर्ण आधार देणारी गुंतवणूक

पृष्ठसंख्या: 
192
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2011
सद्य आवृती: 
June, 2011
ISBN No: 
978-81-7434-525-7

 पॅन असला, तर दरवर्षी रिटर्न भरावेच लागते का?
 मित्राकडून घेतलेल्या गृहकर्जाच्या व्याजाची वजावट मिळते का?
 वैयक्तिक वापरातील वस्तू विकताना होणारा नफा करमुक्त असतो का?
 रिटर्न नेमके कुणाला भरावे लागते? रिटर्न भरलेच नाही, तर काय होते?
 किरकोळ व्यापाऱ्यालाही आपल्या हिशोबाचे ऑडिट करून घ्यावे लागते का?
 व्यवसायातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा मिळतो का?
 फ्लॅट विकताना बाजारभावापेक्षा कमी किमतीने विकला, तर काय होते?
 20 हजारांवर रोखीत कर्ज घेतले, तर कर्जाच्या रकमेइतका दंड होतो का?
 ज्येष्ठ नागरिकाला दरमहा 27 हजार रुपये उत्पन्न मिळूनही प्राप्तिकर कसा भरावा लागत नाही?
 जमीनघर विकून झालेला नफा गुंतवणूक करून वाचवता येतो का?
या आणि अशाच इतरही असंख्य किचकट प्रश्नांना सुबोध उत्तरे देणारे हे पुस्तक आहे.
प्रामाणिक करदात्यांप्रमाणेच अनुभवी सल्लागारांनाही ते उपयुक्त ठरू शकेल.

पृष्ठसंख्या: 
358
किंमत: 
रु. 275
प्रथम आवृत्ती: 
2007
सद्य आवृती: 
June, 2009
ISBN No: 
ISBN 978-81-7434-473-1

अर्थशास्त्राच्या सिध्दांतांचा आणि धोरणांचा अत्युत्कृष्ट, चित्तवेधक इतिहास
आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्रं म्हणजेच 'अर्थात'! अतिशय अचूकपणे आणि
रसाळ शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचकांना
अतिशय उपयोगी ठरेल.
डॉ. भालचंद्र मुणगेकर
माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
माजी सदस्य, प्लॅनिंग कमिशन, भारत सरकार

अर्थशास्त्राच्या उगमापासून सद्य:स्थितीपर्यंतचा विषय मांडणारं 'अर्थात' एक
इनसाइटफुल पुस्तक. मराठीत अशा पुस्तकाची अत्यंत गरज असताना हे पुस्तक
मराठीत यावं, ही फारच चांगली गोष्ट आहे. लेखकाची शैली प्रवाही, खिळवून
टाकणारी आहे.
अवघड कल्पना सोप्या उदाहरणांतून सांगण्याची हातोटी लाभली आहे. विद्यार्थी
आणि संशोधक दोघांनीही जरूर वाचावे.
डॉ. डी. एम. नाचणे
डायरेक्टर, इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ
डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च, मुंबइ

सर्वसमावेशी, बहुआयामी आकलनातून अर्थशास्त्राकडे पाहणारं हे पुस्तक. यात
संकल्पना, तात्त्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वच बाबींची सखोल
मीमांसा आहे. अच्युत गोडबोल्यांची जादुई लेखणी एका रुक्ष विषयाचं आणि एका
'कंटाळवाण्या' भकास शास्त्राचं मजेदार आनंदी साहसयात्रेत रूपांतर करून टाकते!
डॉ. अभय पेठे
डायरेक्टर आणि चेअर प्रोफेसर,
अर्थशास्त्र विभाग, माजी डीन,
फॅकल्टी ऑफ आर्ट्स, मुंबई विद्यापीठ

अर्थक्षेत्रातील नामवंतांनी गौरवलेली
विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक आणि सा-यांसाठीच
गुंतागुंतीचे अर्थशास्त्र सोपे करून सांगणारी,
अर्थशास्त्रातील इतिहास, सिध्दांत अन् चरित्रांचा वेध घेणारी
एक रंजक सफर
मराठीत प्रथमच

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2009-10
पृष्ठसंख्या: 
478
किंमत: 
रु. 350
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
March, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-525-7

'बखर भारतीय प्राप्तिकराची' ही भारतावर गेली दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इन्कमटॅक्स कायद्याची कुळकथा आहे. पण हा प्राप्तिकर कायद्याचा रटाळ इतिहास नाही. एक कायदा कसा मोठा होत गेला, त्याची ही गोष्ट आहे. जेम्स विल्सन, जेरेमी रैसमन, सी. डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, मनमोहन सिंग, प्रणब मुखर्जी यांच्यासारखे प्रतिभावंत अर्थमंत्री या कहाणीचे नायक असल्याने ही कहाणी विलक्षण रोचक बनली आहे. ही केवळ प्राप्तिकराचीच बखर नाही. प्राप्तिकर घडवला जात असताना त्याच्या आसपास सांडलेल्या राजकारणाचीही ही रोमांचकारी गाथा आहे.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार -2010-11 ;सी. डी. देशमुख पुरस्कार
पृष्ठसंख्या: 
240
किंमत: 
रु. 240
प्रथम आवृत्ती: 
2011
सद्य आवृती: 
February, 2011