रसग्रहण । समीक्षा
ISBN No: 
978-81-7434-462-5

गुरुनाथ आबाजी कुलकर्णी तथा जीए. मराठी कथाविश्वात सूर्यासारखे तळपणारे हे नाव.
ज्ञानपीठ पारितोषिकाच्या तोडीचे मराठी साहित्य निर्माण करणारा साहित्यिक असा लौकिक अवघ्या सत्त्याण्णव कथांमधून मिळवणारा प्रतिभावान साहित्यिक

जीएंच्या कथांचे नेपथ्य जसा त्या कथेवर, कथेतल्या व्यक्तींवर, त्यांच्या आयुष्यांवर, वाचकांवर अमिट परिणाम घडवते; तसा जीएंवर, त्यांच्या घडण्यावर, त्यांच्या प्रतिभेवर त्यांच्या आजूबाजूच्या आसमंताने काय परिणाम घडवला असेल?

या उत्सुकतेतून प्रा. अ. रा. यार्दी आणि प्रा. वि. गो. वडेर या दोघांनी सुरू केला एक शोध.
एक असामान्य कथाकाराच्या साहित्यातील परिसराचा प्रत्यक्ष धांडोळा घेऊन त्या कथाकाराच्या प्रतिभेचा वेध घेण्याचा मराठी साहित्यातील विरळा आणि वेगळा प्रयोग म्हणजे

पृष्ठसंख्या: 
206
किंमत: 
रु. 400
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
July, 2009
ISBN No: 
ISBN 978-81-7434-132-7

गप्पांच्या ओघात एकदा दुर्गाबाई मला म्हणाल्या, ''मला जगण्याचं सुख वाटतं बघ.'' बाईंच्या या बोलांचा मला अपार विस्मय वाटला. त्यांचं हे विधान मला थोडंसं धाष्टर्याचंही वाटलं. कारण आपण माणसं नेहमी कशा ना कशासाठी सतत कुरकुरत असतो. तर मनाला, बुध्दीला व्यग्रता असता, काही ना काही सतत दुखतखुपत असता ही एकोणनव्वद वर्षांची बाई म्हणते, ''मला जगण्याचं सुख वाटतं बघ.'' यामागचं रहस्य कशात आहे? ते आहे बाईंच्या जीवनोत्साहात. त्यांच्या वृत्तीमध्ये नित्य ताजेपणा आहे. त्यांना जगाबद्दल, जगण्याबद्दल अपार उत्सुकता आहे. ज्ञानाची परमकोटीची ओढ आहे. आपलं आयुष्य म्हणजे ईश्वरानं दिलेली देणगी आहे, अशा भावनेनं त्यांची जीवनावर, जीवनमूल्यांवर अम्लान, अव्यभिचारी निष्ठा आहे. त्यामुळेच रोजचा दिवस त्यांना नवी उमेद देतो. त्यांना जग, जगणं शिळं वाटत नाही. म्हणूनच त्यांना म्हातारपणाची अडचण वाटत नाही, की मृत्यूचं भय वाटत नाही. जगण्याचं सुख वाटतं...

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 1998-99
पृष्ठसंख्या: 
258
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
1998
सद्य आवृती: 
May, 2010