भाषाविचार
ISBN No: 
978-81-7434-233-1

ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही त्यांना इंग्रजीत बोलणे अवघड का वाटते?
कारण त्यांना मराठीतून विचार करण्याची सवय तात्पुरती बाजूला ठेवून
त्यावेळी इंग्रजी भाषेच्या माध्यमातून विचार करावा लागतो.
असे दुस-या भाषेशी जुळवून घएणे सर्वांना जमतेच असे नाही.
कोणत्याही प्रसंगाबद्दलचा विचार `उत्तम इंग्रजी’ भाषेत
मनात आला; तर त्याचे प्रकटीकरणही सुंदरच होणार.
चांगले इंग्रजी येण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
पहिली गोष्ट म्हणजे त्या भाषेची आवड हवी. ती समजण्याची
विशेष पात्रता – a flair for the language असेल तर काय दुधात साखरच!
दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजी व्याकरणातील प्रमुख नियमांचे, इंग्रजी भाषेच्या अंगाचे,
त्या भाषेतील बारकाव्यांचे ज्ञान असायलाच हवे.
तिसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी शब्दसंग्रह समृद्ध असायला हवा.
तो नसेल तर वाढवायला या क्षणापासून सुरुवात करा.
एका अमेरिकन शिक्षणतज्ज्ञाने म्हटलेच आहे –
`Thought is impossoble without words.’’
तुमचा इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्यास मदत करणे हेच या पुस्तकाचे प्रयोजन.

पृष्ठसंख्या: 
208
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2002
सद्य आवृती: 
July, 2005
ISBN No: 
978-81-7434-759-6

'शब्दयोगी अव्यय' म्हणजेच 'Preposition'. वाक्यातल्या मागच्या-पुढच्या शब्दांना ही
अव्यये जोडतात. पण तरीही 'above' किंवा 'over' कधी वापरायचं, 'in' आणि 'into'
मधला नेमका फरक काय, हे प्रश्न मनाला पडतातच.
इंग्रजी भाषेत एकूण 179 शब्दयोगी अव्यये आहेत.
अर्थाच्या सूक्ष्म आणि चमत्कृतिपूर्ण छटा व्यक्त करण्याची या अव्ययांची क्षमता केवळ
अफाट आहे. हे सगळे कॅलिडोस्कोपिक कंगोरे या विस्तृत कोशात आहेत.
या ‘Prepositions’चा अभ्यास केला, तर निर्दोष आणि सहजसुंदर इंग्रजी साध्य होईल.
यासाठी हे नमुने पाहा.
1. माझ्या पाठीत दुखत होते.
I had a pain across my back.
2. तो विक्रम कोणी केला?
Who was that record by?
3. तिने केसांचा अंबाडा घातला होता.
She was wearing her hair in a bun.
4. कपाचा कान तुटला आहे.
The handle on the cup is broken.
5. मी ती कादंबरी दिवाळीच्या सुट्टीत वाचली.
I read that novel over the Diwali holidays.

पृष्ठसंख्या: 
240
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2006
सद्य आवृती: 
December, 2014
ISBN No: 
978-81-7434-695-7

रोजच्या वापरात वारंवार भेटणारे अनेक शब्द.
दैनंदिन संभाषणात हरघडी बोलावी लागणारी अनेक वाक्ये.
अशा आवश्यक आणि उपयुक्त अकराशे नोंदी असलेला-
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या साऱ्यांना इंग्रजी भाषेच्या
व्यावहारिक वापरासाठी सुबोध मार्गदर्शक ठरणारा-
मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोश.

जेव्हा नेमके शब्द हरवतात तेव्हा संवाद अडखळतो. हा
संवाद सोप्या अर्थवाही वाक्यांतून उलगडून देणारा
वाक्यकोश.
त्याची तोंडओळख करून देणारी काही वाक्ये :
 गाडी एखाद-दोन मिनिटांत येईल अशी आशा आहे.
I Hope the train comes (= will come) in a couple
of minutes.
 तुला भेटावे असे गेले चार दिवस मनात येत आहे.
I Have been meaning to meet you for the last four
days.
 तिने टीव्ही चालू केला व ती कार्यक्रम पाहू लागली.
She turned/switched the TV on and started
watching programmes.
 'तू किती संगणक विकलेस?' 'एकही नाही.'
‘How many computers did you sell?’ ‘None.’
 विमलचा सध्या लग्न करण्याचा बेत नाही.
Vimal has no plans to get married at present.
 तिने जेमतेम गाडी पकडली.
She only just caught train.

पृष्ठसंख्या: 
244
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2001
सद्य आवृती: 
February, 2014
ISBN No: 
978-81-7434-311-6

जागतिकीकरणामुळे नि तंत्रजगतात अवतरणाऱ्या नित्य
नव्या शोधांमुळे जगभरातील माणसं रोज अधिकाधिक
जवळ येत आहेत. पण आवाजानं शरीरानं होणा-या
जवळिकीला समान भाषेचा दुवा नसेल, तर त्यातून
काहीच साधणार नाही, हे लक्षात आल्यामुळे आज
जगभरातच विविध भाषा शिकण्याच्या उपक्रमाला प्रचंड
गती आली आहे.

त्यामुळे भाषांच्या माध्यमातून आपल्याला खराखुरा संवाद
साधायचा असेल, जवळीक निर्माण करायची असेल,
विश्वास संपादून आपलं कार्य साधायचं असेल, तर काय
करायला पाहिजे, नेमकं कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे,
यासारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. ही सारी शास्त्रीय
माहिती साध्या, सोप्या नि रंजक भाषेत सांगणारं हे
पुस्तक केवळ भाषा वापरणा-यांनीच नव्हे, तर मूक-
बधिरांनीही आपलं संवाद-कौशल्य विस्तारण्यासाठी
वाचावं, असं आहे!

पृष्ठसंख्या: 
88
किंमत: 
रु. 70
प्रथम आवृत्ती: 
2005
सद्य आवृती: 
March, 2005
ISBN No: 
978-81-7434-313-0

मराठी भाषेच्या शुध्दीकरणाच्या उद्देशाने तिचे आत्यंतिक
'संस्कृतीकरण' इष्ट की अनिष्ट, दैनंदिन जीवनातील संभाषणात
किती विविध व मजेदार वैशिष्टये असतात, पाश्चात्त्य
वाक्यसर्जक व्याकरणाच्या नियमांच्या आधारे भाषेच्या अंगभूत
सामर्थ्याचा व सौन्दर्याचा कसा शोध-बोध घेता येतो, काही
प्राचीन मराठी शब्दांच्या पुनरुज्जीवनाच्या मदतीने मराठी
भाषेतील लिहिण्या-बोलण्यात कसा ठसठशीतपणा व
टवटवीतपणा आणता येईल, भाषान्तर ही एक कशी
आव्हानात्मक व कष्टसाध्य कला आहे, इत्यादी प्रश्नांची
सोदाहरण व साधार चर्चा करीत मराठी भाषेच्या सामर्थ्यावर
प्रकाश टाकणारे आणि मराठी भाषेचे सौष्ठव प्रत्ययास आणून
देणारे हे निबंध सर्वसाधारण वाचकांबरोबरच चिकित्सक
अभ्यासकांनाही खचित वाचनीय वाटतील.

पृष्ठसंख्या: 
98
किंमत: 
रु. 80
प्रथम आवृत्ती: 
2005
सद्य आवृती: 
March, 2005
ISBN No: 
978-81-7434-295-9

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अस्तित्ववादी विचारसरणीने
क्रांतीच घडविली. या घटनेचे श्रेय कीर्केगार्ड, नीत्शे, यास्पर्स,
मार्सेल, हायडेगर, काम्यू व सार्त्र यांच्याकडे जाते.
अस्तित्ववादाने सुमारे चारेक दशके पाश्चिमात्य जगतातील
साहित्यनिर्मिती, समीक्षादृष्टी व कलाविचार यांवर आपली
कायमची मुद्रा उमटविली. दोन महायुध्दांच्या आसपासचे
राजकीय-सामाजिक वातावरण , स्तब्ध झालेला धर्मविचार,
उद्ध्वस्त समाजमानस आणि बेभरवशाचे व्यक्तिजीवन यांचा
अस्तित्ववादाच्या उदयाशी व विकासाशी जवळचा संबंध
आहे. १९६० ते १९८० या कालावधीत मराठी साहित्य व
समीक्षा यांवरही अस्तित्ववादाचा प्रभाव होता.

रेखा इनामदार-साने यांनी ‘अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी’
या ग्रंथामधून अस्तित्ववादाच्या उदयाची तसेच जडणघडणीची
नेटकी मीमांसा केली आहे. तसेच आस्तिकता-नास्तिकता,
निवडीचे स्वातंत्र्य, परात्मता, असंगतता, अस्सल जीवनसरणी
इत्यादी अस्तित्ववादी आशयसूत्रांचा सप्रमाण उलगडा केला
आहे. तत्त्वज्ञान आणि साहित्य यांमधील परस्परसंबंधाची सूक्ष्म
चिकित्सा करून मराठी कादंबरीविश्वात मूलगामी परिवर्तन
घडविणा-या ‘कोसला’, ‘बॅरिस्टर अनिरूध्द धोपेश्वरकर’,
‘पुत्र’, ‘सात सक्कं त्रेचाळीस’, ‘एन्कीच्या राज्यात’ या
कादंब-यांचे अस्तित्ववादाशी असणारे नाते त्यांनी

विश्लेषणपूर्वक स्पष्ट केले आहे. अस्तित्ववाद आणि कादंबरी
या दोहोंचे सांगोपांग विवरण करणारा हा
मराठीतील पहिला ग्रंथ आहे.

पृष्ठसंख्या: 
240
किंमत: 
रु. 175
प्रथम आवृत्ती: 
2004
सद्य आवृती: 
September, 2004
ISBN No: 
978-81-7434-284-3

इंग्रजी चांगल्या पध्दतीने लिहायला-बोलायला
येण्यासाठी मोठा शब्दसंग्रह अवगत हवा आणि
अपेक्षित भाव समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचावा म्हणून
कोणता शब्द कोठे व कसा वापरावा, हेही समजायला
हवे. नेमके असेच मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.

‘साप्ताहिक सकाळ’ या नियतकालिकतून सतत गेली
कित्येक वर्षे प्रकाशित होत असलेल्या अत्यंत
लोकप्रिय सदरातील लेखांचे हे वाचकांच्या आग्रहास्तव
प्रसिध्द होणारे संकलन आहे. यापूर्वी प्रकाशित
झालेल्या चार भागांप्रमाणेच हा पाचवा भागही तरूण
विद्यार्थ्यांप्रमाणे जिज्ञासू वाचकांनासुध्दा अत्यंत उपयुक्त
वाटेल, यात शंका नाही.
हे पुस्तक घ्या, वाचा आणि शब्दांची ‘इंग्रजी श्रीमंती’
साध्य करा...

पृष्ठसंख्या: 
200
किंमत: 
रु. 130
प्रथम आवृत्ती: 
2004
सद्य आवृती: 
February, 2008
ISBN No: 
978-81-7434-285-0

मराठी भाषेला अपरिचित असलेली phrasal verb ही संकल्पना इंग्रजी भाषेचे भूषणभूत वैशिष्टय
आहे. एखाद्या क्रियापदासोबत एखादे शब्दयोगी अव्यय किंवा एखादे क्रियाविशेषण किंवा
एकाच वेळी ही दोन्ही अव्यये वापरल्याने जे एक बहुपदी क्रियापद अस्तित्वात येते, त्याला
इंग्रजीत phrasal verb म्हणतात. ते एक स्वतंत्र क्रियापद असून अर्थदृष्टया मूळ क्रियापदाहून
वेगळे असते. उदाहरणार्थ,
१. Come म्हणजे येणे, पण come about म्हणजे होणे किंवा घडून येणे.
मसुद्यात इतक्या चुका कशा झाल्या, ते लिपिक सांगू शकला नाही.
The clerk couldn’t tell how so many mistakes came about in the draft.
२. Get म्हणजे मिळणे किंवा मिळवणे, पण get back म्हणजे(विशेषे-करून स्वत:च्या
घरी) परत येणे.
ती काल रात्री खूप उशिरा (घरी) परत आली.
She got back very late last night.
३. Give म्हणजे देणे, पण give out म्हणजे संपुष्टात येणे, संपणे.
आपला धान्यसाठा दोन आठवडयांनंतर संपेल.
Our food supplies will give out after two weeks.
४. Go म्हणजे जाणे, पण go-down म्हणजे किमती वगैरे उतरणे किंवा कमी होणे.
तयार कपडयांच्या किमती गेल्या महिन्यात अचानकपणे उतरल्या.
The prices of ready-made clothes (or garments) suddenly went down last month.
५. Hang म्हणजे टांगणे, पण hang back म्हणजे इतर सगळे निघून
गेल्यावर मागे थांबून राहणे.
सभा संपल्यावर अध्यक्षांना प्रश्न विचारण्यासाठी ती मागे थांबून राहिली.
After the meeting, she hung back to ask the chairman a question.
प्रत्येक phrasal verb मधील घटक एकमेकांशी सहयोग करून एक नवीन क्रियापद सिध्द
करतात. म्हणनूच इंग्रजीतील phrasal verb ह्या संकल्पनेसाठी मराठीत ‘सहयोगी क्रियापद’ हा
प्रतिशब्द वापरला आहे.
प्रस्तुत कोशात पाच हजारांहून अधिक सहयोगी क्रियापदांचा समावेश केला असून त्यांच्या
स्पष्टीकरणासाठी मराठी वाक्ये रचून त्यांची इंग्रजी भाषांतरे सादर केली आहेत.
सहयोगी क्रियापदे भौतिक घटनांची तसेच मनुष्याच्या अगणित कृतींची व अनुभवांची
अभिव्यक्ती अचूकपणे व प्रभावीपणे करतात. ह्यातच त्यांची उपयुक्तता सामावलेली आहे.

पृष्ठसंख्या: 
583
किंमत: 
रु. 325
प्रथम आवृत्ती: 
2004
सद्य आवृती: 
July, 2011
ISBN No: 
978-81-7434-431-1

दोनशे वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात मराठी ग्रंथ प्रकाशन व्यवसायाने
अनेक वळणे पार केली, कित्येक चढउतार पाहिले.
कितीतरी व्यक्ती आल्या आणि आपापल्या कर्तृत्वाचा
कमी-अधिक ठसा उमटवून काळाच्या पडद्याआड गेल्या.
त्या सर्व घटना-प्रसंगांचा, वैशिष्टयपूर्ण व्यक्तींचा आणि
प्रयोगशील संस्थांचा परिश्रमपूर्वक संकलित केलेला साक्षेपी इतिहास.

पृष्ठसंख्या: 
502
किंमत: 
रु. 400
प्रथम आवृत्ती: 
2008
ISBN No: 
978-81-7434-404-5

जगाची संपर्कभाषा किंवा ज्ञानविज्ञानाची माध्यमभाषा म्हणून इंग्रजीचे स्थानमाहात्म्य सर्वांनाच माहीत आहे. त्या भाषेतील शब्दसंपत्ती जवळ असेल, तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याचा मार्ग सुकर होतो, असा अनेकांचा अनुभव आहे.
आपल्या अवतीभवती घडणाऱ्या विविध घटनांची माहिती देता देता इंग्रजीतील शब्दांचा अर्थासह परिचय करून देणारे रंजक शैलीतले, 'साप्ताहिक सकाळ'मधील वाचकप्रिय सदरातले ताजे पन्नास लेख संकलित स्वरूपात जिज्ञासूंच्या हाती देणारे हे पुस्तक...
आधीचे पाच भाग घेतलेल्या वाचकांनाही हा सहावा भाग वाचावासा वाटेल आणि हाच भाग प्रथम घेणाऱ्या वाचकांना आधीचे पाचही भाग विकत घेऊन संग्रही ठेवावेसे वाटतील...
कारण प्रत्येक भागात दडली आहे
अस्सल यशाची एक गुरुकिल्ली!

पृष्ठसंख्या: 
204
किंमत: 
रु. 130
प्रथम आवृत्ती: 
2008