ISBN No: 
978-81-7434-939-2

त्रिंबक नारायण आत्रे यांनी 1915 साली लिहिलेल्या
'गावगाडा' या बहुचर्चित ग्रंथाची ही 'शताब्दी आवृत्ती'. त्यांनी
स्वत: या ग्रंथाचे वर्णन ‘Notes on Rural Sociology and
Village Problems with special reference to Agriculture'
असे केलेले आहे. या आपल्या ग्रंथात त्यांनी गावाचे स्वायत्त
स्वयंसिद्ध प्रशासन, गावाच्या आर्थिक व्यवहारातील शेतक-याचे
केंद्रवर्ती स्थान, बलुतेदारी, वतनपद्धती आणि तत्कालीन
गावगाडयाची कोसळू लागलेली अवस्था इत्यादींची साधार,
सप्रमाण चिकित्सा केलेली आहे.

या विशेष आवृत्तीमध्ये लेखक आत्रे यांच्या 'गावगाडा' ग्रंथाच्या
पहिल्या आवृत्तीची मूळ संहिता, त्यावरील महत्त्वाची अशी
समकालीन समीक्षा, धनंजयराव गाडगीळ, स. ह. देशपांडे
व सुमा चिटणीस या अभ्यासकांनी स्वातंत्र्योत्तर काळात केलेली
सामाजिक-आर्थिक चिकित्सा आणि ग्रंथशताब्दीच्या निमित्ताने
मुद्दाम लिहवून घेतलेले मिलिंद बोकील व नीरज हातेकर –
राजन पडवळ यांचे लेख, तसाच सदानंद मोरे यांचाही लेख
समाविष्ट आहे. संपादक द. दि. पुंडे यांची सुदीर्घ विवेचक
प्रस्तावना आणि परिशिष्ट यांतूनही आत्रे यांच्या ग्रंथाचे अंतरंग
उलगडून घेण्यास साहाय्य होणार आहे.

आत्रेरचित 'गावगाडा'ची ही शताब्दी आवृत्ती ग्रामीण अर्थशास्त्र,
समाजशास्त्र, कृषिविज्ञान इत्यादी क्षेत्रांतील अभ्यासकांना तर
उपयुक्त आहेच; पण त्याशिवाय गावप्रशासनात गुंतलेल्या सर्व
प्रशासकीय अधिका-यांना तसेच जिल्हा परिषदा, पंचायत
समित्या व ग्रामपंचायती यांमधील जबाबदार कार्यकर्त्यांनाही
विशेष मार्गदर्शक ठरणारी आहे.

पृष्ठसंख्या: 
474
किंमत: 
रु. 500
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
December, 2015
ISBN No: 
978-81-7434-229-4

जवळजवळ एक तप महाराष्ट टाइम्सचे
विशेष प्रतिनिधी म्हणून राजधानी दिल्लीत
काम करताना अशोक जैन यांनी अनेक
राजकीय चढउतार पाहिले. जनता पक्षाची
पडझड, इंदिरा गांधींचं पुनरागमन, जुन्या
पक्षांची तोडफोड, नव्या पक्षांची स्थापना,
इंदिरांजींची हत्या, राजीव गांधींची कारर्कीद
- या सर्व घडामोडीचे साक्षीदार असलेल्या
जैन यांना कधी कोणाच्या नावाचा टिळा
लावला नाही किंवा कोणत्याही पक्षाची
पताका खांद्यावर घेतली नाही. एका तटस्थ
पत्रकाराच्या भूमिकेतून त्यांनी अनेक नेत्यांची
व घटनांची रोमहर्षक शब्दचित्र रेखाटून
तो अवघा माहोल आपल्या रसरशीत शैलीत
उभा केला. राजकारणाची व दिल्लीची स्पंदनं
टिपणारं हे चटकदार लेखन जणू चकित
करणा-या, चकविणा-या, चक्रावून
टाकणा-या दिल्लीची आधुनिक बखरच!
धावती, ओघवती नि झगमगती!

पृष्ठसंख्या: 
345
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2002
सद्य आवृती: 
December, 2010
ISBN No: 
978-81-7434-228-7

ऋग्वेदातील ऋचा रचल्या गेल्या त्या अफगाणिस्तानातील अमू नदीच्या
काठी. पारश्यांचा धर्मग्रंथ अवेस्ता हा देखील झरतुष्ट्राने इथेच लिहिला.
त्यानंतर इथल्या पर्वतपहाडांच्या द-याखो-यांतून ‘बुद्धं सरणं गच्छामि’चे
सुर निनादले. आज त्याच प्रदेशात अल काईदाचे वेगळ्याच प्रकारचे
साहित्य सापडले आहे - सर्व त-हेची विध्वंसक कृत्ये करण्याचे
पद्धतशीर शिक्षण देणारे साहित्य.

मुळात हा प्रदेश होता अश्र्वगणस्थान. काळाच्या ओघात तो झाला
अफगाणिस्तान. १९७९ च्या अखेरीस रशियन सैन्य अफगाणिस्तानात
घुसले तेव्हा संतापलेल्या सर्वसामान्य अफगाणांनी चिडून म्हटले होते,
आज आमचे अफगाणिस्तान मेले. आता आमच्या देशाचे नाव
ठेवायसा हवे. ‘शोहखीस्तान’. त्यानंतर २४ वर्षांच्या युद्धामुळे
पूर्णपणाने पिळवटून निघालेले, भांबावलेले, संतापलेले सर्वसामान्य
अफगाण भविष्याकडे आशेने नजर लावून बसले आहेत. पण तिथे
सरकार स्थिर राहू नये, शांतता नांदू नये म्हणून प्रयत्न करणा-या,
आपले स्वार्थ जपणा-या अंतर्गत शक्ति आहेत, बाहेरच्या शक्तिही
आहेतच. जर तिथे शांतता स्थापन झाली नाही, तर पुन्हा एकदा
युद्धाचा भडका उडणार आहे.

एका बाजूला जगातील इस्लामेतर शक्ति आणि सत्तांचा विध्वंस
करायला सज्ज झालेला दहशतवाद आहे; तर दुस-या बाजूला जगावर
निरंकुश सत्ता गाजवायला सिद्घ झालेल्या पाश्चात्य साम्राज्यवादाचा
म्होरक्या – बलिष्ट अमेरिका आहे. या जात्यात आज अफगाणिस्तान
भरडून निघाला आहे, तर इतर देश सुपात आहेत.

इतिहासाच्या या स्तिमित करणा-या वाटचालीचा वेध घेणारे पुस्तक.

पृष्ठसंख्या: 
304
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2002
सद्य आवृती: 
March, 2010

निरनिराळया धर्मांच्या अनुयायांत जे संघर्ष होतात त्यांवर
पूर्णपणे धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेचा स्वीकार व धर्मनिरपेक्षतेची
सक्त अंमलबजावणी हे एकमात्र उत्तर आहे.
हिंदूंचे प्रश्न हे त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांवर होणा-या
आक्रमणांविषयीचे आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय
पक्षाला ते धसाला लावता येतात; असे करताना त्यांच्या
धर्मनिरपेक्षतेला धक्का पोचत नाही किंवा ते 'जातीय'
(कम्यूनल) ठरत नाहीत.
मात्र हिंदू समाजावर अन्याय होतात याचे कारण तो
असंघटित आणि दुर्बल आहे. त्यामुळे हिंदुसंघटनाला
पर्याय नाही. पण हे संघटनही धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेच्या
चौकटीत राहून नागरी समाजातील (सिव्हिल
सोसायटीतील) स्वयंस्फूर्त संस्थांना करता येते.
यासाठी धर्मनिरपेक्षतेचा आशय नीट समजून घेतला
पाहिजे, तिची अपरिहार्यता ओळखली पाहिजे आणि
तिच्यावरची श्रध्दा दृढ केली पाहिजे.
या पुस्तकात केलेली हिंदुत्वविचाराची 'फेरमांडणी' या
स्वरूपाची आहे.

पृष्ठसंख्या: 
148
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2006
सद्य आवृती: 
June, 2013
ISBN No: 
978-81-7434-867-8

बालकुपोषण ही केवळ आदिवासी अन्
आर्थिकदृष्टया निम्नस्तरातील वर्गाची समस्या नाही.
मध्यमवर्गातही ती कमीअधिक प्रमाणात आढळते.
ही समस्या सोडवणे शासनाची जबाबदारी आहे,
असे म्हणून हात झटकणे ही शुध्द आत्मवंचना आहे.
महाराष्ट्रात लाखभर अंगणवाडी सेविका आणि साहाय्यिका
तुटपुंज्या साधनांनिशी या समस्येशी लढत आहेत.
पण तेवढे पुरेसे नाही.
कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरही प्रयत्न व्हायला हवेत.
महाराष्ट्रात 'राजमाता जिजाऊ मिशन' यासाठी
भरीव काम करत आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील अंगणवाडयांच्या प्रत्यक्ष पाहणीतून
कुपोषणविरोधी लढयाचा मांडलेला लेखाजोखा.

पृष्ठसंख्या: 
216
किंमत: 
रु. 250
सद्य आवृती: 
May, 2015
ISBN No: 
978-81-7434-751-0

डॉ. संग्राम पाटील या युवकाचं
हे अनुभवकथन
म्हणजे
एका एकांड्या शिलेदाराची झुंज.
सत्तेची तटबंदी आणि भ्रष्टाचाराचे बुरूज.
तो निघाला होता यांना खिंडार पाडायला.
हातात हत्यारं – प्रामाणिकपणा आणि जिद्द.
साथीला मूठभर समविचारी सवंगडी.
परदेशातील सुस्थिर जीवन,
सुरक्षित व्यवसायातून लाभणारी समृद्धी
हे सारं झुगारून आपल्या सहचरीबरोबर
तो या लढ्यात उतरला.
कोण जिंकलं या लढ्यात?
गल्लीपासून दिल्लीपर्यंत
सगळ्या पाय-यांवर लढली जाणारी ही
एका निवडणुकीची गोष्ट

पृष्ठसंख्या: 
110
किंमत: 
रु. 100
सद्य आवृती: 
July, 2014
ISBN No: 
978-81-7434-705-3

शिक्षण असो वा प्रादेशिक अस्मिता,
आर्थिक प्रश्न असो वा राजकीय/ सामाजिक आंदोलने,
अनेक क्षेत्रांमधल्या वेगवेगळया समस्या
आपल्याला घेरून उभ्या आहेत.
सेक्युलर की कम्युनल?
एम्प्लॉयमेंट की जॉब सिक्युरिटी?
समता की सर्वोदय?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे
आपल्याला शोधायची आहेत.

राजीव साने मांडत आहेत
या शोधाला एक नवे वळण देणारी
समस्यांकडे पाहण्यास एक नवी दृष्टी देणारी
समंजस उजवेपणाची भूमिका.

या भूमिकेतून प्रचलित दुराग्रह व गैरसमज
दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे

पृष्ठसंख्या: 
234
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
April, 2014
ISBN No: 
978-81-7434-657-5

मुस्लिम मन मुख्यत: इस्लाममधून घडलेले आहे. ‘मुस्लिम मनाचा शोध’ म्हणजे
पर्यायाने मूळ इस्लामचा अभ्यास होय.

मूळ इस्लामचा अभ्यास म्हणजे मूलत: तीन गोष्टींचा अभ्यास :

मुहंमद पैगंबरांचे चरित्र, कुरआन व हदीस. या तीनही बाबी परस्पराधारित आहेत.
पैगंबर चरित्राचा अभ्यास केल्याशिवाय कुरआनातील वचनांचा अन्वयार्थ कळत
नाही. ‘कुरआन’ म्हणजे एक प्रकारे प्रेषितांच्या जीवनाचे प्रतिबिंब होय.
‘प्रेषितांच्या उक्ति व कृती’ म्हणजे ‘हदीस’ होय. ‘हदीस’ म्हणजे एक प्रकारे
कुराणाचा शब्दकोश होय. कुराणातील वचनांचा अर्थ लावण्यासाठी ‘हदीस’चाही
आधार घ्यावा लागतो. या तीनही बाबींचा एकत्रित अभ्यास केला, तरच मूळ
इस्लामचे सम्यक आकलन होऊ शकते.

असा अभ्यास करून लिहलेला हा ग्रंथ आहे.

प्रेषितांनंतरच्या काळात इस्लाममध्ये अनेक पंथ निर्माण झाले. पण या सर्व पंथांना
एकमताने मान्य असणारा हा मूळ इस्लाम प्रत्येकाने समजून घेणे काळाची गरज
आहे.

पृष्ठसंख्या: 
776
किंमत: 
रु. 750
प्रथम आवृत्ती: 
2001
सद्य आवृती: 
January, 2014
ISBN No: 
978-81-7434-630-8

शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न :
 देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का?
 लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीच
गांधींनी फाळणी मान्य केली होती का?
 बेचाळीसची चळवळ ही गांधींनी व काँग्रेसने
उठवलेली हूल होती का?
 जिनांना पाकिस्तान नको होते;
तर अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता हवी होती का?
आणि सर्वांत कळीची समस्या.
 हिंदू-मुसलमानांचे समान स्तरावरील सहजीवन
शक्य आहे का?

या मूलगामी प्रश्नांची मान्यवर लेखकांनी केलेली सर्वांगीण
व मार्मिक समीक्षा आणि शोधलेली खळबळजनक उत्तरे...

सहभागी लेखक :
*. आनंद हर्डीकर * प्रा. फकरुद्दीन बेन्नूर * डॉ. अलीम वकील
* अब्दुल कादर मुकादम * श्री. मा. भावे * डॉ. के. रं. शिरवाडकर
*. विश्वास दांडेकर * डॉ. सदानंद मोरे * रमेश पतंगे
*. दिलीप करंबेळकर * डॉ. माधव गोडबोले * प्रदीप रावत

पृष्ठसंख्या: 
368
किंमत: 
रु. 350
प्रथम आवृत्ती: 
2013
सद्य आवृती: 
November, 2013
ISBN No: 
978-81-7434-070-2

श्रद्धा-अंधश्रद्धा

शोषण, फसवणूक करणा-या अंधश्रद्धांशी
संघर्ष, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, धर्माची
कृतिशील चिकित्सा, विवेकाधिष्ठित नीतीचा
आग्रह यासाठी कार्यरत असलेली महाराष्ट्र
अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी चळवळ
आजतरी भारतात अन्यत्र आढळत नाही.

समाजाला पुढे नेण्यासाठी, डोळस, निर्भय
बनवण्यासाठी, विचारांचे परिवर्तन हे या
कार्याचे सूत्र आहे आणि हत्यार आहे
प्रबोधनाचे.

तर्काची, युक्तिवादाची, परखडपणाची ,
आर्जवी आवाहनाची, कळकळीची पण
निर्धाराची भाषा वापरत गेली दहा वर्षे
अखंडपणे यासाठीचा विवेकजागर आपल्या
भाषणांतून नरेन्द्र दाभोलकर सर्वदूर पोचवीत
आहेत. चळवळीला वाढता प्रतिसाद मिळवत
आहेत.

लोकांना मंत्रमुग्ध करणारे
त्या भाषणाच्या शैलीतले हे लिखाण
वाचकाला भिडल्याशिवाय, अंतर्मुख
केल्याशिवाय राहणार नाही.

पृष्ठसंख्या: 
132
किंमत: 
रु. 120
प्रथम आवृत्ती: 
1996
सद्य आवृती: 
September, 2013