कादंबरी
ISBN No: 
978-81-7434-405-2

'अल्पसंख्य' या नावामुळे मनात उभ्या राहणाऱ्या 'त्याच न् त्याच' प्रश्नांना पूर्ण छेद देणारी...
बँक उद्योगाच्या पार्श्वभूमीवर 'अल्पसंख्य' आणि 'बहुसंख्य' या दोन्ही प्रकारच्या
तुमच्या-आमच्यासारख्या माणसांचे जगण्याचे, लढण्याचे, हरण्याचे संदर्भ शोधणारी...
कोणताही 'अभिनिवेश' नसलेली सुंदर कादंबरी -

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2007-08
पृष्ठसंख्या: 
348
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2008
ISBN No: 
978-81-7434-487-8
अनुवाद: 
के.अ.आगाशे

एक होता तडफदार बॅरिस्टर. वल्लभभाई पटेल नावाचा. कावेबाज युक्तिवाद परजून खटले जिंकू पाहणारा. खूप पैसे कमवून झटपट श्रीमंत होऊ इच्छिणारा. पण योगायोगानं त्याची गाठ पडली एका अवलियाशी. मोहनदास करमचंद गांधींशी आणि मग चमत्कार घडला. वल्लभभाई बदलले. त्यांनी वकिली सोडली, अहिंसक सत्याग्रहाचं नेतृत्व स्वीकारलं आणि दीनदुबळया, असाहाय्य शेतकऱ्यांचे ते तारणहार 'सरदार' बनले. 'त्या' क्रांतिकारक परिवर्तनाची ही अनोखी कथा. राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या मूळ हिंदी कादंबरीचा हा सरस भावानुवाद.

पृष्ठसंख्या: 
406
किंमत: 
रु. 350
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
July, 2011

१९४९ साली चीनमध्ये साम्यवादाची राज्यपद्धती आली. तेव्हापासून चिनी जनतेने फार सोसलंय. साम्यवादाच्या बगलेत पडलेला दहशतवाद भोगलाय. कॉम्रेड्सच्या त्या राज्यात ’जगत राहणे’ म्हणजेही कोणते दिव्य, याची खबर जगाला पोहोचू न देण्याची दक्षता तिथल्या राज्यकर्त्यांनी पुरेपूर घेतली होती.

चीनला प्रत्यक्ष भेट देऊन बांबूच्या पडद्याआडचा दहशतवाद कादंबरीरूपात आणणारी ही साहित्यकृती. लेखिका म्हणते, ’आपल्याहाती असलेल्या लोकशाहीच्या ठेव्याची जाणीव व्हावी; लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका, न्यायालयात दाद मिळण्याची सोय, कुणावरही जाहीर टीका करण्याचा परवाना, अशा सोयीस्कर समजुतीत बेपर्वा वागणार्‍या आपले डोळे उघडावेत, म्हणून ही लिहिली.’ स्वातंत्र्य मिळताच ’लोकशाही’ ऐवजी ’साम्यवाद’ आपल्या कपाळी आला असता तर...?

पृष्ठसंख्या: 
235
किंमत: 
रु. 250
अनुवाद: 
सरोज देशपांडे

जेरुशा - अनाथालयातली एक पोरकी मुलगी.

तिची बुद्धिमत्ता पाहून एक दयाळू विश्वस्त तिचा कॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात.
मात्र अट एकच.

तिची प्रगती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची.
जेरुशानं आपल्या अनामिक उपकारकर्त्याला एकदाच ओझरता पाहिलेला.
लांब ढांगांचा उंच मनुष्य. म्हणून त्याचं नाव - ’डॅडी लाँगलेग्ज’!

आपल्या अनामिक वडलांना जेरुशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी.
एका तरुण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्व हळुवारपणे उलगडत नेणारी, मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी...

पृष्ठसंख्या: 
143
किंमत: 
रु. 120
ISBN No: 
978-81-7434-156-3

शनिवारवाड्यावरील जरीपटका ब्रिटिशांनी खाली उतरवला आणि
भारतात एक नवी व्यवस्था आकारास यायला सुरुवात झाली. या
संक्रमणकाळातील घडामोडींत आपल्या समाजापासून पोरका झालेला,
‘नेटिवांचं भलं कशात आहे, जिंकण्यात की हरण्यात?’ ह्या प्रश्नाशी
झगडत स्वातंत्र्ययुध्दात सहभागी झालेला नर्मद.

आणि एकविसाव्या शतकाच्या सीमारेषेवर, सर्व मानवी विश्वच प्रचंड
गतीने बदलत असताना, सामान्य माणसाच्या बाजूने चळवळीत
लढणारा, तरीही अंतिम परिणामाबद्दल संभ्रमित असलेला गौतम.

स्थळकाळाचे संदर्भ वेगळे...पण हे दोघेही आपापल्या वर्तमानात
शोध घेताहेत माणसामाणसातील नात्याचा, त्याच्या भविष्याचा.

संक्रमणकाळातील माणूस आणि समाज यांचा शोध घेणारी कादंबरी.

पृष्ठसंख्या: 
404
किंमत: 
रु. 180
प्रथम आवृत्ती: 
1999
सद्य आवृती: 
September, 1999

एक प्रतिभावान शास्त्रज्ञ. त्याने पाहिले एक स्वप्न-

सर्व विश्वाच्या कल्याणाचे, मानवजातीच्या मंगलाचे, जगातील दुरिताच्या नाशाचे.
या स्वप्नपूर्तीसाठी त्याने विज्ञानाची मदत घेतली आणि एक अद्भुत शोध लावला-
विचारलहरींवरील नियंत्रणाचा! पण -

हा शोध ताब्यात घेतला एका महत्त्वाकांक्षी, स्वार्थी, पाताळयंत्री व्यक्तीने. आणि मग काय घडले?
विज्ञानाच्या सामर्थ्याच्या वापराबद्दल विचार करायला प्रवृत्त करणारी कादंबरी.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2002-03
पृष्ठसंख्या: 
99
किंमत: 
रु. 50
ISBN No: 
ISBN 978-81-7434-383-3

माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात.
जात-धर्म-रंग भेद… आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद,
निरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित असणा-यांतले भेद...
किती तर्हांसनी विभागून डोकी ’भिन्न’ करतात.
पण एका क्षणी आमचं हे वेगळेपणच आमची शक्ती, ऊर्जा, चेतना बनतं.
आमच्या प्रत्येक तुकड्यात जीव ओतून एकसंध बनवतं.
खरं आहे की, आयुष्याच्या एका टप्प्यावर जगणं निरर्थक वाटू लागतं;
त्याच प्रमाणे मरणंही निरर्थक आहे, हे ही पाठोपाठ कळतं.
मग आपल्या वाट्याला येणा-या प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा, असं वाटतं.
जगावं वाटतं. नुसतं जगावं नव्हे, तर चांगलं जगावं असं वाटतं.
तेव्हा मात्र या शकलित बुध्दिच्या माणसांपेक्षा आम्ही खरोकरच
सर्वार्थानं भिन्न बनतो...

पृष्ठसंख्या: 
432
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2007
सद्य आवृती: 
August, 2010
ISBN No: 
ISBN 978-81-7434-050-4

तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत,
तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य
धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या.
जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच.

गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्‍या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कहाणी.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
मथुराबाई सार्वजनिक वाचनालय, बीडतर्फे दिला जाणारा महात्मा फुले साहित्य व वाङ्मय पुरस्कार 1991-92
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
साहित्य अकादमी पुरस्कार, नवी दिल्ली 1992
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार 1992
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
पुणे नगर वाचन मंदिराचा कै. श्री. ज. जोशी पुरस्कार 1992
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कै. वामन मल्हार जोशी पारितोषिक 1992-93
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार 1992-93
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
मारवाडी संमेलन : घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार 1992-93
पृष्ठसंख्या: 
484
किंमत: 
रु. 325
प्रथम आवृत्ती: 
1991
सद्य आवृती: 
June, 2013
ISBN No: 
978-81-7434-400-7

इ.स. १७७३ ते १७७९

शनिवारवाड्यात ऐन गणेशोत्सवात नारायणराव पेशव्यांचा झालेला अमानुष खून... लबाडीनं पेशवाईची वस्त्रं धारण करून राघोबांनी पुन्हा सुरू केलेली राघोभरारी... गंगाबाईंच्या पोटात वाढत असलेला नारायणरावांचा अंकुर चिरडण्यासाठी आसमंतात घोंघावणारी कारस्थानं... नाना फडणीस आणि बारभाईंनी तो अंकुर वाचवण्यासाठी केलेला जिवाचा आटापिटा... रामशास्त्री प्रभुण्यांनी राघोबांस दोषी ठरवल्यावर त्यांच्यामागे लागलेलं शुक्लकाष्ठ... निजाम, हैदर आणि इंग्रजांच्या कारवाया.... सदाशिवरावभाऊंच्या तोतयानं सुरु केलेला उत्पात आणि त्याचा निःपात... संधिसाधू इंग्रजांनी राघोबांशी हातमिळवणी केल्यावर मराठ्यांच्या पुण्यभूमीवर ओढवलेलं पहिलं फिरंग्यांचं परचक्र... ते उलटवून लावण्यासाठी उभ्या हिदुस्थानभर पसरलेल्या प्रबळ मराठा सरदारांची झालेली अभूतपूर्व एकजूट...

इंग्रजांनी ऐतिहासिक दस्तऐवजांत दडवून ठेवलेल्या पराक्रमी मराठ्यांच्या यशोगाथेत - ’वडगावच्या लढाई’त - इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान १७७९ सालीच पारतंत्र्यात जाता!
इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून देणारी ऐतिहासिक कादंबरी.

पृष्ठसंख्या: 
523
किंमत: 
रु. 350
प्रथम आवृत्ती: 
2008
सद्य आवृती: 
July, 2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-322-2

'ब्र' उच्चारणं सोपं नसतंच कधीही.
'ब्र' म्हणजे अवाक्षर.
'गप्प बस... नाहीतर...' या धमकीला न भिता
धाडसानं उच्चारलेला शब्द म्हणजे ब्र!
स्वत:बाहेर पडणं, हा अशा भीतीवरचा उत्तम उपाय.

मग एक साधारण गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती अशा
एकीचा सुरू झालेला प्रवास.
बाईच्या नजरेनं निरागसपणानं पाहिलेलं जग.
एक प्रकारे आदिवासी भागातल्या अनुभवांचा अहवाल.
त्यासोबत स्वयंसेवी संस्थांमधलं राजकारण आणि
स्त्री-पुरुष संबंधांमधलं राजकारणदेखील!

हे लेखन महानगर, शहर, खेडेगाव आणि आदिवासी
वाड्यापाडे अशा सगळयांना सामावून घेतं.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2005-06
पृष्ठसंख्या: 
338
किंमत: 
रु. 275
प्रथम आवृत्ती: 
2005
सद्य आवृती: 
December, 2011