रसग्रहण । समीक्षा
ISBN No: 
978-81-7434-914-9

समग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर
राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे
स्थान 'लेखक' म्हणून अढळ व अनन्यसाधारण
आहे. नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका,
ललितगद्य व पटकथा - संवाद अशा सर्व
लिखित व दृक् - श्राव्य माध्यमांवर तेंडुलकरांनी
आपल्या अम्लान प्रतिभेची लखलखीत मुद्रा
उमटवली. समकालीनता व सार्वकालीनता
समर्थपणे अभिव्यक्त करणाऱ्या तेंडुलकरांच्या
साहित्याचे अर्थनिर्णयन व पुनर्मूल्यांकन
करण्याचा प्रयत्न एकूण सोळा लेखकांनी
अंत:स्फूर्तता आणि वैचारिकता यांचा मेळ
घालत येथे केला आहे. कारण कटू सत्याचे
प्रयोग करणारे 'तें' तथा तेंडुलकर
अ-जून, आजही प्रस्तुत ठरतात.

पृष्ठसंख्या: 
318
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
September, 2015
ISBN No: 
978-81-7434-811-1

मी नास्तिक आहे. संदेहवाद्यांसारखा अर्घवट नास्तिक
नव्हे, तर संपूर्ण नास्तिक. तरीही मी अश्रद्ध नाही.
माझी विठ्ठलावर आणि वारकरी संतांवर अपार श्रद्धा
आहे. मी त्यांचा आणि केवळ त्यांचाच अनन्यभक्त
आहे. त्यांच्या केवळ स्मरणानेही कंठात गहिवर
दाटतो, डोळ्यांत पाणी साचते.

या वारकरी संतांच्या साहित्यातून मला विठ्ठलाचे जे
दर्शन घडले ते शब्दरूपाने साकार करणे, हेच या
लेखांचे एकमेव उद्दिष्ट.

जगात असा दुसरा देव नाही!

पृष्ठसंख्या: 
124
किंमत: 
रु. 125
प्रथम आवृत्ती: 
2001
सद्य आवृती: 
December, 2014
ISBN No: 
978-81-7434-858-6

तुकोबांची गाथा म्हणजे मराठी सारस्वताचे वैभव.
तुकोबांचे संतत्व, त्यांचा रोकडा उपदेश,
काळाच्या कसोटीवर उतरलेले त्यांचे अभंग,
'रात्रंदिन युध्दाचा प्रसंग' असे त्यांचे जीवन
या साऱ्याचे तीन शतकांहून अधिक काळ
मराठी मनावर गारूड आहे.
तुकोबांच्या उक्ती म्हणजे जणू मराठी भाषेची
अंगभूत कवचकुंडले.
आपल्याला अद्वितीय वाटणाऱ्या तुकोबांच्या साहित्याला
आधुनिक साहित्यशास्त्राच्या कसोटया लावल्या तर?
डॉ. दिलीप धोंडगे यांनी हाच प्रयत्न केला.
'शैलीविज्ञान' या महत्त्वपूर्ण आधुनिक ज्ञानशाखेच्या निकषांवर
तुकोबांच्या अभंगांचा अनोखा शोध घेतला.
डॉ.रा.गो.भांडारकर, पु.मं.लाड, वा.सी.बेंद्रे, दिलीप चित्रे,
भालचंद्र नेमाडे, म.सु.पाटील, किशोर सानप अशा
मान्यवर अभ्यासकांच्या तुकोबांविषयीच्या विवेचनात
मोलाची भर टाकणारा आगळावेगळा ग्रंथ

पृष्ठसंख्या: 
332
किंमत: 
रु. 350
सद्य आवृती: 
May, 2015
ISBN No: 
978-81-7434-619-3

जीवन, मृत्यू, ज्ञान, विज्ञान, ईश्वर
अशा महत्त्वाच्या मूल्यांचा अर्थ
कधी प्रत्यक्ष अनुभूतीतून,
तर कधी कल्पनाशक्तीच्या साधनेतून,
तर कधी चिंतनातून मर्ढेकर शोधतात.
अशा प्रयत्नांचा मागोवा कविता
समजून घेण्यास उपयुक्त ठरतो.
त्यांच्या कवितेतील महत्त्वाच्या विषयांचे
कल्पनानिष्ठ संशोधन कसे झाले,
याचा घेतलेला वेध.
मर्ढेकरांची कविता

पृष्ठसंख्या: 
190
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2013
सद्य आवृती: 
August, 2013
ISBN No: 
978-81-7434-501-1

‘बेगम बर्वे’ची जन्मकथा सांगितली, तरी नाटकाच्या
निर्मितिप्रक्रियेचा संगतवार उलगडा मलाही करता येणार
नाही. वाटते की, प्रत्यक्ष कलाकृती निर्मितीच्या कहाण्या
ह्या हिमनगासारख्या असतात. नाटककराने त्यांच्या
स्पष्टीकरणाचा कितीही प्रयत्न केला, तरी बराच भाग
पाण्यातच राहतो. एकूणच रंजनप्रधान रंगभूमीच्या विरुद्ध
टोकाला असलेले हे नाटक भारतीय नाटक व
रंगभूमीच्या चर्चेच्या परिघात, देशात व परदेशात गेली
तीस वर्षे राहिले आणि आता नाटकावर हा टीकाग्रंथही
सिद्ध झाला आहे. नाटककाराला तरी यापेक्षा अधिक
काय हवे असते?
- सतीश आळेकर

पृष्ठसंख्या: 
168
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
June, 2010
ISBN No: 
978-81-7434-165-5

सतीश आळेकर लिखित-दिग्दर्शित 'महानिर्वाण' हे नाटक मराठी
रंगभूमीवर अवतरले, त्याला आज थोडीथोडकी नव्हे, तर पंचवीस
वर्षे झाली. स्थल-काल-संस्कृतिविशिष्ट संदर्भ असलेले हे नाटक
अन्य भारतीय भाषांत अनुवादित व मंचित झाले. अन्वयार्थाच्या
अनेक शक्यता व क्षमता सुचविणा-या या नाटकाने अभ्यासकांना
व रंगकर्मींनाही जणू एक आव्हान दिले. 'महानिर्वाण'च्या
आतापर्यंत झालेल्या समीक्षेतून व या नाटकाच्या प्रयोगाशी
संबंधित असलेल्या मराठी तसेच परभाषक कलावंतांनी शब्दबद्ध
केलेल्या निर्मितीच्या कहाण्यांतून याचा पुरेपूर प्रत्यय येतो.

'हास्याचे वेदनेत रूपान्तर' करणारे हे आख्यान - 'महानिर्वाण' –
अजूनही पहिल्याइतकेच साग्रसंगीत, जोषात रंगते आहे आणि
आताचे तरुण प्रेक्षकही त्याला पूर्वीइतकाच तन्मयतेने प्रतिसाद देत
आहेत. अजूनही मृदंगावरची थाप तेवढीच कडकडीत पडते,
हार्मोनियमचे सूर स्वच्छ-स्पष्टपणे उमटतात आणि नाटकाच्या
अखेरीस येणारा 'देह जावो अथवा राहो' हा तुकारामांचा अभंग
आपल्याला व्याकूळ करतो. तिकडे रंगमंचावर लाल होत जाणा-या
ज्वाळांनी वेढलेले भाऊ मरत असतात आणि त्या काही क्षणांत
आपण रसरसून जगत असतो. असा अनुभव देणारी नाटके बहुधा
अल्पच असतात. 'महानिर्वाण' हे अशा नाटकांपैकी एक आहे.
म्हणूनच 'समीक्षा आणि संस्मरणे' या दोन्ही दृष्टींनी ते लक्षणीय
ठरते.

पृष्ठसंख्या: 
266
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
1999
सद्य आवृती: 
March, 2008
ISBN No: 
978-81-7434-198-3

टीकास्वयंवर / जास्वंद / छान्दसी / पोत / युगान्त / हरिभाऊ /
विश्रब्ध शारदा / ज्ञानदेवी / माझा प्रवास / ज्वाला आणि फुले / झूल /
अमृतसिद्धी / गोखले चरित्र
ग्रंथांवरील लेख म्हणजे केवळ ग्रंथपरीक्षणे नव्हेत. किंबहुना
ग्रंथपरीक्षणाची कडवी शिस्त मला-माझ्या स्वभावाला मानवणारीही
नाही. या ग्रंथाबाबत लिहिताना अनेकदा आपोआप काही विचार
मनात आले, काही प्रश्न उभे राहिले. कित्येकदा तर एकूण मराठी
वाड्.मयप्रवाहाबाबतच काही कोडी पडली. ते सर्व खुलेपणाने येथे
लिहिलेले आहे. कीर्तनकार जसे मूळ आख्यान सोडून इकडेतिकडे
फिरतो, तसेच काहीसे इथे झाले आहे. मात्र कीर्तनकाराप्रमाणे
अधिकारवाणीने ‘सांगण्या’पेक्षा ‘जाणण्या’चे कुतूहल बाळगणे मी
अधिक पसंत करतो. मराठी साहित्य आणि मराठी समीक्षा यांबाबत
माझ्या मनात जे कुतूहल प्रारंभापासून आहे, ते इथे मोकळेपणाने
वावरते आहे, असे म्हणूयात.

पृष्ठसंख्या: 
104
किंमत: 
रु. 70
प्रथम आवृत्ती: 
2000
सद्य आवृती: 
December, 2000
ISBN No: 
978-81-7434-177-8

डॉ. स. रा. गाडगीळ यांचा 'शोकात्म विश्वरूप दर्शन' हा ग्रंथ त्यांच्या
वैचारिक यात्रेतील एक उत्तुंग दीपस्तंभच आहे. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत
महत्त्वाच्या अशा या प्रकल्पाचा आवाका छाती दपडून टाकणारा आहे. इस्किलस,
सॉफक्लिस, युरिपिडीज यांची अमर अशी ग्रीक शोकनाटये, इंग्लंडमधील शेक्सपीअरची
सा-या जगात गाजलेली शोकनाट्ये, आधुनिक युगातील इब्सेनची सामाजिक
समस्याप्रधान शोकनाटये (नॉर्वे), आणि शेवटी भारतातील युगान्त शब्दांकित
करणारे व्यासांचे महाभारत हे शोकात्म महाकाव्य हा जागतिक साहित्यातील अमर
ठेवा डॉ. गाडगीळांच्या ग्रंथातील अभ्यासाचा विषय आहे. डॉ. गाडगीळांनी
आपल्या या ग्रंथात या चारही भूप्रदेशांतील शोकात्म साहित्याचे अतिशय प्रभावी
भाषाशैलीत रसग्रहणपूर्वक विश्लेषण केले आहे. इस्किलसचे ‘सप्लायंट विमेन’,
महानाटय 'प्रॉमिथ्यूस बाउंड, ऑरेस्टिआ’ हे त्रिनाटय, सॉफक्लिसचे 'अॅटिगनी'
आणि जगातील सर्वश्रेष्ठ शोकनाटय ‘ईडिपस ’,युरिपिडीजचे काव्यसौंदर्याने बहरलेले
हिप्पॉलिटस, इब्सेनचे अ डॉल्स हाउस, व्हेन वुइ डेड अवेकन' आणि शोकात्म
घटनांनी युगान्त घडविणारे महाभारत या वैभवसंपन्न अशा ज्या कलाकृतींचा
डॉ.गाडगीळांनी आपल्या या ग्रंथात रसग्रहणपूर्वक परिचय करून दिला आहे , ती
जागतिक वाड्.मयातील अत्युच्च शिखरेच आहेत. अशा अभिजात साहित्याची
समीक्षा, रसज्ञता आणि जीवनविषयक तत्त्वचिंतन या पायावरच उभारली जाऊ
शकते. प्रा. गो. वि. करंदीकरांनी केलेले अॅरिस्टॉटलच्या 'पोएटिक्स' या मौलिक
ग्रंथाचे अप्रतिम भाषांतर आणि त्यावरील विद्वत्तापूर्ण भाष्य या ग्रंथानंतर मराठीत
या विषयासंबंधी डॉ. गाडगीळांनी केलेली सखोल आणि परिपूर्ण चर्चा इतरत्र
क्वचितच आढळेल.
ईडिपसच्या शापकथेचा सांस्कृतिक मानववंशशास्त्राच्या आधारे डॉ. गाडगीळांनी
लावलेला अर्थ अगदी स्वतंत्र आणि नव्याने प्रकाशात आला आहे. त्याचप्रमाणे
पांडवांचे आणि ईडिपसचे झालेले स्वर्गारोहण या घटनेचा गाडगीळांनी नव्याने
लावलेला अर्थ असाच अभिनव आहे. शोकात्म नाटयाचा शेवट शोकाचे विरेचन
करणारा (कॅथार्सिस) असला पाहिजे, या वैश्विक संकल्पनेतून ही स्वर्गारोहणाची
कल्पना उदयाला आली असली पाहिजे, ही डॉ. गाडगीळांची कल्पना मार्मिक
आहे.
डॉ. गाडगीळांचा 'शोकात्म विश्वरूप दर्शन' हा ग्रंथ शोकात्म साहित्यसमीक्षेत
बीजग्रंथ ठरणार आहे. रसिक वाचक-अभ्यासकांना गाडगीळांचा हा ग्रंथ काहीशी
नवी दिशा दाखविणारा वाटेल!

पृष्ठसंख्या: 
354
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2000
सद्य आवृती: 
December, 2000
ISBN No: 
978-81-7434-044-3

हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून मराठीचे प्रोफेसर
आणि पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख म्हणून
सेवानिवृत्त झालेले डॉ. श्री. रं. कुलकर्णी हे मध्ययुगीन
मराठी वाडमयाचे चिकित्सक संशोधक आणि गाढे
अभ्यासक आहेत. ‘नाथांचा भागवतधर्म’, ‘प्राचीन
मराठी हस्तलिखिते : संशोधन आणि संपादन’ इत्यादी
त्यांचे ग्रंथ त्यांच्या अभ्यासूपणाची आणि मुख्य म्हणजे
संशोधकीय प्रज्ञाप्रतिभेची साक्ष देणारेच आहेत.

डॉ. श्री. रं. कुलकर्णी यांचा एकूण सर्वच अभ्यास शास्त्रशुद्ध,
नवीनतम प्रमेये मांडणारा आणि साहित्याचा सांस्कृतिक
अनुबंध मानणारा असा आहे; आणि प्रस्तुत ‘मध्ययुगीन
मराठी साहित्य : एक पुनर्विचार’ हा ग्रंथही याला अपवाद
नाही.
“काल, परिस्थिती, सांस्कृतिक परंपरा, समाजजीवन आणि
साहित्य यांचे परोपजीवित्व मध्ययुगीन मराठी साहित्यात
जेवढे भक्कमपणे निदर्शनास येते, तेवढे अन्य कालखंडांत
क्वचितच आढळेल”, या आपल्या गृहीतकाचाच धांडोळा
लेखकाने संपूर्ण ग्रंथभर कसोशीने घेतला आहे. मध्ययुगीन
महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सास्कृतिक स्थित्यंतरे
आणि साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात घडून येणारी परिवर्तने
यांचा परस्परसंबंध व आंतरक्रिया तपासून डॉ. श्री. रं. कुलकर्णी
यांनी येथे नवसिद्धान्ताची प्रस्थापना केलेली आहे.

मराठी वाड्.मयाच्या अभ्यासक्षेत्रात मूलभूत भर घालणारा हा
ग्रंथ अभ्यासकांना समृद्धच करील.
-डॉ. द. दि. पुंडे

पृष्ठसंख्या: 
230
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
1995
सद्य आवृती: 
October, 1995
ISBN No: 
ISBN 978-81-7434-587-5

नाटक पाहणे म्हणजे फक्त
औट घटकेची करमणूक नाही.
कधी हसवणारा, सुखवणारा,
कधी रडवणारा, दुखवणारा
कधी अंगावर धावणारा,
कधी सारं मन सोलवटणारा,
कधी बेभान करणारा,
कधी आपल्याच मनाचा तळ धुंडणारा
असा हा रंगभूमीवरचा खेळ.

हा खेळ रंगून खेळणारे कलाकार
प्रेक्षकांना निव्वळ गुंग करणारा
खेळ दाखवत नाहीत,
तर अविस्मरणीय असा जीवनानुभव देतात.
अशा जीवनानुभवाच्या परिमाणाने
रंगभूमीचे अवकाश भरून काढण्यासाठी
धडपडणारी आधुनिक रंगभूमी.

या आधुनिक रंगभूमीवरचे नाटक
असते कसे? दिसते कसे?
ते पहावे कसे? ऐकावे कसे?
आणि मुख्य म्हणजे शोधावे कसे?
या सा-यांचे एक वेगळे भान देणारी समीक्षा.

पृष्ठसंख्या: 
250
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
September, 2012