कादंबरी
ISBN No: 
ISBN 978-81-7434-159-4

रक्ताच्या नात्याचा संबंध देखील उरला नाही, अशा
घराच्या रगाड्याला जुंपलेली ती आहे सत्तर वर्षांची
निपुत्रिक बालविधवा. तिला कादंबरीची नायिका तरी कसे
म्हणायचे! आहे खरी कथाभागाच्या वेंâद्रस्थानी. उसन्या
नातेवाईकांच्या मुला-बाळांना मायेच्या घट्ट धाग्यांनी
जखडून ठेवणारी.

शेतीला जखडलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ससेहोलपट,
त्यामुळे नव्या-जुन्या पिढ्यांमध्ये होणारी घुसमट,
वंशसातत्याची सनातन आस, पुरुषी संस्कृतीने स्त्रियांच्या
व्यापक सर्जनशीलतेकडे फिरविलेली पाठ आणि
उच्चकुलीनतेचा टेंभा मिरविणा-या घराण्याच्या अंधा-या
तळघरातील अज्ञात रहस्ये अशा विविध स्तरांवर
वावरणा-या व-हाडच्या पाश्र्वभूमीवरील या बहुपदरी व
गुंतागुंतीच्या कादंबरीत तसे अनेक नायक व नायिका
सापडतील. मग या वृद्धेलाच नायिका का करू नये?
तिनेच आपल्या कर्तृत्वाने व निष्ठेने या घराण्याच्या परंपरा
जपून त्यांना नवी वळणे दिली आहेत. अखेर प्रत्येक
घरातील वैशिष्ट्यपूर्ण कुलसंस्कृती, आचार-विचार व
स्वयंपाक-संस्कृती देखील डोळ्यात तेल घालून जतन
करतात व त्यात भर घालतात त्या परक्या घरातून
आलेल्या स्त्रियाच ना!

पृष्ठसंख्या: 
206
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
1999
सद्य आवृती: 
January, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-161-7

उद्ध्वस्त खेडी, वैराण राने
पाण्याचा गैरवापर, दुष्काळाचे शापित गाणे
टपो-या कणसांसारखी मातीतली माणसे
आधुनिकीकरण, सहकार
अन् 'लोकशाय'चा फेरा

गावच्या काळया - पांढरीचे एका तपाचे तीन-तेरा
हाच पांगिराचा लोकविलक्षण पसारा!

पृष्ठसंख्या: 
206
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
1999
सद्य आवृती: 
March, 2014

बाईचं मन... एक अथांग डोह...
बाईपण सुरू होताना...
बाईपण सिध्द होताना...
बाईपणाचं सार्थक वगैरे होताना...
बाईपणातून सुटताना...
बाईपणाचं ओझं पेलताना...
बाईपणाचा अभिमान मिरवताना...
आधुनिक बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक
वळणावरचे तिचे मनोव्यापार रेखाटणारं पुस्तक

‘काय तुझ्या मनात?’

वाचायलाच हवं. प्रत्येक प्रौढ बाईनं.
बाईच्या सहवासातल्या पुरूषानं.

पृष्ठसंख्या: 
132
किंमत: 
रु. 125
प्रथम आवृत्ती: 
2004
सद्य आवृती: 
March, 2013
ISBN No: 
978-81-7434-272-0

कोणतेही आयुष्य फक्त दुर्दैवी किंवा सुदैवी नसते.
बघणा-यांना ते तसे दिसते.

‘मसाज’, मधला मी ही या स्थूल वर्गवारीत
बसवलेला नाही. त्याच्या संमिश्र आणि
एकमेव आयुष्याचा शोध
मी माझ्या पध्दतीने घेतला आहे.

- विजय तेंडुलकर

पृष्ठसंख्या: 
116
किंमत: 
रु. 90
प्रथम आवृत्ती: 
2004
सद्य आवृती: 
April, 2005
ISBN No: 
978-81-7434-293-5

तुला राजकारणात दीर्घ काल टिकून तुझा उत्कर्ष
साधावयाचा असेल, तर मजप्रमाणे भुई धरून राहणे शिकावे
लागेल. राजकारणात भुई धरून राहण्यास पर्याय नाही.
राजकारण अनेक करतात परंतु कितीही विलंब लागला, तरी
जो धीर, पुढील नियोजन व प्रयत्न न सोडता व न कंटाळता
संधीची वाट पाहतो तोच अखेर यशस्वी संधिसाधू व
राजकारणी होतो. आयुष्यात काय अथवा राजकारणात
काय, कोणतीही संधी सहसा एकदाच येऊन संपत नसते;
ती परत येण्याची वाट पाहण्याचा पेशन्स संपल्याने आपण
संपतो. संधी पुन्हा येते, तेव्हा आपण नसतो.
तर नगरपालपद मिळवण्याच्या हातघाईस तू आला आहेस
व भलतेच काहीतरी करीत आहेस, तसे करू नको.
तू समजतो आहेस तसा, तू निवडलेला उ.पु. सेनेत जाऊन
आपले अस्तित्व नगरास जाणवून देण्याचा शॉर्ट कट
म्हणजे जवळचा मार्ग नगरपालपदाकडे जाणारा नसून तो
प्रत्यक्ष दंगल न करता दंगलविरोधी कायद्याखाली तुरूंगात
पोचणारा आहे. शहाणा राजकारणी सनदशीर
राजकारणावर अविचल श्रध्दा बाळगणारा असतो.
गरज पडल्यास तो दंगली व कत्तलीही घडवतो; परंतु असे
काही घडवल्याच्या आरोपातून नामानिराळा राहतो.
घडवणारा तो व निषेध करणारा तोच अशी दुहेरी भूमिका
जो कल्पकतेने बजावतो, तोच उच्चपदी पोचतो.

पृष्ठसंख्या: 
244
किंमत: 
रु. 175
प्रथम आवृत्ती: 
2004
सद्य आवृती: 
November, 2006
ISBN No: 
978-81-7434-290-4

तो ध्येयधुरंधर राजकारणी,

ती तमाशातली शुक्राची चांदणी.

लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतवळीची

ही रशीली कहाणी.

पृष्ठसंख्या: 
326
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2004
सद्य आवृती: 
July, 2013
ISBN No: 
ISBN 978-81-7434-308-6

अनेकदा गुंतागुंतीची परिस्थिती समोर ठाकते
माणसाच्या आयुष्यात. ही गुंतागुंत मांडणं हे लेखक
म्हणून मी माझं प्रथम कर्तव्य मानलं आहे. या
परिस्थितीत माणसं कशी वागतात हे मी पाहते आहे.
यातलं चूक बरोबर ठरवणं हे मीच नव्हे, तर कुणीच
ते पाहताना तरी करू नये, असं मला वाटतं. कारण
आधीच एखादी भूमिका घेतली, तर ही अभूतपूर्व
परिस्थिती, आहे त्या नितळ स्वरूपात आपल्याला
दिसणार नाही.

अगदी नेमक्या याच परिस्थितीत आपण जर त्या
माणसाचं जन्मापासूनचं संचित घेऊन उभे ठाकलो,
तर आपण काय करूय़ हा प्रश्न खूप कळीचा आहे.
कदाचित आपण तेच करू जे त्यानं केलं. ज्या
माणसांना आपण असं असं कधीच वागणार नाही
अशी खात्री वाटते त्यांचा मला हेवा वाटतो.
आयुष्यातल्या अतर्क्य शक्यतांबद्दलची त्यांची कल्पना
तोकडी पडतेय असं तर नसेल?

पृष्ठसंख्या: 
338
किंमत: 
रु. 275
प्रथम आवृत्ती: 
2005
सद्य आवृती: 
October, 2009
ISBN No: 
ISBN 978-81-7434-130-3

अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता;
याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या,
लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली
गरुडभरारी!
जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशी
आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्याला
व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून,
जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली.
'चलो दिल्ली'ची त्याची गर्जना साकारण्यासाठी
इंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एक
घना रणसंग्राम! नियतीच्या आडव्यातिडव्या भेसूर
नाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झाली
नाहीत असा- महानायक!
देशोदेशींच्या दफ्तरखान्यांत आजवर अडकून
पडलेल्या दुर्मिळ दस्तऐवजांचा, नव्या संशोधित
कागदपत्रांचा वेध घेऊन व त्या 'रणवाटा'वरून
भ्रमण करून चितारलेली नेताजींची अपरिचित
जीवनकहाणी.

पृष्ठसंख्या: 
724
किंमत: 
रु. 425
प्रथम आवृत्ती: 
1998
सद्य आवृती: 
April, 2015
ISBN No: 
ISBN 978-81-7434-572-1

हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत
अघनाशिनी नदीच्या तीरावर वसलेलं
आदोळशी गाव.
पूर्वापारच्या रूढी-परंपरा जपणारे देवभोळे लोक
अन् जातींच्या जाळयात, धर्माच्या चौकटीत बांधलेलं
त्यांचं संथ सरळसोट जिणं.
सातासमुद्रापल्याडहून आलेले पोर्तुगीज
आणि त्यांचा ख्रिस्ती धर्म
चक्रीवादळासारखे आदोळशीवर आदळले.

धर्मांतराची जबरदस्ती, धार्मिक अत्याचारातून
उलथीपालथी झालेली सामाजिक घडी,
देव अन् धर्म डोक्यावर घेऊन, जिवावर उदार होऊन
अनेकांनी केलेली पलायनं आणि
या सा-यांमुळे देशोधडीला लागलेली आयुष्यं.

पाच शतकांपूर्वी गोव्याच्या भूमीवर उफाळलेल्या
धार्मिक ज्वालामुखीचा
एका प्रतिभावान कादंबरीकारानं घेतलेला वेध

पृष्ठसंख्या: 
382
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
July, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-557-8

लोकमान्य टिळकांच्या कानी त्याचा स्वर पडला
आणि 'नारायण राजहंस'चा 'बालगंधर्व' झाला.
त्याच्या गात्या गळयानं महाराष्ट्रातल्या
दोन-तीन पिढयांना रिझवलं, खुलवलं, फुलवलं.
संगीत नाटक हा त्याच्या जीवनाचा ध्यास झाला,
आणि त्याचं जीवन म्हणजे शोकांत संगीत नाटक झालं.
हे सारं कसं घडत गेलं,
ते सांगणारी चरित्र कादंबरी

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा ह. ना. आपटे पुरस्कार (2012)
पृष्ठसंख्या: 
424
किंमत: 
रु. 340
प्रथम आवृत्ती: 
2011
सद्य आवृती: 
May, 2013